Health Insurance | आरोग्य विमा पॉलिसी Renew न करणे पडेल महागात!

Health Insurance in Marathi | आरोग्य विमा म्हणजे आजारी पडल्यास किंवा अपघात झाल्यास तुम्हाला आर्थिक मदत करणारी पॉलिसी. पण आज आपण अजयच्या गोष्टीतून शिकूया की आरोग्य विमा पॉलिसी न Renew करण्याची चूक किती महागात पडू शकते.

अजयने घेतलेला आरोग्य विमा

अजयचे वय ३१ वर्षे आहे. तो विवाहित असून त्याला ५ वर्षांची मुलगी आहे. त्याच्या कुटुंबात आई-वडीलही आहेत.

अजयने आपल्या कुटुंबासाठी दोन वेगवेगळ्या आरोग्य विमा पॉलिसी घेतल्या होत्या:

  1. आई-वडिलांसाठी वेगळी पॉलिसी – यासाठी तो दरवर्षी ₹40,000 प्रीमियम भरत होता.
  2. बायको, मुलगी आणि स्वतःसाठी वेगळी पॉलिसी – यासाठी तो ₹17,000 प्रीमियम भरत होता.

आई-वडिलांचे वय जास्त असल्याने त्यांची पॉलिसी तो दरवर्षी Renew करत होता, पण स्वतःच्या आणि कुटुंबाच्या पॉलिसीबद्दल त्याने मोठी चूक केली.

अजयने आरोग्य विमा का बंद केला?

  • पहिले वर्ष: कुणीही आजारी पडले नाही, त्यामुळे ₹17,000 वाया गेल्यासारखे वाटले.
  • दुसरे वर्ष: पुन्हा कोणतेही मोठे आजारपण नाही, त्यामुळे हॉस्पिटलचा खर्च शून्य आला.
  • तिसरे वर्ष: अजूनही आरोग्य चांगले होते, त्यामुळे अजयच्या मनात विचार आला – “या वर्षी काहीच झाले नाही, मग प्रीमियम भरून फायदा काय?”

आणि चौथ्या वर्षी अजयने मोठी चूक केली!

त्याने विचार केला, “आम्ही तंदुरुस्त आहोत, गेली तीन वर्षे काहीच झाले नाही, मग का उगाच प्रीमियम भरायचा?” आणि चौथ्या वर्षी त्याने पॉलिसी Renew न करता ते पैसे Mutual Fund मध्ये गुंतवले.

पण अचानक अपघात झाला!

एक दिवस अजय ऑफिसवरून घरी येताना त्याचा बाईक अपघात झाला. त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. उपचार झाले आणि हॉस्पिटल बिल ₹1,17,000 झाला. आणि हे बिल भरण्यासाठी त्याने FD तोडली आणि Mutual Fund मधून पैसे काढले.

जर अजयने आरोग्य विमा Renew केला असता तर?

जर तो ४ वर्षे दरवर्षी ₹17,000 भरत राहिला असता, तर – (प्रीमियम दर वर्षी 17,000 ते 18,000 मध्ये असेल पण आपण आता फक्त 17,000 घेऊ)

टोटल प्रीमियम खर्च: ₹68,000 (4 वर्षाचा)
हॉस्पिटल बिल: ₹1,17,000

म्हणजेच विमा Renew केला असता तर बिलाचे सगळे पैसे ₹1,17,000 विमा कंपनीने भरले असते. जर दर वर्षी पॉलिसी Renew केली असती तर जास्तीत जास्त ₹68,000 असा टोटल खर्च आला असता.

पण एकदम हॉस्पिटलच बिल एवढ मोठ आले जे अजयला FD आणि म्यूचुअल फंड तोडून भरावे लागले. म्हणून आरोग्य विमा पॉलिसी असावी. तुमच्या आजारपणासोबत, तुमच्या इतर गुंतवणुकीतून पैसे काढायची गरज तुम्हाला लागणार नाही.

या गोष्टीतून शिकण्यासारखे काय आहे?

✅ आरोग्य विमा हा खर्च नाही, तर सुरक्षिततेसाठी गुंतवणूक आहे.
✅ आपल्या सध्याच्या आरोग्याच्या स्थितीवर नाही, तर भविष्यातील अनिश्चिततेसाठी आरोग्य विमा घ्यावा.
✅ हॉस्पिटलचा खर्च अचानक येतो, आणि तो मोठ्या प्रमाणावर असतो.
✅ आरोग्य विमा नसल्यास तुम्हाला आपल्या गुंतवणुकीमधून पैसे काढावे लागू शकतात.

तुमच्यासाठी उपाय:

1️⃣ जर तुमच्याकडे आरोग्य विमा नसेल, तर आजच घ्या.
2️⃣ जर तुमच्याकडे विमा असेल, तर तो वेळेवर Renew करत राहा.
3️⃣ विमा हा एक सुरक्षात्मक उपाय आहे, त्यामुळे तो घेताना भविष्याचा विचार करा.

अजयसारखी चूक तुम्ही टाळू शकता. आरोग्य विमा वेळेवर Renew करा आणि अनपेक्षित खर्चाला सामोरे जाण्याची वेळ येऊ देऊ नका!

पोस्ट वाचा: Health Insurance | आरोग्य विमा म्हणजे नक्की काय? का गरजेचा आहे?

पोस्ट वाचा: Money Management | तुमचे पैसे दोन मार्गांनी वापरू शकता पण कोणता मार्ग योग्य आहे?

पोस्ट वाचा: Bull & Bear Market | बुल आणि बेअर मार्केट म्हणजे काय? यामधील संधी आणि धोके?

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment