Mutual Fund मध्ये गुंतवणूक करताना 4 महत्त्वाच्या चुका टाळा!

Mutual Fund Investment in Marathi | भारतातील Mutual Fund Industry ₹68.04 लाख कोटी AUM (Assets Under Management) सह झपाट्याने वाढत आहे.

जानेवारी 2025 मध्ये, इक्विटी म्युच्युअल फंड्सचे AUM ₹29.46 लाख कोटी होते, तर SIP (Systematic Investment Plan) द्वारे ₹26,400 कोटीची गुंतवणूक झाली.

पण, FII सेलिंग, ट्रम्प टॅरिफची भीती, आणि कंपन्यांची कमकुवत कमाईसारख्या कारणांमुळे शेअर मार्केटमध्ये करेक्शन सुरू आहे. अशा वेळी गुंतवणूकदार चुकीचे निर्णय घेतात.

या आर्टिकलमध्ये, आपण Mutual Fund मधील 4 महत्त्वाच्या चुका आणि त्यावरचे उपाय शिकणार आहोत, ज्यामुळे तुम्ही लाँग-टर्म फायनान्शियल गोल्स साध्य करू शकाल.

१) Mutual Fund च्या पास्ट परफॉर्मन्सवर अवलंबून राहणे

अनेक गुंतवणूकदार इक्विटी म्युच्युअल फंड्स निवडताना फक्त मागील 1-2 वर्षांच्या रिटर्न्स पाहतात.

पण, AMFI डेटा दाखवतो, की मार्केट परिस्थिती आणि फंड मॅनेजरच्या स्ट्रॅटेजी बदलत असतात.

त्याऐवजी यावर लक्ष द्या:

  • फंडची 5-10 वर्षांची सातत्यपूर्ण परफॉर्मन्स बघा.
  • फंड मॅनेजरचा अनुभव आणि इन्व्हेस्टमेंट प्रक्रिया तपासा.
  • सेबी रेग्युलेशन्स प्रमाणे फंड चालत आहे ना त्याकडे लक्ष द्या.

२) पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन करणे तेही प्रमाणाबाहेर

ओव्हर-डायव्हर्सिफिकेशन (जास्त फंड्स) आणि अंडर-डायव्हर्सिफिकेशन (कमी फंड्स) दोन्ही धोकादायक कधीही असतात.

योग्य पद्धत ही आहे:

  • रिस्क टॉलरन्स नुसार इक्विटी, डेट, आणि हायब्रिड फंड्समध्ये संतुलन बनवा.
  • डेट फंड्स vs इक्विटी फंड्स यांचे फायदे समजून घ्या.
  • एकाच सेक्टर किंवा कंपन्यांवर अवलंबून न राहता विविधीकरण करा.

३) रिस्क टॉलरन्स विचारात न घेता गुंतवणुक करणे

काही गुंतवणूकदार अग्रेसिव्ह ग्रोथ फंड्स जस की Small Cap Funds निवडतात, पण मार्केट घसरल्यावर घाबरतात. उपाय:

  • फायनान्शियल प्लॅनिंग करताना स्वतःचा रिस्क टॉलरन्स ओळखा. तुम्ही किती रिस्क घेऊ शकता हे तुम्हाला माहीत हवं.
  • तरुण गुंतवणूकदारांसाठी इक्विटी, तर मध्यम वयीनांसाठी बॅलन्स्ड फंड्स योग्य आहेत.
  • Best Mutual Fund शोधताना फक्त रिटर्न्स नव्हे, तर रिस्क फॅक्टर पण पहा.

४) Mutual Fund गुंतवणूक करता मार्केट टायमिंगचा प्रयत्न

मार्केट टायमिंग हा सर्वात मोठा भ्रम आहे.

उदाहरणार्थ, 2024-25 मध्ये FII सेलिंग आणि मार्केट करेक्शनमुळे अनेकांनी घाबरून फंड्स रिडीम केले.

मार्केट वर आल्यावर पुन्हा पैसे गुंतवू असा अनेकांचा प्लॅन असतो. पण अस केल्याने रिटर्न बनवायची संधी जाते.

त्याऐवजी तुम्ही हे करा:

  • SIP चा फायदा घ्या कारण रुपी कॉस्ट अव्हरेजिंगद्वारे भाव कमी असताना जास्त युनिट्स मिळतात.
  • तुमच्या SIP मध्ये Auto-Debit सुविधा सुरू करा. पैसे बँक अकाउंट मधून आपोआप कट होतील आणि Mutual Fund मध्ये गुंतविले जातील.
  • लाँग-टर्म इन्व्हेस्टमेंट (5-7+ वर्षे) करून मार्केट व्हॉलॅटिलिटी टाळा. जितकं जास्त वेळ देणार तितकं चांगल आहे.

शेअर मार्केट करेक्शन दरम्यान काय करावे?

  • घाबरण्याऐवजी SIP सुरू ठेवा.
  • पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग करून नवीन संधी शोधा.
  • सेबी-रेग्युलेटेड फंड्स आणि AMFI च्या डेटावर विश्वास ठेवा.

निष्कर्ष

म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ही शिस्त आणि संयमाची परीक्षा आहे.

वरील 4 चुका टाळून, रिटेल इन्व्हेस्टर्स चांगला प्रॉफिट मिळवू शकतात.

लक्षात ठेवा: शेअर मार्केट गुंतवणूक हे शॉर्टकट नसून, आर्थिक स्वातंत्र्याचा पाया आहे!

पोस्ट वाचा: Best Mutual Fund | का “बेस्ट” म्यूचुअल फंडच्या मागे लागू नये?

Social Media Links

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment