TATA Motors Q4 Results: Tata Motors Ltd. ही भारतातील एक आघाडीची वाहन उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी Jaguar Land Rover (JLR) ची मातृसंस्था सुद्धा आहे. टाटा मोटर्सने 1 मे रोजी आपल्या Q4 FY25 Results जाहीर केले आणि यावेळी कंपनीने विक्रमी नफा कमावला आहे.
टाटा मोटर्सचा Net Profit ₹8,470 कोटी
मार्च 2025 तिमाहीत टाटा मोटर्सचा net profit ₹8,470 कोटी झाला आहे. CNBC-TV18 च्या अंदाजानुसार हा नफा ₹7,841 कोटी होईल असा अंदाज होता, मात्र प्रत्यक्षात हा नफा खूपच जास्त निघाला. हा टाटा मोटर्सच्या इतिहासातील सर्वात जास्त नफा आहे.
Revenue ₹1.19 लाख कोटी
कंपनीचा एकूण revenue ₹1.19 लाख कोटी झाला आहे, जो की थोडा CNBC-TV18 च्या ₹1.23 लाख कोटींच्या अंदाजापेक्षा कमी आहे.
तरीही, हा कंपनीच्या वाढत्या व्यवसायाचा स्पष्ट पुरावा आहे.
EBITDA ₹16,992 कोटी आणि EBITDA Margin 14.2%
कंपनीचे EBITDA ₹16,992 कोटी झाले असून, EBITDA margin 14.2% आहे – हे मागील वर्षासारखेच आहे पण अंदाजापेक्षा चांगले आहे.
JLR Results: 10 व्या तिमाहीतही नफा
टाटा मोटर्सची युनिट Jaguar Land Rover (JLR) ने मार्च तिमाहीत £7.7 billion revenue कमावला आहे, जो की अंदाज (£8.04 billion) पेक्षा थोडा कमी आहे. पण JLR चा EBITDA margin 15.3% आहे, जो की अपेक्षेपेक्षा चांगला आहे. JLR ची ही दहावी सलग तिमाही आहे जिथे कंपनी नफ्यात आहे. JLR ने FY25 संपेपर्यंत positive cash flow टार्गेट पूर्ण केले आहे.
टाटा मोटर्स आता कर्जमुक्त (Debt Free)
टाटा मोटर्सने सांगितले की कंपनी आता consolidated level वर debt free झाली आहे, त्यामुळे कंपनीचे interest costs कमी होतील.
Commercial Vehicle Business demerger ला shareholders ची मंजुरी मिळालेली आहे, आणि आता हा विभाग एक स्वतंत्र कंपनी म्हणून लिस्ट केला जाईल.
Interim Dividend ₹6 प्रति शेअर
टाटा मोटर्सने ₹6 per share dividend जाहीर केला आहे.
Tata Motors Share Price अपडेट
निकाल जाहीर होण्याआधी टाटा मोटर्सचा share price ₹708.3 वर बंद झाला, जो की 1.7% नी खाली आला होता. पण 52-week low ₹535 पासून स्टॉकने ₹150 पेक्षा अधिक रिव्हर्ह केली आहे.
ही पोस्ट वाचा: Bharti Airtel Q4 Results: 432% नफा वाढ, ₹16 डिविडेंड जाहीर