Mirae Asset Small Cap Fund NFO Review in Marathi: Mirae Asset Mutual Fund कंपनीने त्यांचा स्मॉल कॅप म्युच्युअल फंडचा NFO लॉन्च केला आहे. आता NFO (New Fund Offer) म्हणजे नक्की काय? जेव्हा एखादी म्युच्युअल फंड कंपनी पहिल्यांदा एखादी म्युच्युअल फंड स्कीम मार्केटमध्ये लोकांसाठी घेऊन येते, त्याला NFO असं म्हणतात.
Mirae Asset Small Cap Fund बद्दल महत्त्वाची माहिती:
हा एनएफओ 24 जानेवारी 2025 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी ओपन राहणार आहे. Mirae Asset Small Cap Fund च्या परफॉर्मन्सची तुलना Nifty Small Cap 250 Total Return Index सोबत केली जाईल. याचा अर्थ असा की जितका रिटर्न या इंडेक्समध्ये मिळेल, कमीत कमी तेवढा रिटर्न तरी या फंडने दिलाच पाहिजे. या फंडला भरत गोयल हे फंड मॅनेजर मॅनेज करणार आहेत. या फंडामधील 65% रक्कम स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवली जाईल तसेच उरलेली 35% रक्कम लार्ज कॅप किंवा मिड कॅप कंपन्यांमध्ये गुंतवली जाईल.
Mirae Asset Small Cap Fund मध्ये कोणी इन्वेस्ट करावं आणि कोणी करू नये?
लक्षात घ्या, हा एक एनएफओ आहे. याचा अर्थ या फंडने आधी कसा रिटर्न दिला होता याची माहिती तुम्हाला मिळणार नाही. तसेच, हा एक स्मॉल कॅप फंड आहे, ज्यामध्ये रिस्क जास्त आहे. जर तुम्ही रिस्क घ्यायला तयार असाल किंवा तुमचा गुंतवणुकीचा कालावधी पाच वर्षांपेक्षा जास्त असेल, तरच या फंडमध्ये इन्वेस्ट करा.
जर तुम्ही थोडक्यासाठी म्हणजेच एक, दोन, किंवा तीन वर्षांसाठी गुंतवणूक करणार असाल, तर या फंडपासून किंवा कोणत्याही स्मॉल कॅप फंडपासून दूर राहा. स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणूक करताना नेहमी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणे योग्य ठरते.
ही पोस्ट वाचा: Motilal Oswal Large and Mid-Cap Fund Review: गुंतवणूक करण्याआधी माहिती वाचा!