Money Management Tips in Marathi | आजकाल इंस्टाग्रामवर “iPhone घेऊ नका”, “कार घेऊ नका” अश्या रील्सची गर्दी असते. खर बोलू तर डोकं फिरत कधी कधी.
तुम्ही पण सतत “हे करू नका, ते करू नका” ऐकून थकला असाल? काही जणांना हे सल्ले उपयोगी पडतात, पण सर्वांसाठी नाहीत.
खरं शहाणपण म्हणजे आनंदात जगत भविष्य सुरक्षित करणं. चला, यश आणि रोहितच्या स्टोरीमधून समजून घेऊया.
शहाणपणाचं नियोजन: यशची गोष्ट
यशने २३ वर्षाचा असताना ₹२०,००० पगारात नोकरी सुरू केली. पहिल्याच दिवसापासून त्याने ३ गोष्टींवर भर दिला:
१) विमा (Insurance): स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी Health Insurance घेतला. (हॉस्पिटल बिलचा स्ट्रेस मुक्त!)
Term Insurance (६५ वर्षांपर्यंतची सुरक्षा) ज्यामुळे त्याला काही झालं तर कुटुंबाची आर्थिक मदत होईल.
२) इमर्जन्सी फंड:
अनपेक्षित प्रसंगांसाठी ६ महिन्यांच्या पगाराइतका पैसा बाजूला ठेवला.
३) SIP गुंतवणूक:
म्युच्युअल फंड्समध्ये दरमहा ₹२,००० गुंतवले. (लहान रक्कम, पण नियमित!)
यशला iPhone घ्यायचं होतं, पण त्याने लगेच क्रेडिट कार्ड काढलं नाही. त्याऐवजी, दरमहा पगाराच्या १०% (₹२,०००) बाजूला काढून ठेवले.
६ वर्षांनी, २९ व्या वर्षी त्याने iPhone 16 खरेदी केलं. ६ वर्ष खूप होतात पण तो आयफोन न कर्ज काढतात, न कसला पश्चात्ताप करता त्याने घेतला होता.
तात्काळ आनंदाचा धोका: रोहितची चूक
रोहितने २०२४ मध्ये ₹२५,००० पगारात नोकरी सुरू केली. त्याच्या ३ चुका:
- पहिल्या ३ महिन्यांतच EMI वर iPhone 16 घेतला.
- Health/ Term Insurance किंवा इमर्जन्सी फंड निर्माण केला नाही.
- गुंतवणूक (SIP) म्हणजे “पगार वाढला की करू” असं मानलं.
iPhone चा आनंद तर मिळाला, पण गॅजेट बिघडलं की कर्ज. आजारपणात हॉस्पिटल बिल भरणं अशक्य. भविष्यासाठी शून्य बचत या मार्गावर तो चालत होता.
बचत + खर्च यामध्ये बॅलन्स कसा करावा?
१) प्राधान्य द्या: पहिला पगार विमा, इमर्जन्सी फंड, गुंतवणूक यांना द्या.
२) स्वप्नांसाठी वाचवा: “फालतू खर्च” नव्हे, पण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दरमहा ५-१०% वेगळे ठेवा.
३) SIP म्हणजे मॅजिक: दरमहा ₹५००-१०००ही चालेल. कंपाऊंड इंटरेस्टमुळे ही रक्कम २० वर्षांत कोटीरुपये होऊ शकते!
यशचा फंडा हाच होता की, आजचा आनंद आणि उद्याची सुरक्षा—दोन्ही जमवणं शक्य आहे.
सोशल मीडियाचे सल्ले डोळे मिटून घेऊ नका
“iPhone घेऊ नका” यात काही तथ्य नाही. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते.
जर तुमचा पगार ₹५०,००० असेल आणि EMI ₹८,००० असेल, तर हे रिस्की आहे कारण कमाईचा मोठा भाग आयफोन घेण्यात जात आहे.
पण जर EMI ₹३,००० असेल आणि बचत/इन्व्हेस्टमेंट नियोजित असेल, तर आयफोन घेण्यात काही चुकीचं नाही.
निष्कर्ष:
“हे नको, ते नको” म्हणण्यापेक्षा “हे मी कसं घेऊ शकतो, ते मी कसं घेऊ शकतो” यावर लक्ष द्या.
यशसारखे व्हा. जबाबदारीने खर्च करा, पैसे वाढवा, आणि मनाप्रमाणे जगा.
आणि हेही लक्षात ठेवा—सुरुवातीच्या वर्षांमध्ये केलेली बचत म्हणजे भविष्यातल स्वातंत्र्य!
पोस्ट वाचा: Money Management | नुसत पैसे सेव्ह करायचे आहेत बोलून काही होणार नाही – त्यापेक्षा हे काम करा!
पोस्ट वाचा: TCS Salary Hike | टीसीएसमध्ये पगारवाढीची घोषणा – २०२५-२६ साठी ४-८% वाढ