Money Management: आर्थिक संपत्ती ही फक्त बँकेमधील आकडा नव्हे तर…

Money Management Tips from The 5 Types Of Wealth: आजच्या गतिमान जगात, आर्थिक संपत्ती फक्त एकाच आकड्यात मोजली जाते: तुमची नेट वर्थ—म्हणजे तुमची मालमत्ता वजा कर्जे. पण खरं चित्र इतक्यापुरतं मर्यादित नाही. साहिल ब्लूम यांच्या The 5 Types Of Wealth या पुस्तकानुसार, तुमच्या कर्जांमध्ये तुमच्या अपेक्षा सुद्धा समावेश असतात. कारण तुमच्या अपेक्षा तुमच्या मालमत्तेपेक्षा जास्त वेगाने वाढत असतील, तर तुम्ही नेहमीच कमी वाटणाऱ्या “मला अजून हवय” च्या मागे धावत राहाल.

आज आपण सोप्या भाषेत The 5 Types Of Wealth या पुस्तकातील ५ Money Management Tips जाणून घेणार आहोत ज्या तुम्हाला खरी आर्थिक संपत्ती कशी निर्माण करायची हे शिकण्यास मदत करतील.

१. तुमच्यासाठी “पुरेसं” म्हणजे नक्की किती?

जर तुमची “पुरेसं” ची परिभाषा सतत बदलत राहिली, तर तुम्हाला कधीच समाधान मिळणार नाही. आज १ करोड, मग २ मग ३. हे आस चालून राहणार. यावर उपाय काय? आज १० मिनिटे काढून लिहा की “पुरेसं” म्हणजे तुमच्यासाठी नक्की किती? (घर, अन्न, आरोग्य, अनुभव). प्रत्येक ३ महिन्यांनी हा विचार पुन्हा करा.

२. उत्पन्न वाढवा

जास्त कमाई म्हणजे जास्त बचत आणि गुंतवणूक. हे अगदी साध गणित आहे. पण उत्पन्न वाढवायच कस? सुरुवात इथून करा:

  1. नवीन कौशल्ये शिका: कोडिंग, डिजिटल मार्केटिंग, डेटा विश्लेषण.
  2. साइड हसल: लेखन, ग्राफिक डिझाईन, ऑनलाइन ट्यूशन.
  3. डिजिटल उत्पादन: ई‑बुक, ऑनलाइन कोर्स, टेम्पलेट्स.

३. खर्च नियंत्रित करा

खर्चावर नियंत्रण म्हणजे संपूर्ण खर्च बंदी नाही, तर महत्वाच्या गोष्टींवर जास्त लक्ष. खर्च तीन वर्गात विभाजित करा:

  • आवश्यक: घरभाडे, किराणा, वीज-बिल आणि इतर
  • महत्त्वाचे पण लवचिक: आरोग्य, शिक्षण, अनुभव
  • इच्छानिर्मित: ऑनलाइन Subscription, मूड झाला की खरेदी (इच्छानिर्मित खर्चातून १०–२०% कपात करा आणि ती रक्कम बचत/गुंतवणुकीत टाका.)

४. कंपाऊंडिंगसह गुंतवणूक करा

वेळ आणि कंपाऊंडिंग हे तुमचे सर्वात मोठे मित्र आहेत. तुम्हाला करायचं हेच आहे की:

  • ऑटोमेट करा: दर महिन्याला ₹५००–₹१००० आपोआप गुंतवणूक खात्यात ट्रान्सफर करा.
  • विविधीकरण: कमी शुल्क असलेले म्युच्युअल फंड किंवा ETF निवडा.
  • दीर्घकालीन दृष्टी: बाजाराच्या चढ-उतारावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका.

५. नियमितपणे रिव्यू करा

तुमच्या गरजा, आकांक्षा आणि बाजारपेठ बदलत राहतात.

  • प्रत्येक ३ महिन्यांनी तुमची “पुरेसं” ची व्याख्या आणि नेट वर्थ तपासा.
  • बचत-गुंतवणूक वाढतेय की नाही याचा आढावा घ्या.
  • नवीन संधी शोधून तुमची आर्थिक योजना सुधारित करा.

निष्कर्ष

खरी आर्थिक संपत्ती ही फक्त नेट वर्थ नाही, तर ती मानसिक शांती आहे—जेव्हा तुमची कमाई तुमच्या अपेक्षा आणि कर्जांपेक्षा जास्त असते आणि तुमच्या गुंतवणुका दीर्घकाळ वाढतात. या पाच सोप्या स्टेप्सने तुम्ही “मला अजून हवय” च्या धावपळीवरून बाहेर येऊन, खऱ्या आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करू शकता.

Telegram Link

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment