Mutual Fund Exit in Marathi | म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताना, योग्य वेळेची चर्चा हमखास होते.
पण म्युच्युअल फंडमधून बाहेर पडण्याची योग्य वेळ कधी आहे, यावर फार कमी लोक चर्चा करतात.
शेअर बाजार उच्चांक गाठत असताना किंवा मोठ्या घसरणीच्या वेळी हा प्रश्न सामान्यतः उद्भवतो.
आज आपण म्युच्युअल फंडमधून बाहेर पडण्याच्या 4 प्रमुख कारणांवर चर्चा करू आणि एक योग्य Exit Strategy कशी तयार करावी हे पाहू.
1. शेअर मार्केट सुसाटमध्ये नवीन उच्चांक गाठत असताना
शेअर मार्केट उच्चांक गाठत असताना अनेक गुंतवणूकदार अधिक नफा मिळवण्याच्या आशेने भरपूर गुंतवणूक करतात.
अशावेळी अनेक लोक न समजलेल्या शेअर्समध्ये पैसे लावतात. हा उत्साह टिकत नाही आणि नंतर शेअर मार्केट घसरणीला सामोरे जातो.
ही चिन्हे लक्षात ठेवा
- कमाईचा आधार नसलेल्या कंपन्यांच्या किमतीत वाढ
- एक्स्पर्टकडून वाढती किंमत समजून घेण्यात अपयश
- Penny Stocks मध्ये वाढती गुंतवणूक
- IPOs ची प्रचंड मागणी
जर असे संकेत दिसले तर नफा बुक करण्याचा विचार करा आणि गुंतवणूक काढून घ्या.
तुमची Exit Strategy काय असेल?
Small-cap आणि Large-cap शेअर्सच्या किंमतींची तुलना करा. जर Small-cap शेअर्स Large-cap पेक्षा 10% अधिक महाग वाटत असतील तर नफा बुक करा.
पुन्हा गुंतवणूक कशी आणि कुठे करावी?
Gold, Short-Term Debt Funds, किंवा Fixed Deposits मध्ये गुंतवणूक करा जेणेकरून बाजारातील घसरणीपासून तुमच्या नफ्याचे संरक्षण होईल.
2. Financial Goals पूर्ण झाल्यावर
तुमचे गुंतवणूक उद्दिष्ट गाठल्यावर म्युच्युअल फंडमधून बाहेर पडणे योग्य आहे. उदाहरणार्थ:
- जर घर खरेदीसाठी गुंतवलेले पैसे जमा झाले असतील, तर गुंतवणूक काढा.
- रिटायरमेंटसाठी गुंतवणूक करत असाल आणि लक्ष्य गाठले असल्यास, इक्विटीमधून पैसे काढून सुरक्षित पर्यायात ठेवा.
हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे:
दीर्घकालीन उद्दिष्ट जवळ आले असता, हळूहळू इक्विटीमधून काढून Debt Funds किंवा Fixed Deposits मध्ये पैसे हलवा.
उदाहरण: जर तुम्हाला 20 लाखांचा फ्लॅट घ्यायचा आहे आणि तुम्ही 18 लाख जमा केले आहेत, तर उर्वरित पैसे सुरक्षित गुंतवणुकीत ठेवा.
अस करून बाजार घसरल्यास मोठा तोटा टाळता येईल.
3. Investment Portfolio Rebalance करताना
तुमच्या गुंतवणुकीचा जोखमीचा स्तर कायम राखण्यासाठी नियमितपणे पोर्टफोलियो रिबॅलन्स करा. अस नको व्हायला की Equity मध्ये जास्त पैसे आहेत आणि बाकी ठिकाणी कमी.
उदाहरण:
60% Equity आणि 40% Debt असलेल्या पोर्टफोलियोत शेअर बाजार 30% वाढला तर इक्विटीचा वाटा वाढतो.
अशावेळी इक्विटी विकून Debt मध्ये गुंतवा, जेणेकरून पोर्टफोलियो पुन्हा 60:40 होईल. यामुळे प्रॉफिट पण बुक होतो आणि जोखीम पण कमी होते.
4. Fund Underperformance देत असल्यास
जर म्युच्युअल फंड इतर फंडांपेक्षा सातत्याने कमी रिटर्न देत असेल तर तो फंड बदलण्याचा विचार करा.
इतर कारणे:
- फंडाच्या गुंतवणूक धोरणात मोठे बदल झाल्यास.
- SEBI च्या नियमांनुसार फंडाच्या श्रेणीत झालेला बदल.
तुमच्या गुंतवणूक उद्दिष्टाशी जुळणारा फंड निवडणे आवश्यक आहे.
Exit करण्यापूर्वी लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी:
- Exit Load: काही फंड लवकर काढल्यास फी आकारतात.
- Capital Gains Tax: नफा मिळाल्यास कर लागू शकतो.
- Tax Harvesting: कर कमी करण्यासाठी योजना तयार करा.
निष्कर्ष
म्युच्युअल फंडमधून बाहेर पडण्याचा निर्णय हा गुंतवणूक धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे.
योग्य वेळी Exit करून नफा सुरक्षित करणे आणि नुकसान टाळणे शक्य आहे.
वरील धोरणांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे सर्वोत्तम नियोजन करू शकता.
पोस्ट वाचा: Mutual Fund SIP | एसआईपी बंद होण्यामध्ये वाढ, गुंतवणूकदारांमध्ये चिंता – कारणे?