ETFs (Exchange Traded Funds) ही गुंतवणूक करण्याची एक सोपी, कमी खर्चिक आणि लवचिक पद्धत आहे. याआर्टिकलमध्ये आपण ETFs म्हणजे काय, त्यांची मुख्य वैशिष्ट्ये आणि त्यामध्ये गुंतवणुकीचे फायदे समजून घेऊया. विशेषतः, Gold ETFs मध्ये गुंतवणूक करताना होणाऱ्या सोयी व लाभांवर लक्ष केंद्रित करूया.
ETFs म्हणजे काय?
ETFs म्हणजे एखाद्या गुंतवणूक फंडचे असे युनिट जे स्टॉक एक्स्चेंजवर ट्रेड केले जाते. ETFs मध्ये तुमचे पैसे विविध स्टॉक्स, बॉंड्स किंवा commodities मध्ये गुंतवले जातात. हे Mutual Funds प्रमाणेच असतात, परंतु यांना दिवसभर, शेअर मार्केट चालू असताना ट्रेड करता येते. त्यामुळे तुम्ही शेअर मार्केटमध्ये घडणाऱ्या बदलांना त्वरीत प्रतिसाद देऊ शकता. अनेक ETFs passively manage असतात, ज्यामध्ये एखादी ETF एका ठराविक index चा परफॉर्मेंस साध्य करण्याचा प्रयत्न करते किंवा त्या Index एवढा तरी रिटर्न देण्याचा प्रयत्न करत असते.
ETFs मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे
ETFs मध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत. खाली काही प्रमुख फायदे दिले आहेत, विशेषतः Precious Metals (Gold) मध्ये गुंतवणूक करताना:
१) Lowest Cost (NAVs): ETFs मध्ये खर्च (expense ratios) खूप कमी असतो कारण त्यांची management passive पद्धतीने केली जाते. Passive म्हणजे फंड मॅनेजर सतत नवीन स्टॉक्स शोधत नाही. एक इंडेक्स निवडतो आणि त्यावर पैसे लावतो. त्यामुळे तुमचे जास्त पैसे ETF मध्ये गुंतविले जातात. खर्च कमी येतो.
२) No Storage Issues: Gold ETFs मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला physical gold ठेवण्यासाठी लॉकरची गरज पडत नाही. Mutual Fund हे physical gold त्यांच्या वतीने सुरक्षित ठेवते.
३) No Purity Issues: Gold ETFs मध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला gold ची purity तपासावी लागत नाही कारण fund कडून 99.5% किंवा त्याहून अधिक शुद्धतेचे gold राखले जाते.
४) No Security Issues: Physical gold चोरीची रिस्क असते. ETFs मध्ये गुंतवणूक केल्यामुळे अशा प्रकारच्या सुरक्षेच्या समस्यांपासून सुटका मिळते.
५) No Liquidity Issues: ETFs स्टॉक एक्स्चेंजवर ट्रेड होतात, ज्यामुळे खरेदी-विक्री करणे सोपे व जलद होते. तुम्हाला तुमची गुंतवणूक कधीही कॅशमध्ये convert करण्याची सुविधा असते.
६) Regulated by SEBI: ETFs भारतात SEBI (Securities and Exchange Board of India) द्वारे नियंत्रीत केल्या जातात. यामुळे गुंतवणूकदारांना अतिरिक्त सुरक्षा आणि पारदर्शकता मिळते.
७) Easy Buying/Selling: ETFs खरेदी आणि विक्री करणे खूप सोपे असते. तुम्हाला फक्त Demat account ची गरज असते आणि तुम्ही दिवसभरात ट्रेड करू शकता.
गुंतवणूक करण्यासाठी Top 5 GOLD ETFs
Precious Metals मध्ये गुंतवणूक करण्यासाठी, विशेषतः Gold ETFs, खालील 5 लोकप्रिय पर्याय आहेत:
- Nippon India ETF Gold BeES
- HDFC Gold ETF
- ICICI Prudential Gold ETF
- Kotak Gold ETF
- SBI Gold ETF
निष्कर्ष
ETFs मध्ये गुंतवणूक करणे ही एक स्मार्ट आणि सोपी पद्धत आहे. ETFs मधील गुंतवणूक तुम्हाला कमी खर्च, उच्च liquidity आणि पारदर्शकता देते. विशेषतः, Gold ETFs मध्ये गुंतवणूक केल्याने physical gold च्या storage, purity आणि security या समस्यांपासून सुटका मिळते. SEBI द्वारे नियंत्रीत असलेल्या ETFs मध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचा पैसा सुरक्षितपणे वाढवू शकता.