NACH Mandate Information in Marathi: NACH म्हणजे National Automated Clearing House. याचा सोपा अर्थ असा होतो की म्युचुअल फंड SIP केल्यावर त्याचे पैसे बँक अकाउंटमधून आपोआप कट व्हावे यासाठी केलेली सिस्टम. NACH Mandate ला Autopay अस देखील म्हटलं जात.
NACH Mandate का गरजेचं आहे?
तुम्ही स्वतः विचार करा. जर तुम्ही एखादी म्युच्युअल फंड SIP केलीत तर त्याचे पैसे तुम्ही स्वतःहून एका ठराविक तारखेला SIP मध्ये जमा करणार का? तुम्ही हे करू शकता पण अनेकदा अस होत की आपण कामात असतो, विसरून जातो आणि पैसे इन्व्हेस्ट करायचे राहून जातात. हे होऊ नये म्हणून NACH Mandate द्यावं लागत.
NACH Mandate किती वेळा द्याव लागतं?
आजकाल ऑनलाईन ॲप्स जस की Groww, Assetplus, Zerodha Coin किंवा इतर इन्व्हेटिंग ॲप्स हे एकदाच १ लाख पर्यंतचा NACH Mandate घेऊन ठेवतात. मग तुम्ही १ लाखपर्यंत हव्या तेवढ्या SIP करा तुम्हाला सारखं NACH Mandate द्यावं लागत नाही.
पण जर तुझी बँकमधून म्युच्युअल फंड SIP करत असाल तर ते प्रत्येक SIP साठी वेगळं NACH Mandate घेतात. म्हणजे १००० ची SIP केली तर १००० रुपयाचं NACH Mandate फॉर्म. अजून २००० ची SIP केली तर अजून एक NACH Mandate फॉर्म. लक्षात घ्या NACH Mandate चे प्रत्येक बँकचे वेगवेगळे चार्जेस असतात.
१ लाखच NACH Mandate दिलं तर बँक अकाउंटमधून पैसे किती कट होणार?
अनेकांना हा प्रश्न पडतो जर मी १ लाखाच NACH Mandate दिलं तर माझ्या बँक अकाऊंटमधून १ लाख तर जाणार नाहीत ना? तर अस अजिबात होणार नाही. जर तुम्ही ५०० ची SIP केली तर फक्त ५०० रुपये जाणार आणि ५००० ची SIP केली तर ५००० जाणार.
ही पोस्ट वाचा: Best SIP Date: एसआयपी करण्यासाठी बेस्ट तारीख कोणती?