Belrise Industries IPO साठी प्राइस बँड ₹85 ते ₹90 प्रति शेअर निश्चित करण्यात आलेला आहे. एक शेअरची face value ₹5 आहे. म्हणजेच, फ्लोर प्राइस हा फेस व्हॅल्यूच्या 17 पट आणि कॅप प्राइस 18 पट आहे.
Belrise Industries IPO Date
Belrise Industries IPO चे सब्सक्रिप्शन 21 मे 2025 (बुधवार) रोजी सुरू होईल आणि 23 मे 2025 (शुक्रवार) पर्यंत चालेल. Anchor Investors साठी IPO एक दिवस आधी म्हणजेच 20 मे 2025 रोजी खुले करण्यात येईल
Belrise Industries IPO GMP (Grey Market Premium)
सध्या Belrise Industries IPO चा GMP (Grey Market Premium) सुमारे ₹20 ते ₹25 दरम्यान असून यामध्ये रोज बदल होत आहे. GMP वरून बाजारात IPO विषयी चांगली उत्सुकता दिसून येते.
Belrise Industries IPO Lot Size
या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी 166 शेअर्सचा एक लॉट आहे. त्यानंतर प्रत्येक लॉट 166 च्या पटीत असणार आहे. त्यामुळे retail investors साठी हा एक manage करण्यासारखा IPO आहे.
Belrise Industries IPO Allotment Date
Belrise Industries IPO चे शेअर अलॉटमेंट 26 मे 2025 रोजी निश्चित केले जाईल. जर तुम्हाला शेअर्स मिळाले नाहीत, तर 27 मे 2025 रोजी तुमचा पैसा रिफंड केला जाईल. त्याच दिवशी शेअर्स तुमच्या Demat Account मध्ये जमा होतील.
Belrise Industries IPO Listing Date
Belrise Industries चे शेअर्स 28 मे 2025 रोजी BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट केले जातील. Listing नंतर शेअरचा पहिला व्यवहार त्या दिवशी होईल.
Belrise Industries Company Details
Belrise Industries Limited ही एक भारतीय ऑटोमोबाईल पार्ट्स बनवणारी कंपनी आहे, जी मुख्यतः sheet metal components, polymer parts, suspension systems, mirror systems आणि body-in-white components तयार करते. ही उत्पादने दोन-चाकी, तीन-चाकी, चार-चाकी आणि व्यावसायिक वाहनांसाठी वापरली जातात.
कंपनीचे ग्राहक म्हणजेच OEMs मध्ये Bajaj, Hero, Honda, Royal Enfield, Tata Motors, Mahindra, Jaguar Land Rover, आणि VE Commercial Vehicles यांचा समावेश आहे. 30 जून 2024 पर्यंत, Belrise Industries चे 15 मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स 8 राज्यांतील 9 शहरांमध्ये आहेत. ही कंपनी 27 प्रमुख OEMs ना सेवा देते.
Belrise Industries IPO Review Marathi
Belrise Industries IPO हे स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत कमी P/E Ratio (17.78 ते 18.83) मध्ये येत आहे, जे एक आकर्षक मूल्यांकन मानले जाते. याच्या तुलनेत स्पर्धक जसे की Bharat Forge (58.94), Uno Minda (62.19), Motherson Sumi (39.42) यांचे P/E अधिक आहेत. त्यामुळे अल्प आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी Belrise IPO हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पण शेवटचा निर्णय गुंतवणूकदाराने स्वतःच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार आणि सल्लागाराच्या सल्ल्याने घ्यावा.
ही पोस्ट वाचा: Yes Bank च्या शेअर्समध्ये 9% वाढ, “या” कंपनीकडून ₹13,483 कोटींची गुंतवणूक