सगळ्यात बेस्ट गुंतवणूक कोणती आहे? | What is Best Investment in Marathi

Best Investment in Marathi: गुंतवणूक करताना अनेकदा आपल्याला सतत मार्केटमधील घडामोडींचा विचार करून चिंता वाटते. बाजारातील चढ-उतारांवर लक्ष ठेवत राहणे आणि सतत पोर्टफोलिओ बदलण्याचा मोह आवरणे कठीण असते.

पण, दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा खरा मार्ग साधेपणात आहे. “खरेदी करा आणि विसरा” ही अशीच एक सोपी आणि प्रभावी गुंतवणूक पद्धत आहे, जी संयम, सातत्य आणि दीर्घकालीन दृष्टिकोन यांना महत्त्व देते.

“खरेदी करा आणि विसरा” म्हणजे काय?

“खरेदी करा आणि विसरा” ही पद्धती अशा Assets मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देते जे लाँग टर्ममध्ये टिकून राहून स्थिर रिटर्न देतात. या गुंतवणुकींचा उद्देश कमी खर्च, डोक्याला कमी ताप आणि चांगल्या वाढीची क्षमता आहे. या पद्धतीमुळे एकदा गुंतवणूक केल्यानंतर, बाजारातील दैनंदिन चढ-उतारांपासून दूर राहण्याची सवय विकसित होते.

एक उदाहरण सांगतो.

मी बँकमध्ये जॉब करतो. तर तिथे अनेक इन्वेस्टर असे येतात ज्यांनी काही वर्षाआधी म्यूचुअल फंड SIP केली होती. पण ते त्या SIP ला पूर्णपणे विसरून गेले होते. सोबत बँकमधून SIP केली की सहसा ते APP किंवा सतत SIP चेक करण्यासाठी सिस्टम देत नाही. आणि बँकमध्ये येऊन सतत SIP स्टेटमेंट घेणे म्हणजे डोक्याला ताप. म्हणून कोणी येत नाही. म्हणून असे इन्वेस्टर चांगली वेल्थ बनवतात.

मला तर कधी कधी अस वाटत हे आजकालचे नवीन Investing ॲप्समुळे सतत ते Demat अकाऊंट चेक करणे, हा स्टॉक घ्या आणि मग तो विका, याने खरंच वेल्थ बनेल का? की आपल्याला पण “खरेदी करा आणि विसरा” ही पद्धत आजमावी लागणार आहे.

ही पद्धत का प्रभावी आहे?

1) Power of Compounding: Compounding ही दीर्घकालीन संपत्ती निर्मितीची सर्वात मोठी भागीदार आहे. गुंतवणुकीतून वारंवार पैसे काढणे किंवा बदल करणे Compounding च्या प्रक्रियेत अडथळा आणते. इंडेक्स फंड, ब्लू-चिप शेअर्स यांसारख्या गुंतवणुकींना Compounding चा मोठा फायदा होतो.

2) भावनिक शिस्त: बाजारातील घडामोडींकडे वारंवार पाहणे भावनिक निर्णय घेण्यास प्रवृत्त करू शकते – जसे की घाईघाईने खरेदी करणे किंवा भीतीपोटी विक्री करणे. “खरेदी करा आणि विसरा” ही पद्धती अशा चुकांपासून वाचवते.

3) मार्केट टाइम Vs मार्केट टाइमिंग: परफेक्ट मार्केट टाइमिंग ओळखण्यापेक्षा मार्केटमध्ये टिकून राहणे अधिक फायदेशीर ठरते. शॉर्ट टर्ममधील हालचालींचा अंदाज लावणे कठीण असते, पण लॉन्ग टर्म गुंतवणूक ही संपत्ती निर्माण करण्याचा खात्रीशीर मार्ग आहे.

“खरेदी करा आणि विसरा”साठी योग्य गुंतवणूक प्रकार

1) Index Funds and ETFs: कमी खर्चाचे हे गुंतवणूक साधन विविधता आणि लॉन्ग टर्म वाढ देतात.

2) ब्लू-चिप शेअर्स (Blue-Chip Stocks): चांगल्या आर्थिक स्थिती असलेल्या आणि टिकावू नफ्याचा इतिहास असलेल्या कंपन्यांचे शेअर्स. जस की TATA, Reliance.

