Motilal Oswal Large and Mid-Cap Fund Review: गुंतवणूक करण्याआधी माहिती वाचा!

Motilal Oswal Large and Mid-Cap Fund Review in Marathi: कोणत्याही म्यूचुअल फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करण्याआधी त्याला समजून घेणे गरजेच आहे. लार्ज आणि मिड कॅप फंड ही अशी कॅटेगरी आहे जिथे तुम्ही इन्वेस्ट केलेले काही पैसे लार्ज कॅप कंपन्यांमध्ये इन्वेस्ट केले जातात तर काही पैसे मिडकॅप कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केले जातात.

लार्ज आणि मिड कॅप फंड कंपन्या कंपन्या म्हणजे काय?

सेबीनुसार मार्केटमधील टॉप 100 कंपन्यांना लार्ज कॅप कंपन्या असे म्हणतात. आणि त्यापुढे 101 नंबरची कंपनी ते 250 पर्यंत, या कंपन्यांना मिडकॅप कंपन्या असे म्हणतात. आणि जो म्युच्युअल फंड या दोन्ही प्रकारच्या कंपन्यांमध्ये थोडे थोडे पैसे इन्व्हेस्ट करतो त्याला लार्ज आणि मिड कॅप फंड असे म्हणतात. Motilal Oswal Large and Mid-Cap Fund हा त्याच फंडपैकी एक आहे.

Motilal Oswal Large and Mid-Cap Fund बदल महत्त्वाची माहिती:

Motilal Oswal Large and Mid-Cap Fund ची सध्याची NAV (Net Asset Value) ₹36.78 आहे. या फंडमध्ये गुंतवणूक सुरू करण्यासाठी तुम्ही फक्त ₹500 पासून सुरुवात करू शकता, जे त्याला खूपच परवडणारे बनवते. या फंडची एकूण साइज ₹6,500 कोटी एवढी आहे, म्हणजेच एवढा पैसा सध्या फंड मॅनेज करत आहे. सध्या या फंडमध्ये एकूण 32 कंपन्या आहेत, ज्यामध्ये Zomato, Trent, Kalyan Jewellers यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. Expense Ratio म्हणजेच फंड मॅनेजरची फी 0.53% एवढी आहे, जी Large and Mid Cap Fund साठी योग्य मानली जाते.

या फंडमध्ये कोणी गुंतवणूक करावी आणि कोणी करू नये?

जर तुम्हाला तुमच्या पैशासोबत जास्त रिस्क घ्यायची इच्छा नाही पण तुम्हाला रिटर्न थोडेफार जास्त हवेत तर तुम्ही या फंडमध्ये पैसे गुंतवू शकता. या फंडमध्ये काही Large Cap कंपन्या असतात त्यामुळे फंडला स्थिरता येते. तसेच Mid Cap कंपन्या असल्यामुळे चांगले रिटर्न देखील मिळतात. या फंडमधे पैसे गुंतवताना कमीत कमी ३ वर्षाचा कालावधी ठेवावा. आता कोणी या फंडमध्ये पैसे गुंतवू नये हे सांगायचं झालं तर, ज्यांना रिस्क नको आहे. कमी रिटर्न आला तरी चालेल. तर अशा गुंतवणूकदारांनी या फंडपासून दूर राहावं.

या फंडने आतापर्यंत किती रिटर्न दिला आहे?

Motilal Oswal Large and Mid Cap Fund ने गेल्या 1 वर्षांत 40.14% तर 3 वर्षात 25.28% आणि गेल्या 5 वर्षात 26.01% एवढा जबरदस्त रिटर्न दिला आहे. यापुढे पण असा रिटर्न मिळेल का? आता हे पूर्णपणे मार्केट आणि फंड मॅनेजरची रिसर्च यावर अवलंबून आहे.

या फंडमध्ये पैसे कसे गुंतवावे?

आजकाल कोणत्याही फंड मध्ये पैसे गुंतवण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. तुम्ही Zerodha Coin, Groww, Asset Plus सारखे ॲप्स वापरु शकता. तुम्हाला ॲप्स वापरण कठिण वाटत असेल तर बँक किंवा advisor ची मदत घेऊन तुम्ही पैसे या फंडमध्ये गुंतवू शकता.

ऑनलाईन गुंतवा की ऑफलाईन. पैसे गुंतवणे हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्हाला म्युचुअल फंड पोर्टफोलिओ बनवायला म्युचुअल फंड Advisor हवा असेल तर माझ्याशी संपर्क साधा. मला 9372334632 या नंबरवर WhatsApp करा. मी नक्किच मार्गदर्शन करेन. मी एक AMFI रजिस्टर म्युच्युअल फंड Advisor आहे.

ही पोस्ट वाचा: Axis Blue Chip Fund Review: गुंतवणूक करण्याआधी वाचा!

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment