Mutual Fund Portfolio Review: श्रीकांत हा एक मराठी फायनॅन्स Instagram पेजचा फॉलोवर तसेच या ब्लॉगचा वाचक आहे. त्याचं वय 35 आहे. तो हाय रिस्क घेऊन म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक करू इच्छितो. सध्या त्याच्या पोर्टफोलियोमध्ये HDFC Nifty 50 Index Fund, ICICI Prudential Bluechip Fund, DSP Mid Cap Fund, आणि Aditya Birla Sun Life Equity Advantage Fund असे फंड आहेत.
या आर्टिकलमध्ये, श्रीकांतच्या गुंतवणुकीची परफॉर्मन्स, exit load, expense ratio आणि current NAV यांच्यावर आधारित सखोल माहिती देण्यात आली आहे. यामुळे त्याला योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. त्यासोबत तुम्हाला सुद्धा तुमच्या पोर्टफोलियोमध्ये काही बदल करावे याची आयडिया मिळेल.
1. HDFC Nifty 50 Index Fund
- 5-Year Performance: CAGR of 16.21%
- Current NAV: ₹232.21 (as of October 31, 2024)
- Exit Load: 0.25% if redeemed within 3 days; thereafter, no exit load.
- Expense Ratio: 0.20%
हा फंड Nifty 50 index मधील टॉप 50 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. या फंडचे उद्दीष्ट म्हणजे Nifty 50 ची परफॉर्मन्स मॅच करणे.
2. ICICI Prudential Bluechip Fund
- 5-Year Performance: CAGR of 20.28%
- Current NAV: ₹116.11 (as of October 31, 2024)
- Exit Load: 1% if redeemed within 1 year
- Expense Ratio: 0.87%
हा फंड Bluechip Large-Cap Equity Fund आहे, ज्यामध्ये मोठ्या, स्थिर आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत कंपन्यांमध्ये गुंतवणूक होते. ICICI Prudential Bluechip Fund हा HDFC Nifty 50 Index Fund पेक्षा जास्त रिटर्न देत आहे आणि ह्या फंडचा expense ratio देखील 1% च्या खाली आहे, त्यामुळे हा फंड श्रीकांतच्या पोर्टफोलियोमध्ये योग्य ठरू शकतो.
3. DSP Mid Cap Fund
- 5-Year Performance: CAGR of 21.90%
- Current NAV: ₹159.90 (as of October 31, 2024)
- Exit Load: 1% if redeemed within 1 year; no exit load thereafter.
- Expense Ratio: 0.76%
मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारा हा फंड आहे. श्रीकांतला चांगल्या रिटर्नसाठी या फंडमध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही.
4. Aditya Birla Sun Life Equity Advantage Fund
- 5-Year Performance: CAGR of 17.28%
- Current NAV: ₹978.78 (as of October 31, 2024)
- Exit Load: 1% if redeemed within 90 Days; no exit load thereafter.
- Expense Ratio: 1.14%
हा Large + Mid Cap category चा फंड आहे, जो large-cap आणि mid-cap stocks मध्ये गुंतवणूक करतो. श्रीकांतकडे आधीच Large-Cap आणि Mid-Cap मध्ये इन्वेस्टमेंट आहे, त्यामुळे अजून एका Large + Mid Cap फंडची गरज नाही.
श्रीकांतच्या पोर्टफोलियोसाठी योग्य बदलांचा निर्णय:
श्रीकांतने आपल्या पोर्टफोलियोचा आढावा घेतला असता, काही महत्त्वाचे बदल करणे आवश्यक वाटते.
- ICICI Prudential Bluechip Fund – हा फंड Active Managed Fund असल्यामुळे त्याच्या Expense Ratio साठी जास्त पैसे खर्च करावे लागतात, परंतु हा फंड HDFC Nifty 50 Index Fund पेक्षा अधिक रिटर्न देत आहे. त्यामुळे Large Cap कॅटेगरीत याच फंडमध्ये गुंतवणूक ठेवणं योग्य ठरेल.
