Hybrid Mutual Fund | हायब्रिड म्युच्युअल फंड म्हणजे काय?

Hybrid Mutual Fund in Marathi | हायब्रिड म्युच्युअल फंड्स हे असे फंड आहेत जे एकापेक्षा जास्त Asset क्लासमध्ये गुंतवणूक करतात.

बहुतेक वेळा, हे फंड इक्विटी (शेअर्स) आणि Debt (बॉन्ड्स) यांच्या कॉम्बिनेशनमध्ये इन्व्हेस्ट करतात. काही फंड्समध्ये गोल्ड किंवा रिअल इस्टेटसारखे Assets देखील समाविष्ट असतात.

या फंड्सचा मुख्य उद्देश असा आहे की भिन्न Asset क्लासेसच्या मिश्रणातून Risk कमी करून चांगले रिटर्न मिळवणे.

हायब्रिड फंड्सची मूलभूत तत्त्वे:

  1. Asset Allocation: फंडमधील संपत्ती वेगवेगळ्या Asset क्लासेसमध्ये वाटप करणे.
  2. Diversification: एकाच वेळी अनेक Assets मध्ये इन्व्हेस्ट करून रिस्क कमी करणे.

हायब्रिड फंड्सचे प्रकार (Types of Hybrid Funds):

1) Multi Asset Allocation Fund:

    • किमान ३ Asset क्लासेसमध्ये १०% पेक्षा जास्त गुंतवणूक केली जाते.
    • फंड मॅनेजरच्या मार्केट View वर अवलंबून Asset अलोकेशन केल जात.

    2) Aggressive Hybrid Funds:

      • ६५-८०% इक्विटी, २०-३५% Debt मध्ये गुंतवणूक केली जाते.
      • हा एक हाय रिस्क- हाय रिटर्न पर्याय आहे पण Debt मुळे रिस्क कमी होते.
      • इक्विटी फंड्सप्रमाणे टॅक्सेशन होत. म्हणजे यावर टॅक्स लागतो.

      3) Dynamic Asset Allocation/Balanced Advantage Fund:

        • शेअर मार्केट स्थितीनुसार १००% इक्विटी किंवाDebt मध्ये फंडमधील पैसे शिफ्ट केले जातात.
        • ऑटोमॅटिक रिबॅलन्सिंगसाठी केली जाते.

        4) Conservative Hybrid Funds:

          • १०-२५% इक्विटी, ७५-९०% Debt
          • Debt सोबत बऱ्यापैकी रिटर्नची अपेक्षा असलेल्या इन्व्हेस्टर्ससाठी.

          5) Equity Savings Fund:

            • इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज आणि Debt चे मिश्रण.
            • लो-व्होलॅटिलिटी स्टेबल रिटर्न्स.

            5) Arbitrage Fund:

              • कॅश आणि फ्युचर मार्केटमधील प्राइस डिफरन्सवर प्रॉफिट कमविणे
              • इक्विटी टॅक्सेशनसह सेफ इन्व्हेस्टमेंट.

              हायब्रिड फंड्समध्ये इन्व्हेस्ट करताना विचारात घ्यावयाचे घटक:

              • रिस्क: इक्विटी एक्सपोजर जितके जास्त, तितकी रिस्क जास्त. त्यापैकी डायनॅमिक फंड्स रिस्क ऑटोमॅटिक प्रकारे मॅनेज करतात.
              • रिटर्न्स: शेअर मार्केट परफॉर्मन्सवर अवलंबून असते. Debt ओरिएंटेड फंड्समध्ये स्टेबल रिटर्न्स मिळतो.
              • टाइम होरायझन: गुंतवणुकीसाठी ३-५ वर्षांचा मध्यम कालावधी योग्य ठरेल.
              • एक्सपेन्स रेश्यो: कमी खर्चाचे फंड्सना प्राधान्य द्या.
              • इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी: फंड मॅनेजरच्या निर्णयावर अवलंबून असते.

              हायब्रिड फंड्सचे टॅक्सेशन:

              इक्विटी-ओरिएंटेड फंड्स (६५%+ इक्विटी):

              • १ वर्षापेक्षा कमी होल्डिंग → १५% STCG.
              • १ वर्षापेक्षा जास्त → १०% LTCG (₹१ लाख पेक्षा जास्त गेन्सवर).

              डेट-ओरिएंटेड फंड्स (६५%+ डेट):

              • ३ वर्षांपेक्षा कमी → इन्कम टॅक्स स्लॅबनुसार.
              • ३ वर्षांपेक्षा जास्त → २०% टॅक्स (इंडेक्सेशनसह).

              हायब्रिड फंड्सचे फायदे (Advantages):

              • एकाच फंडमध्ये मल्टीपल अॅसेट क्लासेस.
              • डायव्हर्सिफिकेशन आणि ऑटोमॅटिक रिबॅलन्सिंगद्वारे रिस्क मॅनेजमेंट.
              • कंझर्व्हेटिव्ह ते अॅग्रेसिव्ह पर्यंत सर्व रिस्क प्रोफाइल्ससाठी योग्य.
              • नवीन इन्व्हेस्टर्ससाठी इक्विटीमध्ये एंट्री करण्याचा सोपा मार्ग.

              बेस्ट हायब्रिड फंड कसा निवडायचा?

              • कॉन्सिस्टंट परफॉर्मन्स, अनुभवी फंड मॅनेजमेंट टीम, आणि रिझनेबल कॉर्पस साइज पहा.
              • रिस्क-रिटर्न रेश्यो आणि एक्सपेन्स रेश्योची तुलना करा.
              • मार्केट व्हॉलॅटिलिटी दरम्यान अर्बिट्राज फंड्स सारख्या लो-रिस्क ऑप्शन्सचा विचार करा.

              निष्कर्ष

              हायब्रिड म्युच्युअल फंड्स हे इक्विटी, डेट, आणि इतर अॅसेट्सच्या मिश्रणातून सुतळीव रिटर्न्स देणारा पर्याय आहे.

              मध्यम कालावधीतील गोल्ससाठी, विविध जोखीम प्रोफाइल्स असलेल्या इन्व्हेस्टर्ससाठी ते योग्य आहेत. फंड निवडताना टॅक्सेशन, रिस्क टॉलरन्स, आणि फंड मॅनेजमेंटचा इतिहास याकडे लक्ष द्या.

              स्मार्ट अॅसेट अलोकेशन आणि डायव्हर्सिफिकेशनद्वारे हे फंड्स तुमच्या पोर्टफोलिओला स्थिरता आणि वाढ दोन्ही प्रदान करू शकतात!

              पोस्ट वाचा: Mutual Fund Investment | SIP खूप लॉसमध्ये आहे, काय करावं?

              Social Media Links

              Author

              • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

                View all posts

              Leave a Comment