Infosys Q4 Results: न्फोसिसने Q4 FY25 मध्ये ₹7,033 कोटीचा Net Profit जाहीर केला, जो मागील वर्षाच्या तिमाहीपेक्षा 12 % नी कमी आहे आणि विश्लेषकांच्या अपेक्षित ₹7,278 कोटीपेक्षा कमी राहिला. Consolidated Revenue ₹40,925 कोटीपर्यंत वाढला (7.9 % YoY), परंतु अंदाजित ₹42,133 कोटीपेक्षा कमी होता.
Operating Margins आणि Costs
इन्फोसिसचे EBIT Margin 21 % वर पोहोचले, जे मागील वर्षाच्या तिमाहीपेक्षा 90 basis points नी वाढले (विश्लेषकांचा अंदाज 20.7 %). January मधील बोनस आणि April मधील Wage hikes मुळे Operating Margins वर थोडा दबाव आला, तरीही कंपनीने FY26 साठी Operating Margin Guidance 20–22 % मध्ये कायम ठेवली.
FY26 ची तयारी सुरू
FY26 साठी इन्फोसिसने constant‑currency revenue growth 0–3 % अशी Guidance दिली आहे, जी FY25 साठी जानेवारीमध्ये दिलेल्या 4.5–5 % च्या Outlook पेक्षा कमी आहे. जागतिक आर्थिक अनिश्चिततेचा विचार करून हा tempered Outlook देण्यात आला आहे, तरीही डिजिटल आणि क्लाउड सेवांमध्ये वाढीची अपेक्षा आहे.
Geographic Performance
- North America (57.1 % revenue share): CC growth –0.4 %
- Europe: CC growth +15 %
- Rest of World: CC growth –2.2 %
- India: CC growth +43 %
यातून दिसते की युरोप आणि भारतात मजबूत वाढ झाली, तर उत्तर अमेरिकेत थोडी घट नोंदवली गेली.
Large Deals आणि TCV
Q4 मध्ये इन्फोसिसने large dealsworth $2.6 बिलियन जिंकल्या, ज्या Q3 मधील $3.2 बिलियन हून कमी आहेत. संपूर्ण FY25 साठी Total Contract Value (TCV) $11.6 बिलियन इतके राहिले.
FY25 मध्ये काय काय झाल
FY25 साठी Consolidated Revenue ₹1,62,990 कोटी (6.1 % YoY वाढ) आणि Net Profit ₹26,750 कोटी (1.9 % वाढ) नोंदवला. Operating Margin 21.1 % वरून 40 bps ने सुधारला आणि कंपनीने आतापर्यंतची सर्वात जास्त Free Cash Generation केली. तसेच, Interim Dividend ₹20 प्रति शेअर जाहीर केला. CEO Salil Parekh म्हणाले, “AI, Cloud आणि Cost Efficiency मधील आमची ताकद ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यास आम्हाला सक्षम बनवते.”
ही पोस्ट वाचा: IRFC, IRCTC आणि RVNL चे शेअर्स तेजीत; कुठल्या Railway PSU Stock ने आज कमावली बाजी