Parag Parikh Flexi Cap: आजच्या काळात गुंतवणूक ही केवळ पैसे साठवण्याचं साधन नाही, तर ती भविष्याची आर्थिक सुरक्षा मिळवण्याचं प्रभावी शस्त्र ठरत आहे. त्यात Parag Parikh Flexi Cap फंड हा एक असा फंड आहे जो गुंतवणूकदारांच्या विश्वासाला सार्थ ठरत आहे. अलीकडेच या फंडाने ₹1 लाख कोटींचा AUM पार करून मोठं यश मिळवलं आहे.
Flexi Cap म्हणजे काय?
Flexi Cap Fund म्हणजे असा म्युच्युअल फंड जो मोठ्या, मध्यम आणि लहान कंपन्यांमध्ये गरजेनुसार गुंतवणूक करतो. याचा फायदा असा की मार्केटमध्ये बदल झाले तरी फंड मॅनेजर विविध कंपन्यांमध्ये पैसे हलवू शकतो आणि स्थिर रिटर्न मिळवू शकतो.
Parag Parikh Flexi Cap ने दिलेले रिटर्न्स
या फंडाने गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने चांगले रिटर्न्स दिले आहेत:
- 3 वर्षे: 23.92%
- 5 वर्षे: 29.07%
- 10 वर्षे: 18.26%
या रिटर्न्समधून दिसतं की हा फंड लांब पल्ल्याच्या गुंतवणुकीसाठी अतिशय योग्य आहे.
जर तुम्ही दर महिन्याला ₹3,000 SIP केली असती तर?
कालावधी | एकूण गुंतवणूक | मिळालेला परतावा | अंतिम रक्कम |
---|---|---|---|
3 वर्षे | ₹1,08,000 | ₹44,924 | ₹1,52,924 |
5 वर्षे | ₹1,80,000 | ₹1,88,142 | ₹3,68,142 |
10 वर्षे | ₹3,60,000 | ₹5,80,331 | ₹9,40,331 |
वरून स्पष्ट होते की, दर महिन्याची SIP थांबवली नाही आणि संयम ठेवला तर तुम्ही लाखोंचं संपत्ती तयार करू शकता.
Parag Parikh Flexi Cap कडून शिकण्यासारख्या गोष्टी
✅ सातत्य महत्त्वाचं आहे – दर महिन्याची SIP चालू ठेवणं हे यशाचं गुपित आहे.
✅ लांब पल्ल्याचा विचार करा – टाईम जसा वाढतो, तसा रिटर्न कमी होतो, पण एकूण फायदा मात्र वाढतो.
✅ प्लॅनला चिकटून राहा – मार्केट खाली वर होत राहतो, पण तुमचं लक्ष दीर्घकालीन प्रॉफिटवर असावं.
SIP सुरू करा, संयम ठेवा आणि तुमचं आर्थिक स्वप्न साकार करा.
ही पोस्ट वाचा: NACH Mandate म्हणजे काय? SIP करताना का द्यावं लागत?