Abhyudaya Cooperative Bank Ltd Home Loan in Marathi | अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक (Abhyudaya Co-operative Bank) ग्राहकांना घर खरेदी, बांधकाम, किंवा रिपेअर-रिनोव्हेशन साठी सोयीस्कर होम लोन स्कीम ऑफर करते.
अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकचे होम लोन इंटरेस्ट रेट ८.२५% पासून चालू होतात. आणि हे होम लोन तुम्हाला लांब लोन टेन्युअरसाठी मिळते. जाणून घ्या अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक होम लोनची सविस्तर माहिती:
अभ्युदय बँक हाऊसिंग लोन (Housing Loan)
- इंटरेस्ट रेट: ८.25% प्रतिवर्ष पासून सुरू (तुमच्या CIBIL नुसार बदलू शकतात).
- वापर: नवीन/सेकंडहँड फ्लॅट खरेदी, घर बांधकाम, विस्तार, किंवा पुरान्या लोनचे रिफायनान्सिंग.
- कमाल रक्कम: ७० लाख रुपये (एकूण प्रॉपर्टी व्हॅल्यूच्या ९०% पर्यंत).
- टेन्युअर: २० वर्षांपर्यंत.
- मोरेटोरियम पीरियड (Moratorium Period): १ महिना (लोन टेन्युअरमध्ये समाविष्ट). अर्धबांधकामातील फ्लॅटसाठी १८ महिन्यांचा मोरेटोरियम मिळू शकतो.
मोरेटोरियम पीरियड म्हणजे जेव्हा ईएमआय भरण्यापासून काही वेळासाठी सुटका मिळते.
अभ्युदय बँक रिपेअर/रिनोव्हेशन लोन (Repair/Renovation Loan)
- इंटरेस्ट रेट: ११.25% प्रतिवर्ष पासून सुरू.
- वापर: घर/दुकानांची दुरुस्ती किंवा सुधारणा.
- कमाल रक्कम: १० लाख रुपये.
- टेन्युअर: १२० EMI (सुमारे १० वर्षे).
लोनसाठी पात्रता (Eligibility Criteria)
- पगारी व्यक्ती, स्वरोजगार, व्यवसायी, आणि प्रोफेशनल्स अर्ज करू शकतात.
- Co-applicant आवश्यक (पत्नी/पती, मुले, पालक). भावंड Co-applicant असू शकतात, पण त्यांचे उत्पन्न लोन रकमेसाठी विचारात घेतले जात नाही.
- रिपेअर लोनसाठी एक सुरेटी (Surety) आवश्यक आहे.
डॉक्युमेंट्स (Documents Required)
- ओळखपत्र: आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट.
- पत्ता पुरावा: युटिलिटी बिल, रेशनकार्ड.
- इनकम प्रूफ 👇
- पगारी असल्यास: ३ महिन्यांचे सॅलरी स्लिप, ६ महिन्यांचा बँक स्टेटमेंट, ३ वर्षाचे ITR.
- व्यवसायी असल्यास: २ वर्षांचे फायनान्शियल स्टेटमेंट, बँक स्टेटमेंट, ३ वर्षाचे ITR.
- प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स: मालकी पत्रक (Title Deed).
FAQs
१. मोरेटोरियम पीरियड म्हणजे काय? हाऊसिंग लोनवर १ महिन्याचा EMI पासून सुट्टी मिळते. अर्धबांधकामातील फ्लॅटसाठी हा कालावधी १८ महिने पर्यंत वाढवता येतो.
२. लोनसाठी Co-applicant का आवश्यक आहे का? सह-अर्जदार (Co-applicant) असणे बँकेची अपेक्षा आहे. जर प्रॉपर्टी संयुक्त मालकीची असेल, तर सह-अर्जदार आवश्यक नाही.
३. होम लोनमध्ये सेवा शुल्क आणि इतर खर्च आहेत का? लीगल चार्जेस, स्टॅम्प ड्युटी, आणि शेअर लिंकेज (Share Linkage) बँकेच्या नियमांनुसार लागू होतील.
पोस्ट वाचा: Cosmos Bank Home Loan | संपूर्ण माहिती इथे वाचा!