HDFC ERGO Health Insurance | ऑप्टिमा सिक्युर हेल्थ इन्शुरेंस पॉलिसीबद्दल संपूर्ण माहिती!

HDFC ERGO Optima Secure Health Insurance Policy Details in Marathi | हेल्थ इन्शुरेंस जगतात, HDFC ERGO ची Optima Secure Policy एक उत्कृष्ट पर्याय आहे.

ही पॉलिसी तुमच्या हॉस्पिटलायझेशनच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.

चला या पॉलिसीचे फायदे आणि तोटे, वैशिष्ट्ये, आणि इतर माहिती सोप्या मराठीत समजून घेऊ.

Optima Secure Policy ची मुख्य वैशिष्ट्ये

1) Secure Benefit – 2X Cover पहिल्या दिवसापासून

उदाहरणार्थ, 10 लाख रुपयाची पॉलिसी घेतल्यास, तुम्हाला 20 लाख रुपयाचा कव्हर मिळतो. हा लाभ तुमच्या पॉलिसीच्या पहिल्या दिवसापासून लागू होतो.

2) Loyalty Benefit – 50% वार्षिक वाढ

प्रत्येक वर्षी Renew करताना, तुमची Sum Insured (कव्हर रक्कम) 50% ने वाढते. हा लाभ 100% पर्यंत मिळू शकतो (उदा., 10 लाख → 15 लाख → 20 लाख). अखेरीस, तुम्हाला 3X कव्हर मिळवू शकतो.

3) Room Rent वर कोणतही Restrictions नाही

हॉस्पिटलमध्ये Shared, Single, Deluxe Room किंवा इतर कोणत्याही प्रकारची रूम निवडण्यास तुम्हाला मुभा आहे. रूम निवडण्यात काही बंधन नाही.

4) सगळ्या आजारांवर पूर्ण कव्हर

कोणत्याही आजारासाठी Disease-wise Sub-limits नाहीत. पॉलिसीमध्ये नमूद न केलेले आजारही कव्हर केले जातात.

5) Pre & Post Hospitalization चा खर्च

हॉस्पिटलायझेशनच्या 60 दिवस आधी आणि 180 दिवस नंतर च्या खर्चाचा समावेश (डायग्नोस्टिक टेस्ट, औषधे इ.) या पॉलिसीमध्ये केला आहे.

6) Domiciliary Cover दिल जाईल

घरात उपचार घेणे गरजेचे असल्यास (उदा., हॉस्पिटलमध्ये बेड नसल्यास), तो खर्चही कव्हर केला जातो.

7) AYUSH Treatments सुद्धा कव्हर होते

आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी इ. पद्धतीचे उपचार पूर्ण कव्हर दिला जातो.

8) फ्री मध्ये Health Checkups

वार्षिक फुल बॉडी चेकअपचा खर्च पॉलिसीद्वारे भरला जातो (5 लाख Deductible प्लॅन वगळता).

Optima Secure चे फायदे

  • 3X कव्हर पर्यंत (Secure + Loyalty Benefit मुळे कव्हर वाढतो).
  • Room Rent च्या बंधनांमुळे तणाव नाही.
  • Day Care Treatments (24 तासांपेक्षा कमी हॉस्पिटलायझेशन) कव्हर.
  • Unlimited Restore Benefit (क्लेम केलत नाही तर कव्हर वाढतो).

Optima Secure चे काही तोटे

  • Maternity Benefits नाहीत (गर्भधारणा संबंधित खर्च कव्हर नाही).
  • International Coverage नाही.
  • Waiting Periods आहे तो म्हणजे 30 दिवस सामान्य आजारांसाठी, 2 वर्षे Specific Illnesses साठी (उदा., हर्निया, कॅटारॅक्ट) आणि 3 वर्षे Pre-existing Diseases साठी.

ऐड-ऑन्स (Add-ons) काय घेऊ शकता?

ऐड-ऑन्स म्हणजे एक्स्ट्रा फायदे जे तुम्ही तुमच्या मर्जीने पॉलिसीमध्ये Add करू शकता.

  1. Hospital Daily Cash: हॉस्पिटलच्या खर्चासाठी प्रतिदिन रक्कम मिळते, पण Premium जास्त द्याव लागत.
  2. Unlimited Restore: प्रत्येक क्लेमनंतर कव्हर पुनः वाढतो. (5 लाखची पॉलिसी. हॉस्पिटलमध्ये आजारपणासाठी 5 लाख गेले. तरी पुनः 5 लाखाचा कव्हर मिळतो)
  3. Critical Illness Cover: 51 गंभीर आजारांसाठी कव्हर मिळतो , पण Premium वयानुसार वाढते.
  4. Aggregate Deductible: Premium कमी करण्यासाठी क्लेम केल्यावर एक रक्कम स्वतः द्यावी लागते.
  5. Optima Well-being: फिटनेस क्लासेस, डायट सल्ला, मानसिक आरोग्य सेवा यासारख्या सुविधा घेऊ शकता.

निष्कर्ष

HDFC ERGO ची Optima Secure Policy ही एक Flexible आणि Comprehensive Health Insurance पॉलिसी आहे.

Room Rent च्या बंधनांपासून मुक्तता, Loyalty Benefit मुळे वाढणारा कव्हर, आणि AYUSH कव्हरसारखे फायदे यामुळे ही पॉलिसी मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी योग्य आहे.

मात्र, Maternity किंवा International Coverage नसल्यामुळे, या गरजा असल्यास इतर पॉलिसीचा विचार करावा.

पोस्ट वाचा: Health Insurance | हेल्थ इन्शुरन्स को-पेमेंट म्हणजे काय?

पोस्ट वाचा: Health Insurance | आरोग्य विमा म्हणजे नक्की काय? का गरजेचा आहे?

FAQs

Q1. Optima Secure मध्ये Waiting Periods आहेत का? होय. 30 दिवस सामान्य आजार, 2 वर्षे Specific Illnesses, 3 वर्षे Pre-existing Diseases.

Q2. काय Pre & Post Hospitalization कव्हर आहे? होय. हॉस्पिटलायझेशनच्या 60 दिवस आधी आणि 180 दिवस नंतरचा खर्च कव्हर.

Q3. AYUSH Treatments कव्हर होतात का? होय. आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी उपचार पूर्ण कव्हर.

Q4. Premium कशा प्रकारे ठरवले जाते? वय, ठिकाण (Zone), आरोग्य स्थिती, धूम्रपान/दारू सवयी, आणि Medical History वर अवलंबून.

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment