EPFO Alert: आता UAN मिळवण्याचा एक सोपा मार्ग UMANG App वर!

EPFO Alert: श्रम मंत्रालयाने आता कर्मचाऱ्यांसाठीत्यांचा Universal Account Number (UAN) थेट प्राप्त करण्याचा एक सोपा आणि नवीन मार्ग सुरू केला आहे, ज्यात face authentication चा वापर केला जातो. जो पूर्वी तुम्ही काम करत असलेल्या कंपनीच्या HR department द्वारे पुरविला जात असे तेही अनेक विनंत्या करून.

Union Labour Minister मनसुख मंडाविया यांनी सांगितले की, Employees’ Provident Fund Organisation (EPFO) आता UMANG App द्वारे Aadhaar Face Authentication Technology (FAT) वापरून UAN allotment आणि activation यांसाठी enhanced digital services देत आहे. या नव्या पद्धतीत employee ची आणि Aadhaar ची पूर्ण पडताळणी होते.

UMANG App वर UAN Generation कसे करायचे?

  1. UMANG App डाउनलोड करा
  2. Explore Services या ऑप्शनमध्ये EPFO यावर क्लिक करा
  3. नंतर UAN Allotment and Activation या ऑप्शनवर क्लिक करा.
  4. आधार नंबर आणि आधारसोबत लिंक असलेला मोबाइल नंबर टाका (OTP येईल)
  5. Aadhaar-based verification आणि face authentication करा (म्हणजे एक सेल्फी काढा)
  6. face authentication पूर्ण झाल्यानंतर, तुमचा UAN generate होईल आणि SMS द्वारे तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरवर पाठवला जाईल.
  7. नंतर, UMANG App किंवा EPFO Member Portal वरून UAN card डाउनलोड करू शकता.

ज्यांचे आधीपासून UAN आहे पण activation केलेले नाही, त्यांनीही आता UMANG App वापरून सहजतेने UAN activate करू शकतात.

या नवीन प्रक्रियेचा फायदा असा आहे की, ती पूर्णपणे सुरक्षित आहे कारण face authentication ही पारंपारिक demographic किंवा OTP-based authentication च्या तुलनेत अधिक सुरक्षित आहे. यामुळे भविष्यात employees साठी अनेक self-service options सुद्धा सक्षम होतील, ज्यामुळे employer किंवा Regional Office च्या मदतीची गरज कमी होईल.

Telegram Link

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment