Varun Beverages Share News in Marathi | गुरुवार, 27 फेब्रुवारी 2025 रोजी Varun Beverages Ltd. च्या शेअर्समध्ये 7% पर्यंत घसरण नोंदवली गेली.
ही घसरण मंगळवारी झालेल्या 4% च्या घटनेनंतर सुरू आहे. केवळ दोन ट्रेडिंग सेशनमध्ये (मंगळवार आणि गुरुवार) कंपनीच्या शेअर्समध्ये 10% पेक्षा जास्त correction आले आहे.
Varun Beverages Share मध्ये घसरणीची कारणे?
1) Ghana Bottling Co. सोबत कराराचा कालावधी वाढवला:
नोव्हेंबर 2023 मध्ये जाहीर केलेल्या करारानुसार, Varun Beverages ने Ghana Bottling Co. कडून SBC Beverages Ghana चा 100% हिस्सा ₹127.1 कोटीमध्ये विकत घेणे होते.
मात्र, ह्या कराराचा अंमलबजावणीचा कालावधी (consummation date) 28 फेब्रुवारी 2025 ऐवजी आता 31 मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आला आहे.
2) 2025 मध्ये 31% ची घसरण:
या वर्षात Varun Beverages चे शेअर्स 31% पेक्षा जास्त खाली आले आहेत. 2016 साली लिस्टिंग झाल्यापासून कंपनीच्या शेअर्सनी कधीही negative annual returns दिले नव्हते.
Varun Beverages Share वर ब्रोकरेज फर्म्सचे मत
HSBC चे “Buy” रेटिंग: HSBC ने या महिन्यात Varun Beverages वर “Buy” रेटिंग कायम ठेवले आहे आणि टार्गेट प्राईस ₹670 सेट केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीची net cash position भविष्यातील strategic opportunities साठी फायद्याची ठरू शकते.
Emkay आणि CLSA चे उच्च टार्गेट: Emkay (₹802) आणि CLSA (₹800) सारख्या ब्रोकरेज फर्म्सनी Varun Beverages साठी 80% पेक्षा जास्त upside असल्याचे सांगितले आहे.
इतर ब्रोकरेज opinions: JPMorgan, Jefferies, आणि Axis Capital यांनीही ₹700 पेक्षा जास्त टार्गेट प्राईस दिला आहे.
Varun Beverages Share ची सद्यची स्थिती
गुरुवारी शेअर प्राईस ₹446.45 आली असून टोटल 6.3% घसरण झाली आहे. तसेच फेब्रुवारी 2025 मध्ये एकूण 15% घसरण Varun Beverages Share मध्ये झाली आहे.
पोस्ट वाचा: Share Market Crash | शेअर मार्केटमध्ये खरा लॉस कधी होतो?