Multi Cap Fund in Marathi | मल्टी कॅप फंडस हे SEBI (सेबी) नियमांनुसार इक्विटी म्युच्युअल फंड आहेत, ज्यांना लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये कमीत कमी २५% प्रत्येक प्रमाणात गुंतवणूक करणे बंधनकारक आहे.
तसेच, या फंड्सनी त्यांच्या पोर्टफोलिओच्या किमान ७५% रक्कम इक्विटीमध्ये (शेअर्समध्ये) गुंतवणे आवश्यक आहे.
SEBI च्या या नवीन नियमांमुळे, फंड मॅनेजर्सना मार्केट कॅप प्रमाणात लवचिकता मर्यादित झाली आहे.
उदाहरणार्थ, अर्थव्यवस्था वाढत असली तरीही फंडने लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप प्रत्येकी २५% पेक्षा कमी गुंतवणूक कमी चालत नाही.
मात्र, या प्रमाणापेक्षा जास्त गुंतवणूक करण्याचे स्वातंत्र्य फंड मॅनेजरकडे आहे. म्हणजे २५% एवढे लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या तर हवेतच.
Multi Cap Funds मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे
- सेबी नियमानुसार डायव्हर्सिफिकेशन: २५% गुंतवणूक प्रत्येक मार्केट कॅपमध्ये बंधन असल्याने, पोर्टफोलिओ आपोआप डायव्हर्सिफाइड होते. लार्ज कॅपची स्थिरता, मिड/स्मॉल कॅपची ग्रोथ एकाच फंडमध्ये मिळते.
- इक्विटी एक्सपोजर सुनिश्चित: ७५% किमान इक्विटी गुंतवणूकमुळे दीर्घकाळात चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता असते.
- जोखीम व्यवस्थापन: तीनही सेगमेंटमध्ये गुंतवणूक केल्याने मार्केटच्या चढ उताराचा प्रभाव कमी होतो.
Multi Cap Funds मध्ये गुंतवणूक करण्याचे तोटे
मल्टी-कॅप फंडचा मुख्य तोटा म्हणजे SEBI च्या 25% नियमामुळे फंड मॅनेजरच्या निवडीचे मर्यादित स्वातंत्र्य. याचे परिणाम असे होतात:
१) बाजाराच्या परिस्थितीनुसार फंडची रक्कम हलविण्याची अडचण:
उदाहरणार्थ, जेव्हा स्टॉक मार्केट कोसळत असेल आणि स्मॉल-कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक धोकादायक वाटत असेल, तरीही फंड मॅनेजर त्यातील 25% पेक्षा कमी गुंतवणूक करू शकत नाही.
अशावेळी इतर कॅटेगरीमध्ये (लार्ज/मिड-कॅप) संधी असूनही पैसे हलवणे शक्य होत नाही.
२) चांगल्या संधी गमावण्याचा धोका:
बाजारात एखाद्या विशिष्ट कॅटेगरीमध्ये (उदा., लार्ज-कॅप) मोठ्या परताव्याची संधी उपलब्ध असतानाही, मॅनेजरला 25% नियम पाळण्यासाठी इतर श्रेण्यांमध्ये सक्तीने गुंतवणूक करावी लागते. यामुळे फंडचा परतावा मर्यादित होऊ शकतो.
३) हवी नसलेली जोखीम:
बाजाराच्या चढ-उतारात एखाद्या कॅटेगरीमध्ये (विशेषतः स्मॉल-कॅप) जास्त अस्थिरता असल्यास, गुंतवणूकदारांना त्या जोखमीपासून दूर राहण्याचा पर्याय मिळत नाही, कारण फंडमध्ये किमान 25% गुंतवणूक अनिवार्य आहे.
निष्कर्ष:
SEBI च्या नवीन नियमांमुळे Multi Cap Funds आता अधिक संतुलित आणि पारदर्शक बनले आहेत. दीर्घकाळात स्थिर रिटर्न्सची अपेक्षा असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हे फंड योग्य आहेत.
तसेच, मार्केट कॅप्समध्ये स्वतः गुंतवणूक वाटप करण्याची ओळख नसलेल्या इन्व्हेस्टर्सना हा एक सोपा पर्याय आहे.
पोस्ट वाचा: Flexi Cap Fund | फ्लेक्सी- कॅप फंड म्हणजे काय?
FAQs
लार्ज/मिड/स्मॉल कॅपमधील गुंतवणूक प्रमाण काय आहे? SEBI नियमांनुसार, प्रत्येक कॅपमध्ये किमान २५% गुंतवणूक करणे बंधनकारक आहे. उर्वरित २५% फंड मॅनेजर इच्छेनुसार वाटप करू शकतात.
किमान गुंतवणूक रक्कम किती? SIP साठी ₹५०० आणि lumpsum साठी ₹५००० ही सामान्य रक्कम आहे, पण फंडनुसार बदलू शकते.
या फंड्समध्ये जोखीम किती? इक्विटी एक्सपोजरमुळे जोखीम मध्यम ते उच्च आहे, पण ३ कॅपमध्ये डायव्हर्सिफिकेशनमुळे ती नियंत्रित आहे.