1) पॅनिकमध्ये रिडीम करू नका: बाजारातील घसरण ही नैसर्गिक आहे. SIP चालू ठेवल्यास दीर्घकाळात चांगला नफा मिळू शकतो.

2) इम्पल्सिव्ह निर्णय टाळा: अचानक रिडीम केल्याने भविष्यातील नफा गमावू शकता. त्यामुळे Emergency Fund तयार ठेवा.

3) फंड परफॉर्मन्स चेक करा फंड सतत खराब परफॉर्म करत असेल तरच रिडीम करा. अन्यथा संयम ठेवा.

4) पुनर्गुंतवणुकीची योजना तयार ठेवा: रिडीम केलेले पैसे बँकेत न पडता, दुसऱ्या चांगल्या फंडमध्ये गुंतवा.

5) Exit Load आणि Charges तपासा: काही फंडमध्ये रिडीमिंग फी असते, त्यामुळे योग्य वेळ निवडा.

6) Capital Gains Tax लक्षात घ्या: रिटर्नवर STCG किंवा LTCG लागू होतो. टॅक्सचा परिणाम तपासून निर्णय घ्या.

7) Settlement Time आणि NAV समजून घ्या: Equity फंड साठी T+3 आणि Debt फंड साठी T+1 दिवस लागतात. NAV 3 वाजेच्या आधी दिल्यास त्या दिवसाचा लागतो.

घाईगडबडीत Mutual Fund रिडीम करू नका. दीर्घकालीन दृष्टीकोन, योग्य योजना, आणि आर्थिक शिस्त ठेवल्यास तुम्ही नफा वाढवू शकता.