Health Insurance Policy in Marathi | @marathifinance पेजच्या एका फॉलोअर, गणेश लिपटे, याने मला मेसेज केला की त्याला बेस्ट हेल्थ आणि टर्म इन्शुरेंस घ्यायचं आहे. थोडी हेल्प करा.
मी त्याला आधी हेल्थ इन्शुरेंस निवडण्याचा सल्ला दिला आणि मग टर्म इन्शुरेंसबद्दल विचार करायचं ठरवलं.
सहसा लोक हेल्थ इन्शुरेंस कसं निवडतात?
आपण सगळेच गुगल किंवा यूट्यूबवर “बेस्ट हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी” सर्च करतो.
नाहीतर पॉलिसीबाजारसारख्या वेबसाइट्सवर चेक करतो आणि जी पॉलिसी टॉपला दिसते ती निवडायचं ठरवतो.
गणेशनेही हेच केलं.
पण मी त्याला एक साधा आणि प्रभावी सल्ला दिला!
बेस्ट हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी कशी निवडावी?
१) तुमच्या शहरात कोणती हॉस्पिटल्स आहेत ते शोधा
गणेश चंद्रपूरच्या नकोंडा गावात राहतो. मी त्याला विचारलं की तिथे कोणती मोठी हॉस्पिटल्स आहेत? कारण आजारी पडल्यानंतर आपण जवळच्या हॉस्पिटलमध्येच जातो. गणेशने दोन हॉस्पिटल्स शोधली:
- मेहरा हॉस्पिटल
- आस्था हॉस्पिटल
मी त्याला सांगितलं की, त्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन फक्त एवढं विचारा – कोणत्या हेल्थ इन्शुरेंस कंपनीची क्लेम प्रोसेस सोपी आणि जलद आहे? त्याने ते केल.
२) हॉस्पिटलमध्ये TPA काउंटर तपासा
TPA (Third Party Administrator) म्हणजे इन्शुरेंस कंपन्यांच्या क्लेम प्रोसेससाठी असलेला काउंटर. हा प्रत्येक मोठ्या हॉस्पिटलमध्ये असतो. (आणि असलाच पाहिजे)
मेहरा हॉस्पिटलमध्ये काय झालं?
गणेश तिथे गेला, पण त्याला योग्य उत्तर मिळालं नाही. हॉस्पिटलमध्ये सांगितलं की इथे TPA काउंटर नाही.
माझ्या मते हे शक्य नाही कारण IRDAI (Insurance and Regulatory Authority of India) च्या नियमानुसार प्रत्येक हॉस्पिटलमध्ये TPA काउंटर असलाच पाहिजे.
मी स्वतः हॉस्पिटलला फोन केला आणि विचारलं – “तुमच्या हॉस्पिटलमध्ये कोणत्या इन्शुरेंस कंपनीचा क्लेम सहज होतो?”
त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे कॅशलेस सुविधा उपलब्ध नाही. आम्ही फक्त रिम्बर्समेंट देतो.
रिम्बर्समेंट म्हणजे आधी हॉस्पिटलचा जो काही खर्च असेल तो तुम्ही स्वता भरायचा. आणि जर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी असेल तर हॉस्पिटल तुमचे पैसे तुम्हाला हेल्थ इन्शुरेंस कंपनीकडून परत मिळवून देईल. (पण यापेक्षा कॅशलेस सुविधा कधीही बेस्ट)
कॅशलेस सुविधा म्हणजे काय?
जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये भरती झाला आणि तुमच्याकडे हेल्थ इन्शुरेंस असेल, तर हॉस्पिटलचा खर्च थेट इन्शुरेंस कंपनी भरते.
तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे द्यायची गरज नसते. पण मेहरा हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा नव्हती.

मग आस्था हॉस्पिटलमध्ये चौकशी केली!
गणेश मग आस्था हॉस्पिटलला गेला. मी सुद्धा तिथे फोन करून विचारलं – “इथे कोणत्या इन्शुरेंस कंपनीचा क्लेम सहज मंजूर होतो?”
त्यांनी पाच हेल्थ इन्शुरेंस कंपन्यांची नावं सांगितली:
- Medi Assist
- Aditya Birla General Insurance
- SBI General Insurance
- United India Insurance
- Oriental Insurance
आता गणेशला माहित होतं की त्याच्या भागात कोणत्या हेल्थ इन्शुरेंस कंपन्या चांगल्या सेवा देतात.
मी त्याला Aditya Birla Activ Fit प्लानबद्दल विचार करायला सांगितलं. (यावर एक डीटेल पोस्ट मी लवकरच बनवेन)
बेस्ट हेल्थ इन्शुरेंस कसं निवडाल?
- तुमच्या भागात कोणती हॉस्पिटल्स आहेत ते शोधा.
- त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी करा की कोणत्या हेल्थ इन्शुरेंस कंपनीची क्लेम प्रोसेस सोपी आहे.
- TPA काउंटरमध्ये विचारून खात्री करा की कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे का.
- सर्वात जलद आणि सहज क्लेम देणाऱ्या कंपनीची पॉलिसी निवडा.
हेल्थ इन्शुरेंस निवडताना थोडी मेहनत घ्या!
जेव्हा आपण नवीन मोबाइल घेतो, तेव्हा सगळ्या यूट्यूब व्हिडिओज पाहतो, फीचर्स चेक करतो, रिव्ह्यू वाचतो आणि मग खरेदी करतो.
मग हेल्थ इन्शुरेंस घेताना एवढी मेहनत का घेत नाही?
तुमच्या आरोग्यासाठी योग्य निर्णय घ्या – फक्त टॉप रँकिंग पॉलिसीवर विश्वास ठेऊ नका, तर प्रत्यक्ष चौकशी करून निर्णय घ्या.
पोस्ट वाचा: Health Insurance | आरोग्य विमा म्हणजे नक्की काय? का गरजेचा आहे?
पोस्ट वाचा: Health Insurance | आरोग्य विमा पॉलिसी Renew न करणे पडेल महागात!
पोस्ट वाचा: Nikhil Kamath WTFund | काय आहे WTFund? – जो भारताचे भविष्य घडवणारे स्टार्टअप्स बनवत आहे