Mutual Fund Investment | गुंतवणुकीचा एक प्रमुख उद्देश म्हणजे योग्य रिटर्न मिळवणे. रिटर्न मिळाल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांना त्यांचा रिटर्न रिडीम करायचा असतो, ज्यामुळे त्यांनी मिळविलेला नफा उपभोगता येतो. काही वेळा अनपेक्षित खर्च किंवा बाजारातील तीव्र अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांना त्यांची Mutual Fund गुंतवणूक रिडीम करावी लागते. अशा परिस्थितीत, नवीन तसेच अनुभवी गुंतवणूकदारांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात:
1) पॅनिकमध्ये Mutual Fund गुंतवणूक काढण्यात शहाणपण नाही!
अनेकदा बाजारात मोठी घसरण झाल्यास लोक घाबरून Mutual Fund गुंतवणूक रिडीम करून टाकतात. परंतु शेअर बाजारातील घसरण ही नैसर्गिक बाब आहे आणि ती संधी म्हणूनही पाहिली जाऊ शकते. SIP द्वारे Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना बाजारातील घसरणीत जास्त युनिट्स खरेदी करता येतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही महिन्याला ₹3,000 ची SIP करत असाल तर बाजारातील चढ-उतार असूनही दीर्घकाळासाठी गुंतवणूक ठेवल्यास नफा होण्याची शक्यता असते.
2) उगाच इम्पल्सिव्ह Mutual Fund रिडीमिंग करणे पडेल भारी!
काही वेळा गुंतवणूकदार अचानक Mutual Fund गुंतवणूक रिडीम करतात. यामुळे भविष्यातील संभाव्य नफा गमावला जाऊ शकतो. म्हणूनच, जर तुम्हाला ताबडतोब Mutual Fund काढण्याचा विचार असेल, तर काही नियम आणि अटी ठरवून घ्या. अत्यावश्यक खर्चांसाठी एक वेगळा Emergency Fund ठेवल्यास दीर्घकालीन Mutual Fund गुंतवणूक काढणे टाळता येते.
3) Mutual Fund गुंतवणुकीचा परफॉर्मेंस चेक करणे गरजेच!
Mutual Fund रिडीम करण्यापूर्वी गुंतवणुकीचा नीट आढावा घेणे आवश्यक आहे. जर एखाद्या Mutual Fund ची कामगिरी (परफॉर्मेंस) सलग कमी होत असेल, तर त्याची इतर प्रतिस्पर्धी फंड्ससोबत तुलना करणे फायदेशीर ठरते. किंचित घसरण असली तरीही सलग कमी परफॉर्मन्स असलेल्या फंडवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
4) काही प्लान नसलेल्या रिइन्वेस्टिंगमुळे नुकसान होणारच!
गुंतवणूकदारांनी नवीन Mutual Fund मध्ये गुंतवणूक करण्याआधी योग्य योजना तयार करणे गरजेचे आहे. योग्य पुनर्गुंतवणूक योजना नसल्यास रिडीम केलेले पैसे बँकेत तसाच पडून राहू शकतात आणि संभाव्य नफा गमावता येतो. त्यामुळे पैसे काढताना पुढील गुंतवणूक कुठे करायची याचा विचार करा.
5) संबंधित खर्चांचा विचार तुम्हालाच करायचं आहे!
Mutual Fund गुंतवणूक रिडीम करताना विविध शुल्कांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. काही Mutual Fund फंड रिडीमिंगवर एक्झिट लोड आकारतात, ज्यामुळे नफा कमी होऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांनी योग्य वेळ निवडणे आणि शुल्कांची माहिती घ्यावी.
6) टॅक्सचा पण भरावा लागेल त्याच काय?
Mutual Fund गुंतवणुकीवरील नफा कराच्या अधीन असतो. गुंतवणुकीच्या कालावधीवर अवलंबून, रिटर्न Short-Term Capital Gains (STCG) किंवा Long-Term Capital Gains (LTCG) टॅक्समध्ये येऊ शकतो. त्यामुळे रिडीम करण्यापूर्वी टॅक्सचा परिणाम नीट तपासावा.
7) Settlement Cycle आणि NAV समजून घ्या
- Settlement Cycle: Mutual Fund रिडीम करण्यासाठी साधारणपणे काही दिवस लागतात. इक्विटी Mutual Fund साठी T+3 (व्यवहाराच्या 3 दिवसांनी) तर डेट Mutual Fund साठी T+1 लागतो.
- NAV (Net Asset Value): Mutual Fund रिडीम करताना युनिटचे मूल्य म्हणजे NAV महत्त्वाचे ठरते. संध्याकाळी 3 वाजण्यापूर्वी ऑर्डर दिल्यास त्याच दिवशीच्या NAV वर प्रक्रिया होते, नाहीतर पुढील दिवशीच्या NAV वर ऑर्डरची प्रक्रिया केली जाते.
निष्कर्ष
Mutual Fund रिडीम करताना बाजारातील अल्पकालीन अस्थिरतेमुळे घाबरून निर्णय घेऊ नका. दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवा आणि नियमितपणे Mutual Fund गुंतवणुकीचा आढावा घ्या. आपली आर्थिक उद्दिष्टे ओळखून, योग्य नियोजन आणि जागरूकतेने निर्णय घेतल्यास तुम्ही भविष्यातील नफा सुरक्षित ठेवू शकता.