- DSP Mid Cap Fund – श्रीकांतने मध्यम रिस्क घेऊन चांगल्या रिटर्नसाठी DSP Mid Cap Fund निवडला आहे, जो त्याच्या अपेक्षेनुसार काम करत आहे. म्हणून या फंडमध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही.
- Aditya Birla Sun Life Equity Advantage Fund – Large + Mid Cap कॅटेगरीचा हा फंड श्रीकांतच्या पोर्टफोलियोमध्ये Overlapping निर्माण करत आहे, कारण त्याच्याकडे आधीच Large Cap आणि Mid Cap मध्ये इन्वेस्टमेंट आहे. त्यामुळे या फंडमधून बाहेर पडून त्याऐवजी Small Cap Fund किंवा Flexi Cap Fund निवडावा. Small Cap Fund निवडल्यास, श्रीकांतला त्याच्या लॉन्ग टर्म आणि हाय रिस्क इन्वेस्टमेंट स्ट्रॅटेजीला सपोर्ट मिळेल, आणि जास्तीत जास्त ग्रोथची संधी मिळू शकेल.
तर महत्वाचा मुद्दा असा आहे की!
श्रीकांतने Large + Mid Cap फंडाच्या जागी एक Small Cap Fund किंवा Flexi Cap Fund निवडावा, जो त्याला लॉन्ग टर्मसाठी जास्त रिटर्न देऊ शकेल. तसेच, Large Cap मध्ये ICICI Prudential Bluechip Fund आणि Mid Cap मध्ये DSP Mid Cap Fund हे फंड कायम ठेवणे अधिक फायदेशीर ठरेल. Small Cap Fund नको असल्यास, एखादा Flexi Cap Fund निवडणे अधिक फायदेशीर ठरेल.
एक गोष्ट लक्षात ठेवा फंडची नाव वेगळी असली तर त्यामध्ये असलेले स्टॉक्स तेच असतील तर फायदा होत नाही. म्हणून प्रतेक Mutual Fund Category ला नीट समजून घ्या. मग तुम्हाला योग्य असा फंड निवडा.
ही पोस्ट वाचा: Flexi-Cap Funds: शेअर बाजारात स्थिरता आणि नफा दोन्ही मिळवण्याचा सर्वोत्तम पर्याय!
Disclaimer: ही माहिती केवळ शैक्षणिक उद्देशाने दिली आहे आणि कोणत्याही प्रकारचे गुंतवणुकीचे सल्ले किंवा शिफारस म्हणून घेतली जाऊ नये. म्युच्युअल फंड आणि इक्विटीमध्ये गुंतवणूक करताना बाजारातील जोखीम लक्षात घेणे आवश्यक आहे. गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी, आपल्या आर्थिक स्थितीचा विचार करून एखाद्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
FAQs
श्रीकांतने Large + Mid Cap फंडाच्या जागी Small Cap Fund का निवडावा?
श्रीकांतला जास्त रिटर्नसाठी हाय रिस्क घेण्याची तयारी आहे, त्यामुळे Small Cap Fund त्याच्या पोर्टफोलियोमध्ये लॉन्ग टर्म ग्रोथसाठी अधिक चांगला पर्याय ठरू शकतो. Small Cap फंडामध्ये छोटी, पण वेगाने वाढणारी कंपन्या असतात, ज्यामुळे लॉन्ग टर्ममध्ये उच्च रिटर्नची संधी वाढते.
ICICI Prudential Bluechip Fund का ठेवावा?
हा फंड HDFC Nifty 50 Index Fund पेक्षा अधिक रिटर्न देत आहे, आणि त्याचा Expense Ratio देखील 1% पेक्षा कमी आहे. Large Cap कॅटेगरीत स्थिर रिटर्न देण्यासाठी ICICI Prudential Bluechip Fund श्रीकांतसाठी चांगला पर्याय आहे.
DSP Mid Cap Fund मध्ये कोणताही बदल करायची गरज नाही का?
होय, DSP Mid Cap Fund ने कॅटेगरीनुसार चांगले रिटर्न दिले आहेत, त्यामुळे या फंडमध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही. हा फंड मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो, जे श्रीकांतला मध्यम रिस्क घेऊन चांगले रिटर्न देण्याची संधी देते.