SIP वर 12% रिटर्न खूपच कमी आहे – खरच? | Mutual Fund SIP Tips in Marathi

मी जेव्हा माझ्या क्लायंटना त्यांच्या SIP वर 12% रिटर्न मिळेल असे सांगतो, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया नेहमीच अशी असते – “फक्त 12%? खूपच कमी आहे!” पण खरंच 12% रिटर्न कमी आहे का? चला, याचा चर्चा करू.

2500 रुपयांची SIP आणि 12% रिटर्न पुढील 15 वर्षांसाठी

आता इथे आपण स्टेप SIP विचारात न घेता साध्या SIP द्वारे किती रक्कम जमा होईल हे पाहू. जर तुम्ही दर महिन्याला ₹2500 ची SIP पुढील 15 वर्षे केलीत, आणि त्यावर तुम्हाला 12% रिटर्न मिळाला, तर 15 वर्षांनंतर तुमच्याकडे एकूण रक्कम जमा होईल ₹12,61,440. काही लोकांना ही रक्कम खूप कमी वाटू शकते, आणि त्यांचा विचार बरोबरही आहे. कारण महागाईच्या दराने 15 वर्षांनंतर या रकमेची किंमत आजच्या 12 लाखांइतकी नसेल.

मग यावर उपाय काय आहे?

12% रिटर्न हा प्रॉब्लेम नाहीये. खरा प्रॉब्लेम आहे गुंतवणुकीची रक्कम. ज्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते, त्यानुसारच रिटर्नसुद्धा पुरेसा वाटतो. याचा अर्थ जास्त रक्कम गुंतवली, तर 12% रिटर्नसुद्धा पुरेसा होतो. कसं? पाहूयात. जर तुम्ही दर महिन्याला ₹10,000 ची SIP केलीत आणि त्यावर 12% रिटर्न मिळाला, तर 15 वर्षांनंतर तुमच्याकडे जमा होणारी रक्कम असेल ₹50,45,760.

यातून आपण काय शिकलो?

आपल्याला जास्त रक्कम कशी इन्व्हेस्ट करता येईल यावर लक्ष केंद्रित करायला हवं. SIP कॅल्क्युलेटरमध्ये जास्तीत जास्त रिटर्न धरून गणित केले, तर त्याचा उपयोग फक्त बघायला छान वाटण्यापुरता होतो. प्रत्यक्षात, मार्केट 12% पेक्षाही जास्त रिटर्न देऊ शकतं, पण साधारण गणितासाठी 12% गृहीत धरणे योग्य आहे. त्यापेक्षा जास्त मिळाल तर मग दिवाळी.

SIP ची रकम वाढवणं का महत्त्वाचं आहे?

सुरुवातीला प्रत्येकजण मोठ्या SIP रकमेने सुरुवात करू शकत नाही. याची मला पूर्ण कल्पना आहे. पण शक्य तेव्हा SIP च्या रकमेत हळूहळू वाढ करणं गरजेचं आहे. मोठ्या रकमेमुळे कमी रिटर्नही तुम्हाला मोठं फंड तयार करायला मदत करतो. यासाठी तुमच्या कमाईचा आणि बचतीचा विचार करून SIP सुरू करा. पुढील काही वर्षांत गुंतवणूक रक्कम वाढवा आणि तुमच्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत पोहोचा!

ही पोस्ट वाचा: चुकून 11 म्युच्युअल फंड्सची निवड – एक शिकण्यासारखा अनुभव! 


तुम्हाला योग्य म्युच्युअल फंड सल्लागार हवा आहे का?

तुमच्यापैकी अनेक जण स्वतःचा पोर्टफोलिओ स्वतः मॅनेज करत असाल, पण जर तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ व्यवस्थित डिझाईन आणि मॅनेज करण्यासाठी एक म्यूचुअल फंड सल्लागार हवा असेल, तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता.

मी गेल्या 4 वर्षांपासून इंस्टाग्राम पेजच्या माध्यमातून म्युच्युअल फंडसंबंधी नॉलेज आणि प्रॅक्टिकल टिप्स शेअर करत आहे. आता वैयक्तिक सल्ला देऊन तुमचं आर्थिक भविष्य अधिक चांगलं बनवण्यासाठी नक्कीच हेल्प करेन.

तुम्हाला मिळणारे फायदे:

  1. तुमच्या गरजेनुसार पोर्टफोलिओ डिझाईन: तुमच्या फिनान्शिअल गोल्स आणि रिस्क प्रोफाइलनुसार योग्य फंड निवडून देतो.
  2. ट्रॅकिंग आणि रिव्ह्यू: पोर्टफोलिओ सतत अपडेट राहील याची काळजी घेतो.
  3. वेळ आणि ऊर्जा वाचवा: गुंतवणुकीसाठी योग्य सल्ला मिळाल्यामुळे तुम्हाला वेळेवर निर्णय घेता येईल.
  4. लॉंग टर्म फायद्याचा दृष्टिकोन: तुमच्या गुंतवणुकीवर चांगले रिटर्न्स मिळण्यासाठी योग्य मार्गदर्शन.

तुमचा आर्थिक प्रवास सुकर आणि यशस्वी बनवण्यासाठी माझ्याशी Whats App वर संपर्क साधा!

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment