Best Flexi Cap Mutual Funds: सध्या मार्केटमध्ये प्रचंड volatility आणि uncertainty आहे. Large cap, mid cap की small cap – कुठे गुंतवणूक करावी हे समजत नाहीये? अनेक नवीन mutual fund investors याच चिंतेत आहेत. मार्केटचं mood बदलतंय, पण category switch करायचं कधी हे कळत नाही. अशा वेळी एक सोपा पर्याय आहे – Flexi Cap Mutual Funds.
Flexi Cap Mutual Funds म्हणजे काय?
Flexi cap mutual funds हे असे mutual funds असतात जे fund manager ला large cap, mid cap आणि small cap सगळ्या प्रकारात गुंतवणूक करण्याचं स्वातंत्र्य देतात. म्हणजेच हे funds कुठल्याही एका category मध्ये fix राहत नाहीत. Fund manager त्याच्या मार्केटच्या अंदाजानुसार कुठे जास्त गुंतवणूक करायची हे ठरवू शकतो – कधी large caps मध्ये तर कधी mid किंवा small caps मध्ये.
Flexi Cap Mutual Funds का निवडावेत?
Flexi cap mutual funds हे moderate risk investors साठी योग्य मानले जातात. यामध्ये:
- वेगवेगळ्या market capitalisations मध्ये diversification मिळतो
- मार्केट बदलल्यावर fund manager पोर्टफोलिओ adjust करू शकतो
- दीर्घकाळात चांगले risk-adjusted returns मिळण्याची शक्यता असते
पण लक्षात ठेवा – सगळे flexi cap funds सारखे नसतात. काही funds थोडे conservative असतात तर काही अधिक aggressive. त्यामुळे तुमचा risk appetite लक्षात घेऊन scheme निवडणं महत्त्वाचं आहे.
गुंतवणुकीचा कालावधी
Flexi cap funds मध्ये किमान 5 ते 7 वर्षांचं investment horizon ठेवणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे fund ला मार्केटचे वेगवेगळे फेज पार करून चांगले returns देण्यासाठी वेळ मिळतो.
April 2025 मध्ये गुंतवणुकीसाठी Best Flexi Cap Mutual Funds
सध्या बाजारात चांगली consistency आणि performance दाखवणारे काही top flexi cap mutual funds:
- Parag Parikh Flexi Cap Fund
- HDFC Flexi Cap Fund
- UTI Flexi Cap Fund
- PGIM India Flexi Cap Fund
- Aditya Birla Sun Life Flexi Cap Fund
- SBI Flexi Cap Fund
- Canara Robeco Flexi Cap Fund
निष्कर्ष
जर तुम्हाला large cap, mid cap की small cap – कुठे गुंतवणूक करावी याबद्दल गोंधळ वाटत असेल, तर Flexi Cap Mutual Funds हे एक चांगला पर्याय ठरू शकतो. Fund manager तुमच्यासाठी ते निर्णय घेतो आणि मार्केटनुसार पोर्टफोलिओ adjust करतो.
गुंतवणूक करताना लक्षात घ्या:
- तुमचे financial goals
- तुमचा risk appetite
- आणि तुमचा investment horizon
फक्त 1-2 चांगले flexi cap funds निवडा, नियमितपणे performance बघत रहा आणि थोडं संयम ठेवा. योग्य fund आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीने long term wealth creation नक्की शक्य आहे.