Flexi Cap Fund in Marathi | Flexi Cap Fund हे असे म्युच्युअल फंड आहेत जे मोठ्या, मध्यम आणि छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
या फंडचे fund managers बाजाराच्या परिस्थितीनुसार गुंतवणूक करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य ठेवतात. म्हणूनच या फंडचं नाव Flexi म्हणजे Flexible (लवचिक).
फंड मॅनेजर त्याच्या सोयीनुसार मार्केटमधील मोठ्या, मध्यम आणि छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकतो.
Flexi Cap Fund मध्ये किमान 65% संपत्ती (म्हणजेच आपल्या सारख्या इन्वेस्टरनी इन्वेस्ट केलेले पैसे) इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित साधनांमध्ये गुंतवली जाते.
उर्वरित 35% डेट इन्स्ट्रुमेंट्स, रोख रक्कम किंवा रोखीच्या समतुल्य साधनांमध्ये गुंतवली जाऊ शकते.
Flexi Cap Fund मध्ये कोण गुंतवणूक करू शकतो?
Flexi Cap Fund त्या व्यक्तींसाठी योग्य आहेत:
जे विविध मार्केट कॅप असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून डायव्हर्सिफिकेशन मिळवू इच्छितात.
ज्यांची रिस्क घेण्याची क्षमता मध्यम आहे. कारण Flexi Cap Fund, स्मॉल-कॅप फंड्सपेक्षा कमी रिस्क आणि लार्ज-कॅप फंड्सपेक्षा जास्त रिस्कचे असतात.
जे लॉन्ग टर्म (5+ वर्षे) गुंतवणुकीसाठी तयार आहेत, जेणेकरून शेअर बाजाराच्या चढ-उतारांना सामोरे जाऊ शकतील.
Flexi Cap Fund चे फायदे
१) डायव्हर्सिफिकेशन: हा फंड तुमच्या पैशाला विविध क्षेत्रांमध्ये आणि मार्केट कॅपमध्ये गुंतवतो.
२) लवचिकता: फंड मॅनेजर शेअर बाजाराच्या परिस्थितीनुसार रणनीती बदलू शकतो आणि त्यानुसार पैसे गुंतवू शकतो.
३) वाढीची शक्यता: मोठ्या कंपन्यांच्या स्थिरतेसह, छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून चांगले रिटर्न मिळण्याची संधी मिळते.
Flexi Cap Fund चे तोटे
१) जास्त जोखीम: लार्ज-कॅप फंड्सच्या तुलनेत Flexi Cap Fund अधिक अस्थिर असू शकतात.
२) फंड मॅनेजरवर अवलंबित्व: फंडची कामगिरी पूर्णपणे फंड मॅनेजरच्या स्किल्सवर अवलंबून असते.
३) शॉर्ट-टर्म ध्येयांसाठी योग्य नाही: शेअर बाजारातील घसरणीच्या वेळी शॉर्ट टर्ममधील फंडची कामगिरी चांगली नसू शकते.
निष्कर्ष
Flexi Cap Fund हे लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांसाठी एक स्मार्ट पर्याय आहेत जे एकाच फंडमध्ये विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून डायव्हर्सिफिकेशनचा फायदा देतात.
मात्र, गुंतवणूक करण्यापूर्वी तुमची रिस्क घेण्याची क्षमता आणि उद्दिष्टे नीट तपासून बघा. मगच योग्य ती गुंतवणूक करा.
(आणि हो, कोणता फंड निवडायचा? याबद्दल काही शंका असेल किंवा योग्य मार्गदर्शन हव असेल तर मला WhatsApp करा)
पोस्ट वाचा: Index Funds ने कशी मिळवली गुंतवणूकदारांची पसंती? आकडेवारी काय सांगते?
पोस्ट वाचा: Mutual Fund SIP | एसआईपी बंद होण्यामध्ये वाढ, गुंतवणूकदारांमध्ये चिंता – कारणे?