3) Dividend देणारे शेअर्स: नियमित Dividend देणाऱ्या कंपन्या स्थिर उत्पन्न देतात आणि पुन्हा गुंतवणूक केल्याने वाढीला चालना मिळते.

5) म्यूचुअल फंड SIP: दर महिन्याला एक ठराविक रक्कम SIP मध्ये इन्वेस्ट करायची. लॉन्ग टर्ममध्ये नक्कीच चांगला फायदा होतो. पण फंड चांगला निवडता आला पाहिजे.

“खरेदी करा आणि विसरा” या पद्धतीतील प्रॉब्लेम

ही पद्धती फायदेशीर असली तरी ती रिस्कपासून मुक्त नाही. शेअर मार्केटमधील स्थिती, महागाई, किंवा कंपनीच्या मूलभूत स्थितीतील बदल यामुळे लॉन्ग टर्म रिटर्नवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वर्षातून एकदा तरी तुमच्या गुंतवणुकींचे रिव्ह्यू करणे आवश्यक आहे.

मानसिकतेतील बदल

या पद्धतीतील सर्वांत कठीण भाग म्हणजे ही साधी प्रक्रिया स्वीकारणे आणि तिच्यावर विश्वास ठेवणे. शेअर मार्केट पडल तरीही काही न करण्याची शिस्त आवश्यक असते. शॉर्ट टर्ममध्ये चढउतार सामान्य आहेत पण तुमच उद्दिष्ट लॉन्ग टर्ममध्ये संपत्ती निर्माण करणे आहे.

निष्कर्ष

“खरेदी करा आणि विसरा” ही पद्धत म्हणजे गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करणे नाही, तर सुरुवातीला केलेल्या रिसर्चवर विश्वास ठेवणे आणि वेळेच्या सामर्थ्यावर अवलंबून राहणे आहे. चांगले स्टॉक्स असो की म्यूचुअल फंड, लॉन्ग टर्म टिकून राहिल्यास डोक्याला कमी टेंशन देता आर्थिक स्वातंत्र्य मिळवता येते.

ही पोस्ट वाचा: मी 2 सेक्टर फंडस घेतले आहेत? बरोबर आहे का?


नमस्कार मित्रांनो,
माझं नाव साजन भुवड आहे, आणि मी एक AMFI नोंदणीकृत म्युच्युअल फंड सल्लागार आहे. गेल्या 4 वर्षांपासून @marathifinance या इनस्टाग्राम पेजच्या माध्यमातून, फायनान्स विषयांची माहिती सोप्या मराठीत देत आलो आहे.

जर तुम्हाला वैयक्तिक म्युच्युअल फंड सल्लागार हवा असेल, तरच माझ्याशी संपर्क साधा.
मी तुम्हाला मदत करू शकतो:

  • तुमचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ डिझाईन करण्यात,
  • त्याचा नियमितपणे रिव्यू घेण्यात, आणि
  • वेळोवेळी बदल सुचवण्यात

म्यूचुअल फंड गुंतवणूक हा एक लाँग-टर्म प्रवास आहे. अस नाही की आज केल आणि काम झाल. तुम्हाला उत्तम रिटर्न्स मिळवायचे असतील तर आजच जॉइन करा आणि तुमच्यासाठी खास तयार केलेला रेडिमेड पोर्टफोलिओ मिळवा. (9372334632)


Disclaimer: म्युच्युअल फंड गुंतवणुकीत बाजारातील जोखीम समाविष्ट आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित योजनांची माहिती काळजीपूर्वक वाचावी. यामध्ये योजनांचे उद्दिष्ट, जोखीम घटक आणि खर्च यांचा समावेश आहे. म्युच्युअल फंडाचे भूतकाळातील कामगिरी भविष्यातील हमी देत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःच्या वित्तीय उद्दिष्टांनुसार आणि सल्लागाराच्या मार्गदर्शनाने निर्णय घ्यावा. हे आर्टिकल फक्त सामान्य माहितीसाठी आहे. गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही नुकसानीसाठी लेखक जबाबदार राहणार नाही.

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment