Axis Blue Chip Fund Review: गुंतवणूक करण्याआधी वाचा!

Axis Blue Chip Fund Review: ब्ल्यु चिप नाव वाचून तुम्ही कन्फ्युज झाला असाल तर आधीच सांगतो की हा एक Large Cap Fund आहे. Large Cap Fund म्हणजे असा फंड जो शेअर मार्केटमधील भारताच्या टॉप 100 कंपन्यांपैकी काही कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतो. Large Cap कंपन्यांना ब्ल्यु चिप कंपन्या असेही म्हणतात. म्हणूनच या फंडचं नाव ब्ल्यु चिप फंड आहे.

Axis Blue Chip Fund बद्दल महत्वाची माहिती

Axis Blue Chip Fund ची सध्याची NAV (Net Asset Value) ₹66.66 आहे. या फंडमध्ये गुंतवणूक सुरू करण्यासाठी तुम्ही फक्त ₹100 पासून सुरुवात करू शकता, जे त्याला खूपच परवडणारे बनवते. या फंडची एकूण साइज ₹36,108 कोटी एवढी आहे, म्हणजेच एवढा पैसा सध्या फंड मॅनेज करत आहे. सध्या या फंडमध्ये एकूण 56 कंपन्या आहेत, ज्यामध्ये HDFC Bank, ICICI Bank, Bharti Airtel यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. Expense Ratio म्हणजेच फंड मॅनेजरची फी 0.69% एवढी आहे, जी Large Cap Fund साठी योग्य मानली जाते.

या फंडमध्ये कोणी गुंतवणूक करावी आणि कोणी करू नये?

जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना जास्त रिस्क घ्यायची नसेल, तर Large Cap Fund तुमच्यासाठी योग्य आहे. कारण या फंडमध्ये सगळ्या मोठ्या आणि स्थिर कंपन्या असल्यामुळे रिस्क खूप कमी असते.

परंतु जर तुम्हाला गुंतवणुकीवर जास्त रिटर्न हवा असेल, तर Large Cap Fund तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही. मोठ्या कंपन्यांची वाढ हळूहळू होत असल्यामुळे या प्रकारच्या फंडमधून रिटर्न कमी मिळतो. त्यामुळे कमी रिस्क घ्यायची असल्यास Large Cap Fund निवडावा, पण जास्त रिटर्नसाठी मिड कॅप किंवा स्मॉल कॅप फंड चांगले असतील.

या फंडने आतापर्यंत किती रिटर्न दिला आहे?

Axis Blue Chip Fund ने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न दिला आहे. 1 वर्षात या फंडने 13.45% रिटर्न दिला आहे. 3 वर्षांमध्ये 7.07% आणि 5 वर्षांमध्ये 13.08% एवढा सरासरी रिटर्न मिळाला आहे. Large Cap Fund कडून नेहमीच सरासरी 12-14% रिटर्नची अपेक्षा ठेवावी. हा रिटर्न स्थिर असतो आणि जास्त रिस्क न घेता सुरक्षित रिटर्न मिळवून देतो.

Axis Blue Chip Fund मध्ये पैसे कसे गुंतवावे?

Axis Blue Chip Fund मध्ये गुंतवणूक करणे खूप सोपे आहे. आजकाल अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत जसे की Zerodha Coin, Groww, Asset Plus इत्यादी. या Apps द्वारे तुम्ही सहजपणे SIP किंवा lumpsum गुंतवणूक सुरू करू शकता.

तुम्हाला डायरेक्ट म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाइटवर जाऊनही गुंतवणूक करता येईल. ऑफलाइन गुंतवणुकीसाठी, तुम्ही बँकेच्या सहाय्याने फॉर्म भरून गुंतवणूक करू शकता. कोणत्याही प्रकारच्या अडचणीसाठी तुम्ही म्युच्युअल फंड अडवायझरचा सल्ला घेऊ शकता.

जर तुम्हाला SIP सुरू करण्यासाठी किंवा म्यूचुअल फंडबद्दल योग्य मार्गदर्शन हवे असेल, तर तुम्ही मला संपर्क करू शकता. 3 मिनिटात तुमचं Asset Plus अकाऊंट ओपन करा आणि तुमचा पोर्टफोलियो डिझाईन करण्यासाठी मला 9372334632 या नंबरवर WhatsApp करा. मी एक AMFI रजिस्टर म्युच्युअल फंड अडवायझर आहे आणि तुम्हाला योग्य सल्ला नक्कीच देऊ शकतो.

ही पोस्ट वाचा: ELSS फंड म्हणजे काय? | What is ELSS Fund in Marathi?

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment