Mutual Fund SIP मध्ये मोठी चूक? वाचा आणि तुमचा पोर्टफोलिओ सुधारा!

Mutual Fund SIP: आपल्या पेजच्या एका फॉलोअरने तिचा Mutual Fund पोर्टफोलिओ शेअर केला. ती गेल्या दोन वर्षांपासून Zerodha Coin App च्या माध्यमातून गुंतवणूक करत आहे. Mutual Fund पोर्टफोलिओचं विश्लेषण केल्यानंतर एक सामान्य पण मोठी चूक समोर आली. याबाबत सविस्तर चर्चा करूया. तिच्या पोर्टफोलिओमध्ये खालील फंड्स आहेत:

  1. Quant Flexi Cap Fund
  2. SBI Blue Chip Fund
  3. Axis ELSS Tax Saver Fund
  4. Quant ELSS Tax Saver Fund
  5. Canara Robeco ELSS Tax Saver Fund
  6. Mirae Asset ELSS Tax Saver Fund

Mutual Fund पोर्टफोलिओमधील चांगल्या गोष्टी

Quant Flexi Cap Fund: हा फंड विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो, ज्यामुळे तुमचं पोर्टफोलिओ चांगलं डायव्हर्सिफाई होतं. हा फंड उत्तम आहे.

SBI Blue Chip Fund: ब्लू-चिप फंड म्हणजे मोठ्या, स्थिर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारा फंड (उदा. Reliance, Infosys). हा फंडही दीर्घकालीन स्थिर रिटर्नसाठी चांगला पर्याय आहे. आणि एक Large Cap Fund म्यूचुअल फंड पोर्टफोलियोमध्ये असावा.

Mutual Fund पोर्टफोलिओमधील समस्या

तिच्या पोर्टफोलिओमध्ये चार ELSS Funds आहेत, जे चुकीचं आहे. कारण:

ELSS फंड म्हणजे काय?

ELSS (Equity Linked Savings Scheme) हा फंड मुख्यतः कर बचतीसाठी घेतला जातो. Section 80C अंतर्गत ₹1,50,000 पर्यंत टॅक्स डिडक्शन मिळतं. मात्र, कितीही ELSS फंड्स असले तरी कर-बचत मर्यादा ₹1,50,000 पर्यंतच मर्यादित असते.

ELSS फंडमधील प्रॉब्लेम

ELSS फंडमध्ये तीन वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो.

हा लॉक-इन प्रत्येक युनिटच्या गुंतवणूक तारखेप्रमाणे वेगळा असतो.

उदाहरण घेऊ आणि समजू,

जर तुम्ही दरमहा गुंतवणूक केली, तर लॉक-इन असा असेल:

महिनागुंतवणूक तारीखलॉक-इन संपण्याची तारीख
जानेवारी 20251 जानेवारी 20251 जानेवारी 2028
फेब्रुवारी 20251 फेब्रुवारी 20251 फेब्रुवारी 2028
मार्च 20251 मार्च 20251 मार्च 2028
एप्रिल 20251 एप्रिल 20251 एप्रिल 2028
मे 20251 मे 20251 मे 2028
जून 20251 जून 20251 जून 2028
जुलै 20251 जुलै 20251 जुलै 2028
ऑगस्ट 20251 ऑगस्ट 20251 ऑगस्ट 2028
सप्टेंबर 20251 सप्टेंबर 20251 सप्टेंबर 2028
ऑक्टोबर 20251 ऑक्टोबर 20251 ऑक्टोबर 2028
नोव्हेंबर 20251 नोव्हेंबर 20251 नोव्हेंबर 2028
डिसेंबर 20251 डिसेंबर 20251 डिसेंबर 2028

याचा अर्थ, तुम्हाला संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढता येणार नाही. प्रत्येक SIP चे युनिट तीन वर्षांनी मॅच्युअर होईल.

आता तिने पुढे काय करावं?

फक्त एक ELSS फंड ठेवा: एका ELSS फंडमधील SIP सुरू ठेवा आणि उर्वरित तीन बंद करा.

लॉक-इन संपेपर्यंत प्रतीक्षा करा: सध्याच्या युनिट्स काढता येणार नाहीत, पण त्यांना तीन वर्षांत चांगले रिटर्न मिळतील. कारण पैसा लॉक झाला की काढता येत नाही त्यामुळे 3 वर्षात मार्केट वर जावो की खाली त्यावर रिटर्न मिळत राहील.

पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करा: एक Small-Cap Fund घ्या, ज्यामुळे उच्च रिटर्नची क्षमता मिळेल. एक Mid-Cap Fund घ्यावा, ज्यामुळे मीडियम रिस्क आणि चांगले रिटर्न मिळतील.

तिचा नवा पोर्टफोलिओ

  • SBI Blue Chip Fund (जो एक Large-Cap Fund आहे)
  • Quant Flexi Cap Fund
  • Small-Cap Fund (तिने Add करावा)
  • Mid-Cap Fund (तिने Add करावा)

निष्कर्ष

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणं म्हणजे लांबचा प्रवास आहे, आणि चुका होणं हे शिकण्याचाच भाग आहे. या पोर्टफोलिओमध्ये सुधारणा केल्यास अधिक चांगले रिटर्न मिळू शकतील.

ही पोस्ट वाचा: Mutual Fund SIP मधील Compounding चे 3 महत्वाचे नियम – जे तुम्हाला माहीत असावेत!

Leave a Comment