SEBI News: भारतीय सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज बोर्ड (SEBI) यांनी Mutual Fund Investment Tracing and Retrieval Assistant (MITRA) या प्लॅटफॉर्मचा प्रस्ताव मांडला आहे, जो गुंतवणूकदारांना त्यांच्या inactive Mutual Fund folios शोधण्यात मदत करेल. 17 डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या consultation paper मध्ये, अनक्लेम्ड गुंतवणुकींचा शोध घेण्याची आणि गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्याची गरज अधोरेखित केली आहे.
Inactive Folios म्हणजे काय?
SEBI च्या व्याख्येनुसार, ज्या Mutual Fund folios मध्ये गेल्या 10 वर्षांपासून कोणत्याही प्रकारचे (आर्थिक किंवा बिगर-आर्थिक) व्यवहार झालेले नाहीत, पण त्यामध्ये युनिट बॅलन्स उपलब्ध आहे, ते inactive folios मानले जातात. गुंतवणूकदार KYC Update नसल्यामुळे, फॉर्म भरून गुंतवणूक केल्यामुळे किंवा जुन्या गुंतवणुकींबद्दल विसारल्यामुळे आपल्या Folios चा ट्रक ठेवत नाही.
MITRA प्लॅटफॉर्मची गरज का आहे?
inactive folios संदर्भात काही महत्त्वाच्या समस्या SEBI ने मांडल्या आहेत:
👉 अनेक गुंतवणूकदार त्यांचा PAN नंबर , ई-मेल आयडी किंवा पत्ता अपडेट करत नाही किंवा राहून जात, ज्यामुळे ते Consolidated Account Statement (CAS) मध्ये असे Folios दिसून येत नाहीत.
👉 जुनी Mutual Fund गुंतवणूक, विशेषतः open-ended growth schemes मध्ये, जोपर्यन्त गुंतवणूकदार थांबवत नाही तोपर्यंत गुंतवून चालूच राहते. ना
👉 inactive folios फसवणुकीच्या घटनांसाठी असुरक्षित असतात, जसे की अनधिकृत रिडेम्प्शन. ( गुंतवणूकदाराच्या नकळत पैसे काढले जातात.)
👉 या समस्यांचे निराकरण करण्यासाठी SEBI ने MITRA नावाचा प्लॅटफॉर्म प्रस्तावित केला आहे, जो अनक्लेम्ड Mutual Fund गुंतवणुकींचा शोध लावणे सोप करेल.
MITRA प्लॅटफॉर्मचे महत्त्वाचे फायदे
अनक्लेम्ड गुंतवणुकींची ओळख: गुंतवणूकदार त्यांच्या विसरलेल्या गुंतवणुकींचा शोध घेऊ शकतील किंवा त्यांचे कायदेशीर Nominee त्या पैशावर दावा करू शकतील. (खरा गुंतवणूकदार समजा हयात नसेल तर)
✅ KYC Complince ला प्रोत्साहन: या प्लॅटफॉर्ममुळे गुंतवणूकदारांना KYC अपडेट करण्यास प्रोत्साहन मिळेल.
✅ अनक्लेम्ड Folios मध्ये घट: एका ठिकाणी असलेल्या डेटाबेसमुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या inactive folios चा शोध घेणे सोपे होईल, ज्यामुळे अनक्लेम्ड Mutual Fund folios ची संख्या कमी होईल.
✅ वित्तीय पारदर्शकता वाढवणे: या प्लॅटफॉर्ममुळे पारदर्शक वित्तीय प्रणालीला प्रोत्साहन मिळेल. गुंतवणूकदारांना कुठे आणि किती पैसे ठेवले आहेत याचा पत्ता लागेल.
✅ फसवणूक कमी करता येईल: वाढते Fraud वर नियंत्रण ठेवण्यासाठी हा प्लॅटफॉर्म गरजेचा आहे. unauthorized रिडेम्प्शन रोखण्यासाठी मदत होईल.
MITRA कशाप्रकारे काम करेल?
Registrar and Transfer Agents (RTAs) द्वारे हा प्लॅटफॉर्म विकसित केला जाणार आहे. हा प्लॅटफॉर्म गुंतवणूकदारांसाठी सिंगल-विंडो सोल्यूशन म्हणून काम करेल, जिथे ते त्यांच्या अनक्लेम्ड Mutual Fund folios शोधू शकतील, ओळखू शकतील आणि पुनः चालू करू शकतील.
सार्वजनिक अभिप्राय आणि सूचना
SEBI ने MITRA प्लॅटफॉर्मच्या प्रस्तावावर सार्वजनिक अभिप्राय मागवला आहे. ब्रोकर असो म्यूचुअल फंड कंपन्या तसेच सामान्य गुंतवणूकदार 7 जानेवारी 2025 पर्यंत त्यांचे अभिप्राय आणि सूचना देऊ शकतात.
निष्कर्ष
MITRA प्लॅटफॉर्म हा गुंतवणूकदारांचे हित सुरक्षित करण्यासाठी आणि Mutual Fund इंडस्ट्रीमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा पाऊल आहे. गुंतवणूकदारांना त्यांच्या inactive गुंतवणुकींचा शोध घेऊन त्यावर दावा करण्यासाठी सक्षम करून, SEBI एक विश्वासार्ह आणि फसवणूक-मुक्त आर्थिक पर्यावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. गुंतवणूकदारांनी या प्रक्रियेत भाग घ्यावा, आपल मत द्याव जेणेकरून SEBI या प्लॅटफॉर्मला चांगल्यारित्या बनवू शकते.