Best Mutual Fund in Marathi | “Mutual Fund Insight” या मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या 2017 च्या रिपोर्टनुसार, जानेवारी 2007 ते डिसेंबर 2016 या 10 वर्षांतील लार्ज कॅप फंड्सच्या परफॉर्मन्सचे विश्लेषण करण्यात आले. यातील मुख्य निष्कर्ष असा की, दरवर्षी “टॉप” किंवा “बेस्ट” फंड बदलण्याची सवय गुंतवणुकीच्या रिटर्नवर घातक ठरू शकते. दर वर्षी फक्त बेस्ट फंड हवा अस तुम्हाला वाटत असेल तर ते का चुकीच आहे समजून घ्या.
सतत Best Mutual Fund बदलणे का वाईट आहे?
(समजा) तुम्ही 2007 मध्ये 1 लाख रुपये त्यावर्षीच्या टॉप फंडमध्ये (Reliance NRI Equity) गुंतवले, आणि दरवर्षी नव्या “बेस्ट” फंडमध्ये स्विच केले. म्हणजे जो फंड प्रत्येक वर्षी नंबर १ आहे त्यामध्ये तुम्ही पैसे इन्वेस्ट केले. (उदा., 2007 मध्ये Reliance NRI Equity, 2008 मध्ये Sundaram Select Focus Fund आणि असे बरेच फंड. तर 10 वर्षांनंतर रिटर्न फक्त 3.93% (मुद्द्ल ~1.48 लाख) असेल.
पण अस का होत?
- कॉम्पाउंडिंगचा नाश: वारंवार फंड बदलल्याने लॉन्ग टर्म कॉम्पाउंडिंगचा फायदा मिळत नाही.
- हिडन कॉस्ट: स्विचिंगदरम्यान exit load, ट्रान्झाक्शन फी, आणि टॅक्स (LTCG/STCG) रिटर्न कमी करतात.
- भावनिक चक्रव्यूह: “टॉप” फंड निवडण्याचा दबाव अनेकदा खरेदी-विक्रीच्या चुकीच्या टाइमिंगकडे नेतो.
Mutual Fund मध्ये इन्वेस्ट करताना स्थिर राहिल्याचा फायदा तुम्हाला कसा होतो?
जर तुम्ही 2007 च्या फंडमध्येच 1 लाख ठेवले असते, तर 12.84% वार्षिक रिटर्नसह 10 वर्षांत ही रक्कम ~3.34 लाख झाली असती. तुम्ही या वर्षी निवडलेला बेस्ट फंड, दुसऱ्या वर्षी बेस्ट राहिला नसेल तर त्याला बदलायची गरज नाही. तो फंड कदाचित नंबर १ राहिला नसेल. याचा अर्थ असा होत नाही की तो फंड वाईट आहे.
फरक हाच आहे की त्यापेक्षा चांगला फंड मार्केटमध्ये आला आहे. आणि आता तुम्ही त्याच्यामागे जाणार तर तुमच्या पोर्टफोलियोवर लॉन्ग टर्म रिटर्न कधी बनणार नाही. म्हणून एक चांगला फंड निवडा आणि टिकून रहा कारण, 2024 चा टॉप फंड 2025 मध्ये खाली आला तरी घाबरू नका. एका वर्षात खाली जाणे हा फंड “वाईट” आहे असा निष्कर्ष नाही.
तुमच्या Mutual Fund गुंतवणुकीसाठी टिप्स:
- गोल आणि टेन्युअर ठरवा: 5-10 वर्षांच्या गुंतवणुकीसाठी फंड निवडा.
- एसआयपीचा वापर करा: मार्केट टाइमिंगच्या टेंशनपासून दूर रहा.
- रीबॅलन्सिंग > स्विचिंग: पोर्टफोलिओ दर 1-2 वर्षांनी रीबॅलन्स करा, पण फंड्स वारंवार बदलू नका.
- पॅनिक करू नका: मार्केट डाउनटर्न हा नवीन फंड शोधण्याची वेळ नसून, विश्वास ठेवण्याची वेळ आहे.
“Best Mutual Fund” शोधण्यापेक्षा “योग्य फंड” शोधा — जो तुमच्या रिस्क क्षमता, आर्थिक उद्दिष्टांशी जुळतो आणि ज्यामध्ये तुम्ही नियमित गुंतवणूक करू शकता. वेळ आणि संयम हेच गुंतवणुकीतील खरे मित्र आहेत.
पोस्ट वाचा: Mutual Fund Investment | आधीच ७ फंड्स आहेत – अजून कोणता फंड घेऊ?