Share Market Outlook: गेल्या आठवड्यात शेअर बाजार थोडा शांत होता. त्याआधी सलग तीन आठवडे बाजारात जोरदार तेजी होती. मात्र भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे गुंतवणूकदारांनी थोडी भीती व्यक्त केली आणि त्यामुळे शुक्रवारी शेअर्समध्ये विक्री झाली. शनिवारी रात्री दोन्ही देशांमध्ये सीजफायर जाहीर झाल्यामुळे पुन्हा बाजार स्थिर होईल अशी अपेक्षा आहे.
या आठवड्यात बाजाराला हलवू शकणाऱ्या ३ महत्वाच्या गोष्टी:
तिमाही निकाल आणि महागाईचे आकडे
या आठवड्यात भारत सरकार CPI (Consumer Price Index) आणि WPI (Wholesale Price Index) चे आकडे जाहीर करणार आहे. तसेच काही मोठ्या कंपन्यांचे तिमाही निकाल येणार आहेत – PVR INOX, टाटा स्टील, भारती एअरटेल, गेल, हिरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, गोदरेज इंडस्ट्रीज. यामुळे संबंधित शेअर्समध्ये चढ-उतार होऊ शकतो.
FII आणि DII यांची हालचाल
गेल्या आठवड्यात FII (परदेशी गुंतवणूकदार) यांनी ₹5087 कोटींची खरेदी केली. तर DII (देशी गुंतवणूकदार) यांनी ₹10,450 कोटींचा गुंतवणूक वाढवली. जर गुंतवणूक सुरूच राहिली, तर बाजाराला चांगला आधार मिळू शकतो.
भारत-पाकिस्तान सीजफायर आणि जागतिक घडामोडी
पहलगाममधील हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. पण शनिवारी रात्री सीजफायर झाल्यामुळे बाजारात स्थिरता येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रशियाने युक्रेनसोबत कोणत्याही अटीशिवाय चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर शांततेचे वातावरण निर्माण होऊ शकते – गुंतवणूकदारांसाठी ही चांगली बातमी आहे.
थोडक्यात
महागाईचे आकडे, कंपन्यांचे तिमाही निकाल, गुंतवणूकदारांची खरेदी-विक्री, आणि जागतिक तणाव कमी होणे –
या सगळ्यांचा परिणाम या आठवड्यात शेअर बाजारावर होऊ शकतो.
ही पोस्ट वाचा: Buddha Purnima 2025: शेअर मार्केट खुलं की बंद?