DigiLocker वरून मिळणार लगेच Demat आणि Mutual Fund Statements – SEBI अपडेट

SEBI DigiLocker News in Marathi | एप्रिल 1, 2025 पासून Stock market आणि Mutual Fund (MF) गुंतवणूकदार आता त्यांच्या Demat account मधील Shares च्या holding statement आणि Mutual Fund units चा Consolidated Account Statement (CAS) DigiLocker वरून डाउनलोड आणि Store करू शकतात. या नवीन सुविधेमुळे आपले तुमची आर्थिक कागदपत्रे एकाच ठिकाणी ठेवणे सोपे होईल.

DigiLocker काय आहे?

DigiLocker हा एक सरकारमान्य डिजिटल प्लॅटफॉर्म आहे ज्यावर तुम्ही महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षितपणे संग्रहित करू शकता. हा एक डिजिटल लॉकरसारखा आहे ज्यात तुम्ही तुमचे Investment documents, Identity proofs, आणि इतर अधिकृत कागदपत्रे साठवू शकता जस की Aadhaar card, PAN card, Insurance policy documents आणि इतर डॉक्युमेंट्स ज्यामुळे ते हरवण्याचा धोका कमी होतो.

Investment Statements सुलभपणे मिळवा

  • Download आणि Store: आता तुम्ही तुमचे Demat account मधून Shares आणि Mutual Fund units चे holding statement, तसेच CAS, थेट DigiLocker मध्ये मिळवू शकता.
  • Centralized Storage: सर्व आर्थिक कागदपत्रे एका खात्यात ठेवली जाऊ शकतात, ज्यामुळे त्यांचा Management आणि access करणे सोपे होते.

नवीन Nomination Feature

  • Nominee Authorization: गुंतवणूकदार DigiLocker nominees ना त्यांच्या Investment details वर access देण्याची परवानगी देऊ शकतात, जे त्यांच्या निधनानंतर उपयोगात येईल.
  • Automatic Notification: गुंतवणूकदाराच्या निधनाच्या वेळी DigiLocker nominee ना SMS आणि Email द्वारे सूचना दिली जाईल.
  • Additional Nominee Option: हे nomination, Demat account किंवा MF folio मध्ये आधीच केलेल्या nomination पेक्षा स्वतंत्र आहे.

या सुविधेचे फायदे

  • Unclaimed Assets कमी करा: सर्व Investment documents DigiLocker मध्ये संग्रहित केल्याने तुमची आर्थिक मालमत्ता unclaimed होण्याची शक्यता कमी होते.
  • Transmission Process सोपा: Nominee ला लगेचच तुमचे Investment details access करता येतात, ज्यामुळे surviving joint holders, nominees किंवा legal heirs यांना माहिती देणे सोपे होते.
  • Dematerialisation Option: जे गुंतवणूकदार अजूनही physical securities घेऊन आहेत, त्यांनी त्या Demat मध्ये convert करून या सुविधेचा लाभ घेणे उपयुक्त ठरेल.

या नवीन SEBI च्या update मुळे तुमची financial investment documents सुरक्षित, सोप्या प्रकारे access करता येतील आणि nominee कडे सहजपणे हस्तांतरित करता येतील, ज्यामुळे तुमचे आर्थिक व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि सुरक्षित बनेल.

Social Media Links

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment