Warren Buffett यांचे यश – तुमच्या जन्माच्या तारखेचा गुंतवणुकीवर होणारा प्रभाव?

Warren Buffet | प्रसिद्ध लेखक Morgan Housel यांच्यामते, जर महान गुंतवणूकदार Warren Buffett आज ४० वर्षाचे असते, तरी त्यांना यश मिळाले असते यात काही शंका नाही पण भूतकाळात जितके मिळाले त्या प्रमाणात नाही.

Morgan Housel यांनी त्यांच्या नवीन पुस्तक “Same as Ever” मध्ये नोंदवल्याप्रमाणे, “१९६० आणि १९७० च्या दशकात Warren Buffett नी त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग बनविला, तेव्हा त्यांनी blue-chip कंपन्या फक्त २ पट earnings (कमाई) वर विकत घेतल्या.

आज अशा संधी उपलब्ध नाहीत. जर Warren Buffett चा जन्म २० वर्षांनी उशिरा झाला असता, तर त्यांच्या कारकिर्दीत हे यश शक्य झाले नसते.”

Morgan Housel हे “The Psychology of Money” या न्यू यॉर्क टाइम्स बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक आहेत. त्यांची पुस्तके जगभरात 8 दशलक्षाहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत आणि ती 60 पेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत.

Morgan Housel नक्की काय म्हणाले?

CNBC-TV18 च्या प्रशांत नायर यांसोबत “The Psychology of Investing” या सत्रात बोलताना, हाउसेल यांनी स्पष्ट केले की,

“Warren Buffett हे त्यांच्या जन्मकालाचे प्रॉडक्ट आहेत. त्यांना एका अशा काळात गुंतवणूक सुरू करण्याची संधी मिळाली, जिथे कमी valuation मध्ये उत्कृष्ट कंपन्या मिळू शकत होत्या. आजच्या शेअर मार्केटमध्ये तशी परिस्थिती नाही.”

Warren Buffett हे बर्कशायर हॅथवे या बहुराष्ट्रीय कंपनीचे Chairman आणि CEO आहेत. गेल्या ६ दशकांत त्यांनी गुंतवणुकीत अभूतपूर्व यश मिळवले, ज्यामुळे त्यांना “गुंतवणूकीचे भगवान” म्हटले जाते.

तुमच्या लाइफमध्ये ही गोष्ट कशी लागू होते?

तुमच्या जीवनातील गुंतवणूक आणि आर्थिक निर्णयांवर तुम्ही जन्मलेल्या काळाचा मोठा प्रभाव पडतो.

उदाहरणार्थ, 80 च्या दशकात जन्मलेल्या माझ्या दादा-ताईंनी नोकरी तर केली, परंतु Share Market किंवा Mutual Fund बद्दल माहिती नसल्यामुळे कधीही गुंतवणूक सुरू केली नाही. त्यामुळे त्यांनी कंपाऊंडिंगचा लाभ मिळवू शकले नाही. सोबत त्यावेळी पैसे गुंतविणे खुप कठीण होते. हे फॉर्म्स भरा ते फॉर्म्स भरा. डोक्याला ताप.

पण याउलट, 90 च्या दशकात किंवा नंतर जन्मलेल्या लोकांना (म्हणजे आपल्यासारखी तरुण मंडळी) कॉलेजपासूनच Share Market आणि Mutual Fund सारख्या विषयांची माहिती मिळते. आज यूट्यूब आणि अन्य ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून माहिती सहज उपलब्ध आहे, तर गुंतवणूक करणेही अतिशय सोपे झाले आहे.

उदाहरणार्थ, Groww, Zerodha Kite किंवा Asset Plus (म्यूचुअल फंडसाठी बेस्ट) सारख्या Investing Apps मुळे आपण आपल्या आर्थिक भविष्यासाठी योग्य गुंतवणूक अगदी झटपट आणि पटपट करू शकतो.

निष्कर्ष:

Morgan Housel यांच्या मते, इन्व्हेस्टिंगचे नियम आणि संधी काळानुसार बदलतात.

Warren Buffett चे यश केवळ त्यांच्या कौशल्यावरच नव्हे, तर त्यांना लाभलेल्या ऐतिहासिक संधींवरही अवलंबून होते. आजच्या जटिल आणि स्पर्धात्मक Share Market त्यांची पद्धत तितकीच यशस्वी होईल का, यावर शंका आहे.

म्हणून तुम्ही डायरेक्ट स्टॉक्स घेत नसाल तर सरल Mutual Fund चा मार्ग निवडा. चांगले Mutual Funds घ्या तेही वेगवेगळ्या कॅटेगरीचे. आणि Long Term साठी इन्वेस्ट करा.

Social Media Links

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment