Mutual Fund उद्योगात कर्मचारी आणि unitholders (म्हणजे आपण) यांच्यातील हितसंबंध अधिक मजबूत करण्यासाठी “Skin in the Game” नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या आर्टिकलमध्ये, SEBI ने CEO, CIO आणि fund managers यांसारख्या designated employees साठी असलेल्या जुन्या गुंतवणूक नियमात केलेले बदल सोप्या भाषेत समजून घेऊ.
“Skin in the Game” म्हणजे काय?
“Skin in the game” हा शब्द असा अर्थ दर्शवितो की एखाद्या व्यक्तीने म्हणजे फंड मॅनेजरने तो मॅनेज करत असलेल्या फंडमध्ये स्वतःची आर्थिक गुंतवणूक केली आहे की नाही. जेव्हा mutual fund चे fund managers किंवा मुख्य अधिकारी स्वतःच्या पैशाने mutual funds मध्ये गुंतवणूक करतात, तेव्हा त्यांना त्याच गुंतवणुकीचा फायदा किंवा तोटा दोन्ही सहन करावा लागतो यामुळे त्यांच्या आणि unitholders यांच्यातील हितसंबंध एकसारखे राहतात.
नवीन बदल काय आहेत?
SEBI ने mutual fund चे काही designated employees (उदा. CEO, CIO आणि fund managers) यांच्यासाठी पूर्वीच्या 20% CTC mutual fund units मध्ये गुंतवणूक करण्याच्या नियमात बदल केला आहे.
नवीन गुंतवणूक नियम:
CTC Rs 25 लाखाखालील कर्मचारी: या कर्मचार्यांना त्यांचे पगार mutual fund units मध्ये गुंतवण्याची गरज नाही.
CTC Rs 25 लाखाहून जास्त असलेले कर्मचारी: या कर्मचार्यांना आता दोन पर्याय उपलब्ध आहेत:
- CTC च्या 10-18% पर्यंत mutual fund units मध्ये गुंतवणूक करावी, किंवा
- CTC च्या 12.5-22.5% पर्यंत mutual fund units मध्ये गुंतवणूक करावी, ज्याची निवड asset management company (AMC) करून घेईल.
हा बदल का केला आहे?
पूर्वीचा एकसमान नियम सर्व कर्मचार्यांसाठी लागू केला गेला होता, ज्यामुळे उद्योगातील काही कर्मचार्यांना अडचण येत होती. SEBI ने EODB (Ease of Doing Business) working group कडून मिळालेल्या फीडबॅक नुसार, हे नियम slab-wise करून अधिक योग्य आणि पारदर्शक बनवण्याचे ठरविले आहे.
या बदलाचे फायदे:
1) हिशेबाचे समन्वय: Fund managers आणि मुख्य अधिकारी अजूनही mutual funds यशस्वी करण्यासाठी स्वतःच्या पैशाने गुंतवणूक करतील. आणि जिथे स्वताचा पैसा असतो व्यक्ति अजून काळजी घेतो.
2) लवचिकता: नवीन नियमांनुसार asset management companies आपल्या कर्मचार्यांच्या CTC प्रमाणे योग्य गुंतवणूक टक्केवारी ठरवू शकतात. त्यामुळे कमी पगार असलेल्या कर्मचार्यांवर जास्त बोझा येणार नाही.
3) समानता आणि पारदर्शकता: हे नियम mutual fund उद्योगाला अधिक आकर्षक आणि सर्वांसाठी समान बनवण्याचा उद्देश ठेवतात.
या नवीन बदलांमुळे mutual fund चे कर्मचारी “skin in the game” च्या तत्वाला जपत असताना, त्यांच्या पगारानुसार नियम बदलले जातील. हा बदल कर्मचार्यांशीच नव्हे तर unitholders साठीही फायदेशीर ठरेल.