Zero Cost Term Insurance | झीरो कॉस्ट टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?

Zero Cost Term Insurance in Marathi | आजकाल YouTube किंवा Instagram सारख्या प्लॅटफॉर्मवर Zero Cost Term Insurance विषयी भरपूर चर्चा होत आहे.

नावात “झिरो कॉस्ट” असं म्हटलं असलं तरी, याचा अर्थ इन्शुरन्स कंपनी तुम्हाला फ्रीमध्ये टर्म इन्शुरन्स देत आहे असं नाही.

फायनान्सच्या जगात काहीच पूर्णपणे फ्री नसतं. कुठे ना कुठे काहीतरी लपलेली किंमत असते, जी अनेकदा स्पष्ट दिसत नाही.

Term Insurance काय आहे?

सर्वप्रथम, Term Insurance म्हणजे एक ठराविक कालावधीसाठी घेतलेला इन्शुरन्स. या कालावधीत जर पॉलिसीहोल्डरचा मृत्यू झाला, तर इन्शुरन्सची रक्कम त्याच्या नोमिनीला दिली जाते.

परंतु, जर पॉलिसी संपल्यावर पॉलिसीहोल्डर जिवंत असेल तर त्याला भरलेले प्रीमियम परत मिळत नाहीत. त्यामुळे अनेक लोकांना यामध्ये गुंतवणूक करायला संकोच होतो.

या समस्येचा समाधान म्हणून काही कंपन्यांनी Return of Premium (ROP) पर्याय आणला आहे, ज्यात पॉलिसी संपल्यावर प्रीमियम परत मिळतात. पण ROP मध्ये प्रीमियमसुद्धा जास्त असतात.

Zero Cost Term Insurance म्हणजे काय?

Zero Cost Term Insurance मध्ये तुम्ही जर पॉलिसी काही वर्षांनी बंद केली किंवा अखेरपर्यंत प्रीमियम भरले, तर प्रीमियम परत मिळतो.

जर पॉलिसीच्या कालावधीत पॉलिसीहोल्डरचा मृत्यू झाला, तर नोमिनीला निश्चित रक्कम (उदा. १ करोड) मिळते.

समजा एखाद्या व्यक्तीचं वय ३० वर्ष आहे आणि त्याने १ करोडचा Zero Cost Term Insurance घेतला आहे. त्यासाठी दरवर्षी तो १५,००० रुपये + २७०० रुपये GST म्हणजे एकूण १७,७०० रुपये भरतो.

दोन परिस्थिती समजून घेऊया

परिस्थिती १:
जर १० वर्षानंतर त्या व्यक्तीने विचार केला की आता टर्म इन्शुरन्सची गरज नाही, तर पॉलिसी बंद केल्यास,
१० वर्ष × १५,००० = १,५०,००० रुपये (GST वगळून) त्याला परत मिळतील.

परिस्थिती २:
जर तो पूर्ण ३० वर्ष प्रीमियम भरत राहिला आणि तो जिवंत राहिला, तर
३० वर्ष × १५,००० = ४,५०,००० रुपये त्याला परत मिळतील.

तर, Zero Cost Term Insurance मध्ये पॉलिसी बंद केली की किंवा अखेरपर्यंत प्रीमियम भरला की प्रीमियमची रक्कम परत मिळते. पण लक्षात ठेवा – पॉलिसीचा मृत्यू झाल्यास१ करोडचा कव्हर नोमिनीला मिळतो.

Zero Cost Term Insurance चे वैशिष्ट्य

  • कव्हर: पॉलिसी चालू असताना (उदा. ३० वर्षे) तुम्हाला १ करोडचं कव्हर मिळतं.
  • रिटर्न ऑफ प्रीमियम: जर पॉलिसी संपल्यावर तुम्ही जिवंत असाल, तर भरलेले प्रीमियम (GST वगळता) परत मिळतात.
  • लपलेली किंमत: काही फायदे दिसत असले तरी, खरंतर या पॉलिसीमध्ये काही लपलेली किंमत असते. फायनान्समध्ये काहीही फ्री नसतं, हे नेहमी लक्षात ठेवा.

कोणत्या कंपन्या ही सुविधा देतात?

सध्याच्या मार्केटमध्ये सर्व इन्शुरन्स कंपन्या Zero Cost Term Insurance देत नाहीत.

