Budget म्हणजे बचत, खर्च, आणि Investing चा एक नियोजन ज्यामध्ये तुमच्या कमाईचा ठराविक कालावधीसाठी योग्य वापर केला जातो.

50-30-20 Rule हा एक सोपा मार्ग आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची कमाई तीन भागात विभागू शकता:

1) 50% for Needs: तुमच्या कमाईचा अर्धा भाग अत्यावश्यक खर्चासाठी वापरा. यात घरभाडे, वीज, पाणी आणि किराणा सामान यांचा समावेश आहे.

2) 30% for Wants: तुमच्या कमाईचा 30% भाग अशा गोष्टींवर खर्च करा ज्या गरजेच्या नसून ज्या तुम्हाला आनंद देतात, जसे की बाहेर जेवण किंवा मनोरंजन.

3) 20% for Savings: तुमच्या कमाईचा 20% भाग Savings आणि Investing साठी राखून ठेवा. यामुळे तुम्ही आपत्कालीन परिस्थितींसाठी तयार राहू शकता आणि भविष्यातील गरजांसाठी पैसे जपू शकता.

जर तुमच्या गरजेच्या (Needs) खर्चामुळे 50% पेक्षा जास्त हिस्सा लागत असेल तर, Wants मधील खर्च कमी करणे गरजेचे असते. 

त्याचप्रमाणे, गरज कमी असतील तर, Savings मध्ये जास्त पैसा गुंतवता येऊ शकतो.

हा नियम वापरल्याने तुमचा खर्च नियंत्रित राहतो आणि भविष्यासाठी बचत व गुंतवणूक सुलभ होते.