Mukesh Ambani यांच्या Reliance Industries ने जहाजबांधणी व्यवसायात आपली भागीदारी वाढवली आहे. Reliance ने जाहीर केलं की त्यांनी Nauyaan Shipyard Pvt Ltd (NSPL) मध्ये आणखी 10% हिस्सा खरेदी केला आहे.
हा व्यवहार Reliance च्या Nauyaan Tradings Pvt Ltd (NTPL) या उपकंपनीमार्फत करण्यात आला आहे. यासाठी NTPL ने Welspun Corp Ltd कडून ₹51.72 कोटी देऊन हा हिस्सा खरेदी केला आहे. Reliance ने सांगितलं की हा व्यवहार पूर्णपणे नियमांनुसार आणि बाजारभावानुसार झाला असून, कंपनीच्या इतर गटांच्या किंवा प्रमोटर्सचा यामध्ये कोणताही संबंध नाही.
याआधी March 2025 मध्ये NTPL ने 74% हिस्सा Welspun Corp कडून खरेदी करून NSPL ला Reliance चा भाग बनवलं होतं.
Nauyaan Shipyard ही कंपनी July 2021 मध्ये स्थापन झाली असून, या कंपनीकडे Reliance च्या Dahej (Gujarat) येथील उत्पादन केंद्राजवळ 138 एकर जागेचा लीज अधिकार आहे. या बातमीच्या पार्श्वभूमीवर April 11 रोजी Reliance Industries चा शेअर NSE वर ₹1220 पर्यंत पोहोचला आणि 3% नी वाढला.