Simple Term Insurance vs Return of Premium in Marathi | विजय इंस्टाग्रामवर मराठी फायनान्स पेजचा फॉलोवर आहे. त्याच वय 28 वर्षे आहे.
त्याने कुटुंबाच्या भविष्यासाठी टर्म इन्शुरन्स घ्यायचं ठरवलं आहे, पण तो कन्फ्यूज आहे: “साधं टर्म इन्शुरन्स घ्यावं की प्रीमियम परत मिळणारा (रिटर्न ऑफ प्रीमियम) प्लॅन?” घ्यायचा.
चला यावर डिटेलमध्ये चर्चा करू. तुम्हाला पण काही गोष्टी नवीन समजतील आणि विजयच कन्फ्यूजन पण दूर होईल.
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?
टर्म इन्शुरन्स हा सर्वात स्वस्त आणि सोपा लाइफ कव्हर आहे. तुम्ही ठरावीक कालावधीसाठी (उदा. 65 वयापर्यंत) प्रीमियम भरता.
तुमचं निधन झालं तर कुटुंबाला ₹1 कोटी मिळतात. जर तुम्ही 65 पर्यंत जगलात, तर पॉलिसी संपते आणि काहीही परत मिळत नाही. हे फक्त प्रोटेक्शन आहे, इन्व्हेस्टमेंट नाही.
आता विजय पुढील २ ऑप्शनमध्ये कन्फ्युज आहे. समजून घेऊत काय आहेत हे ऑप्शन्स.
Option 1: सिंपल टर्म इन्शुरन्स
- वय: 28 वर्षे
- पॉलिसी टर्म: 65 वर्षांपर्यंत (37 वर्षे)
- कव्हर: ₹1 कोटी
- मासिक प्रीमियम: ₹1,200
- 37 वर्षांत एकूण खर्च: ₹5.32 लाख
तुमच्यासाठी योग्य का?
- स्वस्त: ₹1,200 प्रतिमहिना म्हणजे दररोज फक्त ₹40
- जास्तीत जास्त प्रोटेक्शन: तुम्हाला काही झालतर ₹1 कोटीने कुटुंबाचे लोन, शिक्षण, राहणीमान सुरक्षित होतं.
- सोपी अटी: काही क्लिष्ट नियम नाहीत — अगदी स्ट्रेटफॉरवर्ड.
Option 2: रिटर्न ऑफ प्रीमियम ऑप्शन
- वय: 28 वर्षे
- पॉलिसी टर्म: 65 वर्षांपर्यंत (37 वर्षे)
- कव्हर : ₹1 कोटी
- मासिक प्रीमियम: ₹1,700 (दरमहा ₹500 जास्त)
- एकूण प्रीमियम: ₹7.54 लाख
- सर्व्हायव्हल बेनिफिट: 65 वयात जगलात तर सगळे प्रीमियम परत (₹7.54 लाख).
पण तुम्ही खालील गोष्टींवर लक्ष द्या
- 42% जास्त पैसे: दरमहा ₹500 जास्त तेही 37 वर्षांसाठी
- इन्फ्लेशनचा धोका: ३७ वर्षे म्हणजे 2062 पर्यन्त. आणि त्यावेळी मिळणारे ₹7.54 लाख नक्की किती किमतीचे असतील?
5% इन्फ्लेशन धरलं तर, 37 वर्षांनंतर ₹7.54 लाख ≈ आजच्या ₹1.3 लाख एवढे
निष्कर्ष: “परत मिळणारे प्रीमियम” हा फक्त भ्रम आहे. ही इन्शुरन्स कंपन्यांची मार्केटिंग टॅक्टिक आहे.
मग यापैकी स्मार्ट पर्याय काय असेल?
सिंपल टर्म इन्शुरन्स + ₹500 इन्व्हेस्ट करा
रिटर्न ऑफ प्रीमियम ऑप्शनमध्ये ₹500/महिना वाया घालवण्याऐवजी, ते पैसे इंडेक्स फंड मध्ये गुंतवा. त्यावर फक्त १२% रिटर्न मिळाला तरी ₹34.7 लाख मिळतील.
- मासिक SIP: ₹500
- कालावधी: 37 वर्षे
- अंदाजे रक्कम: ₹34.7 लाख
हे तुमच्यासाठी जास्त फायद्याचं का आहे?
- ₹34.7 लाख vs ₹7.54 लाख: तुम्ही स्वता तुलना करून बघा. फक्त ५०० रुपये इन्वेस्ट करून 4.5 पट जास्त पैसे मिळवू शकता.
- लिक्विडिटी: गरज पडल्यास इन्व्हेस्टमेंट मधून पैसे काढू शकता. Tरिटर्न ऑफ प्रीमियम ऑप्शनमध्ये 65 वर्षांपर्यंत वाट बघावी लागेल.
- इन्फ्लेशनला मात: इक्विटी मार्केट इन्फ्लेशनपेक्षा वेगानं वाढतं, रिटर्न ऑफ प्रीमियम ऑप्शनच्या “रिटर्न” सारखं नाही. जेवढे इन्वेस्ट करणार तेवढेच पुनः मिळणार.
विजयने काय केल पाहिजे?
- लक्ष्य: प्रोटेक्शन हवं की कमी रिटर्नची सेव्हिंग्स प्लॅन? हे स्पष्ट करा. टर्म इन्शुरन्स फक्त प्रोटेक्शनसाठी आहे.
- गणित: रिटर्न ऑफ प्रीमियम ऑप्शनचा “प्रीमियम रिटर्न” हा फक्त मार्केटिंग ट्रिक आहे. नंबर काही खोटे बोलत नाहीत.
- शिस्त: जर एक्स्ट्रा ५०० रुपये नियमितपणे इन्वेस्ट केले तर चांगले रिटर्न नक्कीच मिळतील.
तुमच्यासाठी अंतिम सल्ला
- सिंपल टर्म इन्शुरन्स घ्या: ₹1,200/महिना देऊन ₹1 कोटीचा कव्हर सिक्युर करा.
- वाचलेले ₹500 इन्व्हेस्ट करा: लो-कॉस्ट इंडेक्स फंड मध्ये SIP सुरू करा. किंवा हवा तो म्यूचुअल फंड घ्या.
- नियमित रहा: 37 वर्षांनंतर, तुमच्याकडे ₹34 लाख+ आणि मनाचं समाधान असेल.
विजय सारख स्मार्ट बना.
टर्म इन्शुरन्सचा उद्देश रिस्क कव्हर आहे, रिटर्न नाही. पैसे वाढवायचं काम इन्व्हेस्टमेंटवर सोडा. त्यासाठी स्टॉक्स किंवा म्यूचुअल फंड आहेत.
पोस्ट वाचा: Zero Cost Term Insurance | झीरो कॉस्ट टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?