काही नेमक्या कंपन्या जसे की Bajaj Allianz, HDFC Life, ICICI Pru Life, आणि Max Life या सुविधा देतात.

भविष्यात आणखी कंपन्या ही सुविधा देऊ लागतील, अशी अपेक्षा आहे.

टॅक्सची बाब

इन्शुरन्स कंपन्यांकडून Zero Cost Term Insurance बाबत पूर्ण स्पष्टता नाहीये.

पण सामान्यतः, जेव्हा तुम्ही प्रीमियम परत मिळता तेव्हा ते टॅक्स फ्री असतात.

तसेच, प्रीमियम भरताना सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स deduction मिळू शकतो.

पॉलिसीमधून बाहेर पडण्याबद्दल

Zero Cost Term Insurance पॉलिसीमधून बाहेर पडणे शक्य असले तरी काही नियम आहेत.

पॉलिसीच्या १५-२० वर्षांनंतर बाहेर पडता येते, परंतु शेवटच्या ५ वर्षांमध्ये बाहेर पडू शकत नाही.

ही माहिती पॉलिसी फॉर्ममध्ये अगदी स्पष्टपणे नमूद केलेली असते.

Zero Cost Term Insurance Vs Term Insurance

  • मृत्यूच्या वेळी: दोन्ही पॉलिसीमध्ये मृत्यू झाल्यास नोमिनीला टर्म इन्शुरन्सची रक्कम मिळते.
  • पॉलिसी बंद केल्यास: Zero Cost Term Insurance मध्ये पॉलिसी बंद केल्यास भरलेला प्रीमियम परत मिळतो, तर सामान्य Term Insurance मध्ये परत मिळत नाही.
  • प्रीमियम: Zero Cost Term Insurance चा प्रीमियम साध्या Term Insurance पेक्षा थोडा जास्त असतो.

Zero Cost Term Insurance चे काही नुकसान

जरी Zero Cost Term Insurance मध्ये प्रीमियम परत मिळण्याचा फायदा असला तरी, त्यात काही नकारात्मक बाजू देखील आहेत.

Return of Premium प्लॅनच्या तुलनेत हे फायदेशीर वाटत असले तरी, साध्या Term Insurance पेक्षा महाग असतो.

एकदा Zero Cost Term Insurance घेतल्यावर Return of Premium टर्म इन्शुरन्स प्लॅन कधीही घेऊ नका.

तुम्हाला कोणता प्लॅन निवडायचा?

जेव्हा पण टर्म इन्शुरन्स घेण्याचा विचार करता, तेव्हा खालील तीन पर्याय तपासा:

  1. साधा सरळ Term Insurance Plan: (हा घ्या अस रेकमेंड करेन)
    • पॉलिसी संपल्यावर प्रीमियम रिटर्न नाही.
    • पण प्रीमियम खूप कमी असतो.
  2. Zero Cost Term Insurance Plan:
    • पॉलिसी बंद केल्यास प्रीमियम रिटर्न मिळतो.
    • काही अटी आणि शर्ती असतात, आणि प्रीमियम किंचित जास्त असतो.
  3. Return of Premium Plan:
    • पॉलिसी संपल्यावर प्रीमियम रिटर्न मिळतो.
    • पण या प्लॅनमध्ये प्रीमियम इतर दोन पर्यायांपेक्षा सर्वात जास्त भरावा लागतो.
    • मी हा प्लान कुणालाही सुचवणार नाही.

तुमची निवड काय आहे?

Zero Cost Term Insurance मध्ये फक्त “झिरो” हा शब्द असला तरी, तो प्लॅन पूर्णपणे फ्री नाही. साध्या Term Insurance पेक्षा यामध्ये अधिक किंमत आणि अटी आहेत.

मी स्वतःने एक सोपा Term Insurance Plan घेतला आहे ज्यात पॉलिसी संपल्यावर प्रीमियम रिटर्न नाही, कारण मला तो योग्य वाटला. आता तुमचा विचार काय आहे – तुमच्यासाठी कोणता प्लॅन फायदेशीर आहे? हे ठरवा आणि योग्य टर्म इन्शुरन्स घ्या.

पोस्ट वाचा: Term Insurance | टर्म इन्शुरन्स कव्हर रक्कम कशी काढायची?

पोस्ट वाचा: Term Insurance | टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेताना कोणते रायडर्स निवडावे?

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment