How Much to Invest in SIP to Make ₹1 Crore in Marathi: 1 कोटी रुपयांचे आर्थिक लक्ष्य गाठणे कदाचित कठीण वाटू शकते, पण नियमित गुंतवणूक आणि चक्रवाढीच्या (Compounding) शक्तीच्या मदतीने ते सहज शक्य आहे. सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा तुमच्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रभावी मार्ग आहे, विशेषतः जेव्हा तुम्ही लॉन्ग टर्मसाठी सातत्याने गुंतवणूक करता.
Compounding ची ताकद आणि SIP
Compounding ची शक्ती वेळेनुसार वाढत जाते. गुंतवणुकीवर मिळणारे व्याज परत गुंतवले जाते, ज्यामुळे “व्याजावर व्याज” मिळते. यामुळेच लवकर सुरू करणे आणि सातत्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. समजा 15% वार्षिक रिटर्न मिळाला तर ₹1 कोटी मिळवण्यासाठी खालीलप्रकारे SIP करावी लागेल.
कालावधी | मासिक SIP रक्कम (₹) |
---|---|
30 वर्षे | ₹1,444 |
25 वर्षे | ₹3,083 |
20 वर्षे | ₹6,679 |
15 वर्षे | ₹14,959 |
10 वर्षे | ₹36,335 |
5 वर्षे | ₹1,12,899 |
महत्त्वाचे मुद्दे ज्यावर फोकस करा
लवकर सुरुवात करा भलेही रक्कम छोटी असेल: जर तुम्ही 25 व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, तर 30 वर्षांसाठी दरमहा फक्त ₹1,444 गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता. परंतु जर तुम्ही 35 व्या वर्षी सुरुवात केली, तर 20 वर्षांत हेच लक्ष्य गाठण्यासाठी तुम्हाला ₹6,679 दरमहा गुंतवावे लागतील.
वेळेचा प्रभाव खूप भारी असतो: 5 वर्षे आणि 10 वर्षांचा कालावधी यामध्ये मोठा फरक आहे. जर तुम्हाला फक्त 5 वर्षांत 1 कोटी रुपये मिळवायचे असतील, तर दरमहा ₹1,12,899 गुंतवावे लागतील. त्याउलट, 10 वर्षांसाठी हीच रक्कम ₹36,335 असेल.
वास्तविक अपेक्षा ठेवण कधीही चांगल: ही शेअर बाजारातून 15% वार्षिक वाढ दर (CAGR) ची अपेक्षा करणे प्रॅक्टिकल आहे. त्यापेक्षा अधिक रिटर्नच्या अपेक्षा ठेवणे जरा कठीण वाटत. आता एवढा रिटर्न मिळेल कुठे? त्यासाठी तुम्हाला फलेक्सि कॅप फंड, मिड कॅप फंड किंवा Small कॅप फंड (तेही जास्त रिस्क घेणारे असाल तर)
आता काही जण बोलतील 30 वर्षानी 1 कोटीची किंमत काय असेल?
खर बोलू तर प्रश्न चुकीचा नाहीये. कारण महागाईमुळे आताच्या 1 कोटीची कींमत 30 वर्षानी खूप कमी असेल. मग जर आपल्याला हे समजत आहे की 30 वर्षानी 1 कोटीची किंमत खूप कमी असेल तर आपण आता काय केल पाहिजे? उत्तर सिम्पल आहे. आपण आता जास्त पैसे इन्वेस्ट केले पाहिजेत. हो की नाही? म्हणून जेव्हा शक्य तेव्हा जास्त इन्वेस्ट कस करता येईल ते बघा.
निष्कर्ष
1 कोटी रुपये मिळवण्यासाठी नियोजनाची सुरुवात जितकी लवकर कराल, तितकी गुंतवणुकीची रक्कम कमी होईल. वेळ आणि संयम हीच Compoundingची खरी शक्ती आहे. त्यामुळे लगेच गुंतवणुकीस सुरुवात करा आणि तुमच्या आर्थिक ध्येयांकडे आत्मविश्वासाने पुढे जा.
ही पोस्ट वाचा: हायब्रिड म्यूचुअल फंड म्हणजे काय?
तुम्हाला योग्य म्युच्युअल फंड सल्लागार हवा आहे का?
तुमच्यापैकी अनेक जण स्वतःचा पोर्टफोलिओ स्वतः मॅनेज करत असाल, पण जर तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ व्यवस्थित डिझाईन आणि मॅनेज करण्यासाठी एक म्यूचुअल फंड सल्लागार हवा असेल, तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता.
मी गेल्या 4 वर्षांपासून इंस्टाग्राम पेजच्या माध्यमातून म्युच्युअल फंडसंबंधी नॉलेज आणि प्रॅक्टिकल टिप्स शेअर करत आहे. आता वैयक्तिक सल्ला देऊन तुमचं आर्थिक भविष्य अधिक चांगलं बनवण्यासाठी नक्कीच हेल्प करेन.
तुम्हाला मिळणारे फायदे:
- तुमच्या गरजेनुसार पोर्टफोलिओ डिझाईन: तुमच्या फिनान्शिअल गोल्स आणि रिस्क प्रोफाइलनुसार योग्य फंड निवडून देतो.
- ट्रॅकिंग आणि रिव्ह्यू: पोर्टफोलिओ सतत अपडेट राहील याची काळजी घेतो.
- वेळ आणि ऊर्जा वाचवा: गुंतवणुकीसाठी योग्य सल्ला मिळाल्यामुळे तुम्हाला वेळेवर निर्णय घेता येईल.
- लॉंग टर्म फायद्याचा दृष्टिकोन: तुमच्या गुंतवणुकीवर चांगले रिटर्न्स मिळण्यासाठी योग्य मार्गदर्शन.
तुमचा आर्थिक प्रवास सुकर आणि यशस्वी बनवण्यासाठी माझ्याशी Whats App वर संपर्क साधा!