Parag Parikh Flexi Cap Fund | पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंड रिव्यू २०२५ मराठीमध्ये!

Parag Parikh Flexi Cap Fund Review in Marathi | गुंतवणूक ही भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेचा पाया आहे. यात Mutual Fund हा एक लोकप्रिय पर्याय आहे.

विविध प्रकारच्या म्युच्युअल फंड्समध्ये, Flexi Cap Fund हा सध्या गुंतवणूकदारांमध्ये अधिक लोकप्रिय होत आहे.

या आर्टिकलमध्ये आपण Parag Parikh Flexi Cap Fund ची संपूर्ण माहिती मराठीत समजून घेऊ जेणेकरून या फंडमध्ये पैसे गुंतवावे की नाही हे तुम्हाला स्पष्ट होईल.

Flexi Cap Fund म्हणजे काय?

SEBI नुसार, फ्लेक्सी कॅप फंड हा एक इक्विटी-ओरिएंटेड म्युच्युअल फंड आहे, ज्यामध्ये किमान ६५% गुंतवणूक इक्विटीमध्ये केली जाते.

या फंडला लार्ज-कॅप, मिड-कॅप, किंवा स्मॉल-कॅप कंपन्यांमध्ये मुक्तपणे गुंतवणूक करण्याची मुभा असते.

म्हणजे फंड मॅनेजर मार्केटमध्ये जशी चांगली गुंतवणुकीची संधी मिळेल त्यानुसार फंडमधील पैसे गुंतवू शकतो.

Parag Parikh Flexi Cap Fund ची मूलभूत माहिती

  • NAV (25 फेब्रुवारी 2025 रोजी): ₹८४.२९
  • SIP गुंतवणूक: किमान ₹१,००० प्रति महिना
  • लम्पसम गुंतवणूक: कमाल ₹१,०००
  • फंडाचा आकार: ₹८९,७०३ कोटी
  • मुख्य होल्डिंग्ज: HDFC बँक, बजाज होल्डिंग्ज, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, गोआल इंडिया, ITC इ.
  • खर्चाचे प्रमाण (Expense Ratio): ०.६३% (सरासरीपेक्षा कमी)
  • एग्झिट लोड: ३६५ दिवसांच्या आत रिडीम केल्यास २% शुल्क
  • फंड व्यवस्थापक: राजीव ठाक्कर, रौनक ओंकार, राज मेहता, रुकुन ताराचंदानी, मानसी करिये

Parag Parikh Flexi Cap Fund ने आता पर्यंत किती Return दिला आहे?

  • १ वर्ष: १२.१०%
  • ३ वर्ष: १८.९९%
  • ५ वर्ष: २४.३०%
  • ७ वर्ष: १९.५९%
  • १० वर्ष: १७.८९%

मला माहीत आहे भूतकाळातील रिटर्न भविष्याची हमी देत नाही, पण या फंडने सतत चांगले रिटर्न दिले आहेत. अस नाही की एक वर्ष खूप सारा रिटर्न मिळतो आणि एक वर्ष काहीच नाही.

Parag Parikh Flexi Cap Fund मध्ये गुंतवणुकीचे फायदे

१. लवचिकता: शेअर बाजारातील सर्व कॅटेगरी (लार्ज, मिड, स्मॉल) मध्ये गुंतवणूक करून रिस्क कमी करता येते.
२. व्यावसायिक व्यवस्थापन: अनुभवी फंड व्यवस्थापकांकडून नियोजित गुंतवणूक.
३. दीर्घकाळात उच्च परतावा: इतिहासातून दिसून येणारा स्थिर परतावा.
४. कमी खर्च: ०.६३% खर्चाचे प्रमाण इतर फंड्सपेक्षा किफायतशीर.

Parag Parikh Flexi Cap Fund मध्ये गुंतवणूक कशी करावी?

१. ऑनलाइन ऍप्सद्वारे: Groww, Zerodha Coin, Asset Plus सारख्या प्लॅटफॉर्मवर SIP किंवा लम्पसम गुंतवणूक करणे एकदम सोप आहे. पण तुम्हाला स्वतला फंड्स निवडावे लागतील.
२. थेट फंड वेबसाइट किंवा APP: PPFAS म्युच्युअल फंडच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा App वर जावून तुम्ही पैसे गुंतवू शकता.
३. सल्लागारांच्या मदतीने: गुंतवणुकीत नवीन असल्यास, म्युच्युअल फंड सल्लागारांकडून मार्गदर्शन घ्या. उगाच नको तो फंड निवडून नुकसान करून घेण्यापेक्षा हे कधीची बेस्ट. (तुम्ही मला कॉनटॅक्ट करू शकता जर योग्य सल्ला हवा आहे)

Parag Parikh Mutual Fund कंपनीविषयी

PPFAS म्युच्युअल फंडची स्थापना २०१३ मध्ये प्रख्यात गुंतवणूकदार पराग परीख यांनी केली. ग्राहकांना अधिक माहितीसाठी किंवा तक्रारींसाठी अधिकृत वेबसाइट www.ppfas.com वर भेट देता येईल.

तसेच, कस्टमर केअर क्रमांक +९१-२२-६१३२-६१०० किंवा टोल-फ्री क्रमांक 1800-266-7790 वर संपर्क साधता येऊ शकतो. ईमेलद्वारे माहिती मिळवण्यासाठी mf@ppfas.com वर मेल पाठवता येईल, तसेच व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक 91-80109-24178 वरही संपर्क साधता येईल.

PPFAS म्युच्युअल फंडचे कार्यालय 81/82, 8 वा मजला, साखर भवन, रामनाथ गोयंका मार्ग, 230, नरिमन पॉईंट, मुंबई – 400 021, महाराष्ट्र, भारत येथे स्थित आहे.

निष्कर्ष

Parag Parikh Flexi Cap Fund हा Long Term मध्ये स्थिर रिटर्न देणारा, रिस्क नीट मॅनेज करणारा आणि अनुभवी टीमद्वारे चालविला जाणारा फंड आहे.

पण, गुंतवणुकीपूर्वी तुमची आर्थिक उद्दिष्टे, रिस्क सहनक्षमता विचारात घेऊनच निर्णय घ्यावा. आवश्यक असल्यास, विशेषज्ञांचा सल्ला अवश्य घ्या!

पोस्ट वाचा: Best Mutual Fund | का “बेस्ट” म्यूचुअल फंडच्या मागे लागू नये?

Social Media Links

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment