JSW Cement IPO: जाणून घ्या ताज्या अपडेट्स, लिस्टिंग प्राईस अंदाज आणि GMP

JSW Cement IPO 7 ऑगस्टला खुला झाला असून 11 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल. सध्या या IPO ला एकूण 0.56 पट मागणी मिळाली आहे. GMP ₹9.5 असून लिस्टिंग प्राईस अंदाजे ₹156.5 असू शकतो. मजबूत बॅकवर्ड इंटिग्रेशन, ESG-फ्रेंडली उत्पादन आणि JSW Group चा ब्रँड बळकटी देतो. परंतु, गुंतवणूक दीर्घकालीन दृष्टीकोनातून करावी असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

JSW Cement IPO Subscription Status

दुसऱ्या दिवशीच्या शेवटी IPO 56% सबस्क्राइब झाला.,रिटेल गुंतवणूकदारांचा कोटा 72% भरला, NII सेगमेंट 62% आणि QIB 24% पर्यंत भरले. पहिल्या दिवशी एकूण 32% सबस्क्रिप्शन झाले होते.

JSW Cement IPO GMP

सध्या JSW Cement IPO GMP ₹9.5 आहे. याचा अर्थ, बाजारात IPO प्राईसपेक्षा गुंतवणूकदार जास्त दराने खरेदी करण्यास तयार आहेत.
Listing प्राईस ₹156.5 असण्याचा अंदाज आहे, जो ₹147 च्या इश्यू प्राईसपेक्षा सुमारे 6.46% जास्त आहे. गेल्या सात दिवसांमध्ये GMP मध्ये वाढ दिसून आली असून IPO ला चांगली सुरुवात होण्याची शक्यता आहे.

JSW Cement IPO Details

प्राईस बँड ₹139–₹147 ठरवण्यात आला आहे. IPO मध्ये ₹1,600 कोटींचा Fresh Issue आणि ₹2,000 कोटींचा Offer For Sale (OFS) आहे. OFS मध्ये Apollo Management, Synergy Metals आणि SBI आपला हिस्सा विकणार आहेत.

IPO मधून उभारलेली रक्कम पुढीलप्रमाणे वापरली जाईल – ₹800 कोटी नागौर, राजस्थान येथील नवीन प्लांटसाठी,
₹520 कोटी कर्जफेडीसाठी, उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट गरजांसाठी वापरली जाईल.

JSW Cement IPO Review

Mehta Equities आणि AUM Capital यांचा सल्ला – “Subscribe (दीर्घकालीन)”. कंपनीकडे JSW Group च्या सस्टेनेबल इन्फ्रास्ट्रक्चर साठी मजबूत इंटिग्रेशन, लोकेशन अॅडव्हांटेज, डिजिटल डिस्ट्रीब्युशन आणि ESG-अलाइन्ड प्रॉडक्शन यांचा फायदा आहे. भारतामध्ये GGBS चे सर्वात मोठे उत्पादन करणारी कंपनी असल्यामुळे तीला स्पर्धात्मक धार आहे.

वाचा: Oil and Natural Gas Corporation Share: ONGC शेअर्स 2.22% नी घसरले, गुंतवणूकदारांनी काय करावे?

JSW Cement IPO FAQ

1. JSW Cement IPO कधी बंद होणार?
11 ऑगस्ट 2025 रोजी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

2. सध्या JSW Cement IPO GMP किती आहे?
GMP ₹9.5 असून अंदाजे लिस्टिंग प्राईस ₹156.5 आहे.

3. JSW Cement IPO मध्ये किती सबस्क्रिप्शन झाले आहे?
दुसऱ्या दिवशी एकूण 56% सबस्क्रिप्शन झाले आहे.

4. IPO मधून उभारलेली रक्कम कशी वापरली जाईल?
नवीन प्लांट, कर्जफेड आणि कॉर्पोरेट गरजांसाठी.

5. गुंतवणुकीचा सल्ला काय आहे?
तज्ज्ञ दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी “Subscribe” सल्ला देत आहेत.

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment