Zerodha Nithin Kamath News in Marathi | सध्या Share Market मध्ये “करेक्शन” ची लाट दिसत आहे. बाजार जसा वरचढ होऊन उंचीवर पोहोचतो, तसाच अचानक खालीही कोसळू शकतो.
या पार्श्वभूमीवर, ब्रोकिंग इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण नोंदवली जात आहे. अलीकडे ट्रेडर्सची संख्या आणि ट्रेडिंग व्हॉल्यूम दोन्ही ३०% पेक्षा जास्त कमी झाले आहेत.
True-to-Market Circular मुळे १५ वर्षांमध्ये पहिल्यांदा या उद्योगात Degrowth दिसून येत आहे.
भारतीय Share Market ची अस्थिरता अजूनही कायम
ही घसरण भारतीय Share Market ची अद्याप अस्थिरता उघड करते. देशाची लोकसंख्या १४० कोटी असूनही, खरा ट्रेडिंग एक्टिव्हिटी फक्त १-२ कोटी भारतीयांपुरती मर्यादित आहे.
या थोड्याशा गुंतवणूकदारांमुळेच बाजारातली चढ-उतार तीव्र होते. बाजारातील Liquidity कमी झाल्यामुळे, दीर्घकाळापर्यंत हा संकटाचा प्रभाव राहील अशी शंका व्यक्त केली जात आहे.
Share Market मध्ये घसरण – सरकारच्या STT रेव्हेन्यूवर धोका
या स्थितीमुळे सरकारच्या “सिक्युरिटीज ट्रांझॅक्शन टॅक्स” (STT) वसुलीवर मोठा धोका निर्माण झाला आहे.
२०२५-२६ च्या अंदाजपत्रकात STT द्वारे ८०,००० कोटी रुपये गोळा करण्याचे लक्ष्य होते. पण सध्याच्या घसरणीचा वेग राहिला, तर ही रक्कम ४०,००० कोटी रुपयांपर्यंतच अडकू शकते.
याचा अर्थ, सरकारच्या अपेक्षेपेक्षा ५०% कमी रेव्हेन्यू मिळणार आहे. अर्थव्यवस्थेला आधार देणाऱ्या या करातील घट म्हणजे एक गंभीर आव्हानच आहे.
पोस्ट वाचा: Share Market | शेअर बाजाराच्या चढ-उतारांशी मैत्री कशी करावी?