SIP Vs Lump Sum – मी कोणता मार्ग निवडू?

Mutual Fund मध्ये SIP आणि Lump Sum गुंतवणूक या दोन्ही लोकप्रिय पद्धती आहेत. पण यापैकी कोणती पद्धत तुमच्यासाठी बेस्ट आहे हेच तुम्हाला या आर्टिकलमध्ये शिकायला मिळेल. या दोन्ही पद्धतींचे सोप्या मराठीत स्पष्टीकरण दिले आहे:

Social Media Links

SIP म्हणजे काय?

SIP (Systematic Investment Plan) म्हणजे ठराविक अंतराने नियमितपणे एक निश्चित रक्कम गुंतवणे.

  • मासिक गुंतवणूक: दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवता.
  • बदलती NAV: प्रत्येक महिन्याला गुंतवणुकीच्या वेळी बाजाराच्या स्थितीनुसार वेगवेगळ्या NAV (Net Asset Value) वर युनिट्स मिळतात.
  • सरासरीचा फायदा: विविध किंमतीवर गुंतवणूक केल्याने गुंतवणुकीची सरासरी किंमत कमी असते, ज्यामुळे बाजारातील चढ-उताराचा धोका कमी होतो.
  • कंपाऊंडिंगचा लाभ: लवकर गुंतवलेले पैसे जास्त काळ कंपाऊंडिंगचा फायदा मिळवतात.

हा मार्ग त्यांना योग्य आहे ज्यांच्याकडे एकाच वेळी मोठी रक्कम नाही किंवा ज्याना हळूहळू गुंतवणूक करायला आवडते.

Lump Sum गुंतवणूक म्हणजे काय?

Lump Sum गुंतवणूक म्हणजे एकाच वेळी संपूर्ण मोठी रक्कम गुंतवणे.

  • तात्काळ गुंतवणूक: एकदाच गुंतवल्यानंतर संपूर्ण रक्कम लगेच मार्केटमध्ये जाते.
  • बाजाराची स्थिती: गुंतवणूक करताना त्या दिवशीच्या बाजाराच्या स्थितीचा थेट परिणाम होतो. मार्केट खाली पडल असेल तर चांगल. स्वस्त मध्ये मस्त माल मिळतो.
  • मोठ्या भांडवलासाठी: जर तुमच्याकडे मोठी रक्कम असेल आणि तुम्ही तात्काळ शेअर बाजाराचा फायदा घ्यायचा असेल तर हा पर्याय योग्य आहे.

SIP कशी काम करते?

SIP मध्ये तुमची रक्कम वेगवेगळ्या टाइमनुसार गुंतवली जाते.
उदाहरणार्थ:

  • 1 जानेवारीला 3000 रुपये गुंतवले तर ती रक्कम त्या दिवशी (किंवा दुसऱ्या दिवशी) शेअर बाजारात जाते आणि त्यावर रिटर्न मिळू लागतो.
  • 2 फेब्रुवारीला पुन्हा 3000 रुपये गुंतवले तर तीही रक्कम त्या दिवशी बाजारात जाते. म्हणजे वेगवेगळ्या टाइमनुसार तुमचा पैसा मार्केटमध्ये जातो.

Lump Sum Investment कशी काम करते?

एकदाच संपूर्ण रक्कम गुंतवल्यानंतर लगेच शेअर बाजाराच्या स्थितीनुसार रिटर्न सुरू होतो.

  • जर गुंतवणूक करताना बाजार अनुकूल असेल तर जास्त लाभ होऊ शकतो.
  • पण, जर शेअर बाजार डाऊन असेल तर संपूर्ण गुंतवणूकीवर परिणाम होऊ शकतो.

SIP vs. Lump Sum: कोणता पर्याय निवडावा?

लहान किंवा नियमित गुंतवणूकदारांसाठी:

  • SIP हा उत्तम पर्याय आहे.
  • नियमित, लहान-लहान गुंतवणूक करण्याची सोय देते.
  • शेअर बाजारातील चढ-उतारापासून बचाव करण्यास मदत करते.

मोठ्या रकमेच्या गुंतवणूकदारांसाठी:

  • Lump Sum गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.
  • ही गुंतवणूक लगेच शेअर बाजारामध्ये लाभ घेण्याची संधी देते.
  • परंतु, यामध्ये शेअर बाजारातील चढ-उताराचा धोका देखील असतो.

महत्वाची गोष्ट

SIP आणि Lump Sum दोन्ही पद्धती योग्य आहेत. गुंतवणुकीची पद्धत तुमच्या आर्थिक उद्दिष्टांवर, जोखीम सहन करण्याच्या क्षमतेवर आणि उपलब्ध भांडवलावर अवलंबून असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुंतवणूक सुरु करणे आणि नियमितपणे गुंतवणूक करत राहणे. लक्षात ठेवा, सुरुवात करणे, नियमित गुंतवणूक करणे आणि वेळेनुसार तुमच्या पैशात वाढ करणे हेच महत्त्वाचे आहे.

Social Media Links

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment