Home Loan घेताना इन्शुरन्स का घ्यावा लागतो? जाणून घ्या कारण

Home Loan Tips: जेव्हा तुम्ही बँकेकडून होम लोन घेता, तेव्हा बँक तुमच्यासोबत एक इन्शुरन्स पॉलिसी घ्यायला सांगते. आता अनेकांना प्रश्न पडतो – का? तर यामागे कारण अगदी सोप्पं आहे.

समजा तुम्ही 15 ते 20 वर्षांसाठी होम लोन घेतलं आणि या काळात लोन घेणाऱ्या व्यक्तीचं काही दुःखद घडलं, तर उरलेलं कर्ज कोण भरणार? बँकेला हाच धोका असतो. म्हणूनच त्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याचं कर्ज फेडण्यासाठी इन्शुरन्स घेतलं जातं.

Telegram Link

टर्म इन्शुरन्स नसल्यास बँक काय करते?

बरं, काही वेळा लोकांकडे आधीपासून टर्म इन्शुरन्स नसतो. अशावेळी बँक स्वतःच एक टर्म इन्शुरन्स पॉलिसी ऑफर करते. हा टर्म इन्शुरन्स तुमचं वय, लोनची रक्कम आणि किती वर्षांसाठी लोन घेतलंय यावर अवलंबून असतो.

उदाहरणच घ्या – 30 वर्षांचा माणूस जर ₹50 लाखाचं होम लोन घेत असेल, तर त्याला टर्म इन्शुरन्सचं प्रीमियम सुमारे ₹50,000 ते ₹60,000 इतकं लागू शकतं.

आधीपासून टर्म इन्शुरन्स असेल तर?

जर तुमच्याकडे आधीच टर्म इन्शुरन्स असेल, तर तुम्ही तेच इन्शुरन्स बँकेसोबत “Assign” करू शकता. यालाच Insurance Assignment असं म्हणतात. म्हणजे बँकेकडून वेगळा इन्शुरन्स घ्यायची गरज नाही.

मी स्वतः जेव्हा होम लोन घेतलं, तेव्हा माझ्याकडे आधीपासून टर्म इन्शुरन्स होतं. मी तीच पॉलिसी बँकेसोबत असाइन केली आणि बँकेकडून नवीन इन्शुरन्स घेणं टाळलं. त्यामुळे एकदम ₹50-60 हजारांचा एक्स्ट्रा खर्च वाचला.

महत्वाचा सल्ला – टर्म इन्शुरन्स लवकर घ्या

जेव्हा तुमचा जॉब लागतो, तेव्हाच टर्म इन्शुरन्स घ्या. कारण वय लहान असताना प्रीमियम स्वस्त असतो आणि भविष्यात जर होम लोन घ्यायचं झालं तर तुमचं काम सोपं होतं.

ही पोस्ट वाचा: ICICI Bank Home Loan: फक्त 8.75% व्याजदराने मिळवा ₹5 कोटींपर्यंतचे होम लोन

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment