Mutual Fund SIP करताना म्युच्युअल फंड सल्लागाराची मदत घेत आहात का? सत्य जाणून घ्या!

Mutual Fund SIP: आपल्या इंस्टाग्राम फॉलोअरने माझ्याशी संपर्क साधला आणि नवीन म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, त्याला कोणता फंड निवडावा हे ठरवायला कठीण जात होतं. जेव्हा मी त्याला त्याच्या सध्याच्या म्युच्युअल फंड्सबद्दल विचारलं, तेव्हा त्याने सांगितलं की त्याच्याकडे सहा म्युच्युअल फंड्सचा चांगला विविधतापूर्ण पोर्टफोलिओ आहे, ज्यात मिड-कॅप, मल्टी-कॅप आणि स्मॉल-कॅप फंड्स समाविष्ट आहेत.

त्यानंतर मी त्याला नवीन Mutual Fund SIP का सुरू करू इच्छित आहात हे विचारले तेही Groww App वर. आणि त्याने सांगितलं की त्याने हे सहा फंड्स एका ब्रोकरमार्फत घेतले आहेत, ज्यावर त्याला छोट कमिशन द्याव लागतो.

ही एक सामान्य परिस्थिती आहे, तुमच्यासोबत पण होत असेल!

एक गोष्ट लक्षात घ्या की म्युच्युअल फंड सल्लागार आपल्याला योग्य फंड निवडण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शन करण्यासाठी खूप महत्त्वाची सेवा पुरवतात. त्यांचा काम आहे, योग्य फंड निवडण्यासाठी संशोधन करणे, बाजारातील ट्रेंडचा विश्लेषण करणे आणि आपली गुंतवणूक कुठे करावी याचा योग्य निर्णय घेणे. आणि एवढंच नाही तर क्लाईंटचे केवायसी करणे, म्यूचुअल फंडमधून पैसे काढून देणे अशा अनेक सेवा ते पुरवतात. त्यासाठी वेळ आणि Expertize लागते, आणि त्याचं काम इतकं महत्त्वाचं असल्यानं त्यांना मिळालेलं कमिशन योग्य आहे.

याचं उदाहरण देण्यासाठी, मी खूप पुस्तके वाचतो. समजा, मी 300 रुपयांना एक चांगलं रिसर्च केलेल पुस्तक खरेदी केलं, जे थोडक्यात महत्त्वाची माहिती देतं. त्या पुस्तकाच्या लेखकाला ते 300 रुपये मिळणे गरजेच आहे कारण त्याने योग्य मेहनत घेतली आणि माहिती चांगल्या प्रकारे दिली. त्याचप्रमाणे, म्युच्युअल फंड सल्लागाराला त्यांच्या सेवेसाठी कमिशन मिळणे गरजेच आहे.

Mutual Fund गुंतवणूकदारांचे तीन प्रकार:

  1. स्वतःचे पैसे मॅनेज करणारे: जर तुम्हाला म्युच्युअल फंड्स बद्दल चांगली माहिती असेल आणि तुम्ही पोर्टफोलिओसाठी योग्य फंड निवडू शकत असाल, तर तुम्ही Groww किंवा Zerodha सारख्या Apps द्वारे थेट गुंतवणूक करू शकता.
  2. मार्गदर्शन घेणारे गुंतवणूकदार: जर तुम्हाला म्युच्युअल फंड्स समजतात, पण योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात अडचण येत असेल, कोणता फंड निवडायचा हे समजत नसेल तर म्युच्युअल फंड सल्लागाराची मदत घेणं योग्य ठरेल.
  3. नवीन गुंतवणूकदार: जर तुम्हाला म्युच्युअल फंड्स समजत नसतील आणि योग्य निर्णय घेणं कठीण असेल, तर तुम्हाला नक्कीच म्युच्युअल फंड सल्लागाराची मदत घ्यायला हवी.

निष्कर्ष

जस आपण सगळे जॉब करतो आणि त्याचा मोबदला म्हणून आपल्याला सॅलरी मिळते. तसंच म्युच्युअल फंड सल्लागाराचं काम आपल्याला योग्य मार्गदर्शन देणं असतं. जर ते काम तो प्रामाणिकपणे करत आहे तर त्यांच्या सेवेसाठी त्यांना कमिशन मिळणं योग्य आहे. आणि उगाच नको ते फंड घेऊन मोठ नुकसान करून घेण्यापेक्षा थोड कमिशन देऊन योग्य सल्ला घेतलेला कधीही बेस्ट.

ही पोस्ट वाचा: Mutual Fund SIP गुंतवणुकीत चूक होऊ नये म्हणून हे महत्त्वाचे गणित शिकून घ्या!

FAQs

म्युच्युअल फंड सल्लागार आपल्यासाठी वेळ, संशोधन आणि मार्केट ट्रेंड्सचा विश्लेषण करून योग्य फंड निवडतात. त्यांचा कष्ट आणि तज्ञता योग्य प्रमाणात कमिशन मिळवण्यास पात्र करतात, कारण ते आपल्याला योग्य मार्गदर्शन देत असतात.

जर तुम्हाला म्युच्युअल फंड्सची चांगली माहिती असेल आणि तुमच्याकडे वेळ आणि तज्ञता असेल, तर तुम्ही थेट apps द्वारे गुंतवणूक करू शकता. मात्र, जर तुम्हाला योग्य निर्णय घेण्यात अडचण येत असेल, तर व्यावसायिक सल्लागाराची मदत घेणं योग्य ठरेल.

म्युच्युअल फंड सल्लागार आपल्या गुंतवणुकीसाठी योग्य फंड निवडण्यास मदत करतात, आणि ते मार्केटच्या ट्रेंड्सचा अभ्यास करून चांगले निर्णय घेतात. तसेच, ते तुम्हाला योग्य वेळेत योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतात, जेणेकरून तुमची गुंतवणूक अधिक फायदेशीर होईल.

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment