Share Market | गुंतवणूक निर्णयांवर भावनांचा प्रभाव आणि त्यावर मात करण्याचे सोपे उपाय!

Share Market Investment in Marathi | गुंतवणुकीचे निर्णय घेताना आपण सहसा भावनांच्या प्रभावाखाली येतो.

त्यामुळे चुकीच्या वेळी गुंतवणूक (High ला खरेदी आणि Low ला विक्री) करून आपल्या Financial Goals पासून दूर जाऊ शकतो.

या ब्लॉगमध्ये आपण गुंतवणुकीवर परिणाम करणाऱ्या 5 Emotions आणि Emotional Investing टाळण्याचे उपाय पाहू.

#1: भीती:

बाजार कोसळत असताना नुकसानीची भीती पदरात येते.

या वेळी होणारे नुकसान हे Paper Losses असते (तात्पुरते). पण भीतीने गुंतवणूक विकल्यास Real Loss होतो.

उलट, ह्या वेळी अधिक गुंतवणूक (जेवढे शक्य) केल्यास Bull Market मध्ये मोठा फायदा मिळू शकतो.

#2: पश्चात्ताप:

Bear Market मध्ये गुंतवणूक केल्यानंतर बाजार आणखी घसरल्यास पश्चात्ताप होतो.

पण, योग्य वेळी गुंतवणूक केल्यानेच Long Term मध्ये चांगले Return मिळते. म्हणून, घाबरून गुंतवणूक विकू नका.

#3: आशा:

Bull Market मध्ये अतिरिक्त आशेमुळे High Price वर खरेदी केल्याने नुकसान होते.

बाजाराचा Timing करण्यापेक्षा, आपल्या Financial Goals नुसार Systematic गुंतवणूक करावी.

#4: नकार:

खराब झालेल्या गुंतवणुकीला न जुमानणे हानिकारक ठरते.

उदा, एखादी Policy Change किंवा Management बदलामुळे Investment चे Performance कायमस्वरूपी बिघडू शकते.

अशा वेळी Reality स्वीकारून ती गुंतवणूक बदलणे योग्य राहील.

#5: लोभ:

बाजार Historic High वर पोहोचल्यावरही लोभामुळे अधिक गुंतवणूक केल्याने नुकसान होते.

मार्केटच्या चढउतारांऐवजी तुमच्या Financial Goals ला प्राधान्य द्यावे. आणि त्यानुसार गुंतवणुक करावी.

Emotional Investing टाळण्यासाठी 6 टिप्स:

1) Mutual Funds मध्ये गुंतवणूक: Share Market ची रिस्क Expert Fund Managers हाताळतात. म्हणून, Mutual Funds हा सुरक्षित आणि सोपा पर्याय आहे.

2) बाजाराच्या Volatility मध्ये शांत राहा: Paper Losses हे तात्पुरते असतात. Panic Selling टाळून Long Term गुंतवणुक स्वीकारा.

3) Long Term Investment: Mutual Funds मध्ये Long Term (५-७+ वर्षे) गुंतवणूक केल्यास Volatility चा परिणाम कमी होतो आणि Returns वाढतात.

4) Goal-Based Planning: Education, Retirement सारख्या Goals ठरवून त्यानुसार SIP किंवा FD मध्ये गुंतवणूक करा.

5) Portfolio Diversification: Equity (Growth), Debt (Stability), आणि Gold (Safety) अशा विविध Asset Classes मध्ये गुंतवणूक करून Risk कमी करा.

6) Financial Advisor चा सल्ला घ्या: नियमितपणे Expert सोबत आपल्या Portfolio चे Review करावे. (तुम्ही मला देखील कॉन्टॅक्ट करू शकता जर योग्य Mutual Fund निवडण्यासाठी हेल्प हवी आहे)

Conclusion:

तुमच्या Emotions पेक्षा तुमच्या Financial Goals वर लक्ष केंद्रित करा.

Mutual Funds, Diversification, आणि Long Term Planning मदतीने तुम्ही सुस्थिर आर्थिक भविष्य निर्माण करू शकता.

डोकं शांत ठेवून आणि मग निर्णय घेऊन Emotional Investing वर मात करा!

पोस्ट वाचा: Share Market | शेअर बाजाराच्या चढ-उतारांशी मैत्री कशी करावी?

Social Media Links

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment