Money Management | पैशाच्या या ७ चुका तुम्ही करत आहात का? असेल तर थांबवा!

Money Management in Marathi | आपण सर्वजण मेहनतीने पैसा कमावतो, पण तो योग्य पद्धतीने वापरणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. चुकीच्या आर्थिक निर्णयांमुळे तुमची आर्थिक स्थिती कमजोर होऊ शकते.

जर तुम्हाला तुमच्या पैशांचा योग्य वापर करायचा असेल, तर खाली दिलेल्या आर्थिक चुका टाळणे आवश्यक आहे.

1. कोणतेही लोन हाताबाहेर जाऊ देऊ नका

लोन घेणे काहीवेळा आवश्यक असते, जसे की होम लोन. पण ते वेळेवर Repayment करणे खूप महत्त्वाचे आहे.

क्रेडिट कार्डचे EMI चुकवणे किंवा पर्सनल लोनचे EMI न भरणे, यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोरवर वाईट परिणाम होतो. आणि एकदा का क्रेडिट स्कोर बिघडला की पुन्हा लोन मिळणे कठीण होते. तसेच लोनचे डोंगर उभे राहतात, ते वेगळेच.

म्हणून कोणतेही लोन असो, ते वेळेवर फेडा.

2. जास्त खर्चाचे गुंतवणूक ऑप्शन निवडणे

काही Mutual Funds मध्ये मॅनेजमेंट फी आणि इतर चार्जेस खूप जास्त असतात.

जर तुम्ही यामध्ये गुंतवणूक केली, तर तुम्हाला मिळणारा निव्वळ Return कमी होईल. नेहमी कमी खर्चाचे Mutual Funds निवडा आणि त्यांचे पूर्वीचे Performance तपासा.

तसेच स्टॉक्स घेणे आणि सतत विकणे टाळा, कारण यात Transaction Cost जास्त लागतो.

3. रिसर्च न करता गुंतवणूक करणे

एखाद्या मित्राच्या सल्ल्याने किंवा सोशल मीडियावर पाहून डोळे झाकून गुंतवणूक करणे मोठी चूक आहे. प्रत्येक गुंतवणुकीची Risk आणि Return समजून घेऊनच निर्णय घ्या.

आपली पण कमाल आहे ना! नवीन मोबाइल घेताना सगळ्या व्हिडिओज यूट्यूबवर बघून टाकतो. त्या मोबाइलचे सगळे फीचर्स समजून घेतो.

पण हीच गोष्ट पैसे गुंतवताना सहसा करत नाही. तर असे करू नका. थोडी मेहनत घ्या, योग्य रिसर्च करा आणि मग पैसे गुंतवा.

4. खर्च ट्रॅक न करणे

कधी पैसे येतात आणि कधी जातात, याचा काही पत्ताच लागत नाही, ही आजकाल सगळ्यांची परिस्थिती आहे.

म्हणून खर्च लिहून ठेवणे आणि बजेट बनवणे खूप आवश्यक आहे. यामुळे सेव्हिंग्स वाढवण्यास मदत होते.

आजकाल एवढे ऑनलाइन ट्रॅकिंग अ‍ॅप्स मिळतात, तेही फ्रीमध्ये. डाउनलोड करा आणि तुमचे खर्च ट्रॅक करायला सुरुवात करा.

ते नसेल तर मोबाइलमध्ये Google Keep नावाचा अ‍ॅप डाउनलोड करा. त्यामध्ये खर्च लिहून ठेवा. (मी तर हेच करतो)

Money Management in Marathi, are you making these 7 money mistakes?

5. निष्काळजी मित्रांना पैसे उधार देणे

काही वेळा जवळच्या लोकांसाठी पैसे उधार देतो, पण ते वेळेवर परत मिळाले नाहीत, तर तुमची आर्थिक गणितं बिघडू शकतात.

पैशांच्या बाबतीत स्पष्ट बोला आणि स्वतःची आर्थिक सुरक्षितता कायम ठेवा.

मला माहीत आहे, पैसे मागणे जरा कठीण वाटते, भलेही ते आपलेच असूदेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. जर चुकीच्या मित्राला पैसे दिले, तर पैसे पण जातात आणि मैत्री पण जाते.

म्हणून सुरुवातीला ‘नाही’ बोलून पैसे वाचवा. जर तो मित्र नेहमीच पैसे द्यायला उशीर करत असेल, तर सावध राहा. जर मित्र चांगला असेल, तर त्याला मदत नक्कीच करा.

6. सर्व पैसे एका खात्यात ठेवणे

सर्व Savings एकाच ठिकाणी ठेवणे हे सुरक्षित वाटू शकते, पण हे चुकीचे आहे.

Emergency Fund, गुंतवणूक आणि खर्चासाठी वेगवेगळ्या खात्यात पैसे ठेवा.

प्रत्येक खात्याचे एक उद्दिष्ट असले पाहिजे.

  • एका खात्यात Emergency Fund चे पैसे ठेवा.
  • दुसऱ्या खात्यात फक्त गुंतवणुकीसाठी लागणारे पैसे ठेवा.
  • तिसऱ्या खात्यात खर्चासाठी लागणारे पैसे ठेवा.

असे केल्याने पैसे ट्रॅक करणे सोपे होते. (आणि आजकाल २-३ बँक अकाऊंट सहसा संगळ्यांकडे असतात)

7. भविष्यासाठी योजना न करणे

Retirement Planning, मुलांचे शिक्षण आणि आकस्मिक परिस्थितींसाठी आधीच योजना आखा. लहान Mutual Fund SIPs, स्टॉक्स किंवा PPF सारख्या साधनांमध्ये नियमित गुंतवणूक करा.

निष्कर्ष:

या आर्थिक चुका टाळल्यास तुम्हाला Money Management चांगले जमले, असे समजा.

यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि तुम्ही आपल्या आर्थिक उद्दिष्टांकडे आत्मविश्वासाने वाटचाल करू शकाल.

Financial Discipline ठेवल्यास तुम्हाला Long-Term Benefits नक्कीच मिळतील!

Social Media Links

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment