EPF Balance Check: आता तुमचा Employee Provident Fund (EPF) बॅलन्स तपासणे खूपच सोपे झाले आहे. Employees’ Provident Fund Organisation (EPFO) ने अनेक डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मग तुमच्याकडे स्मार्टफोन असो, संगणक असो किंवा साधा मोबाइल फोन — तुम्ही अगदी सहज तुमचा EPF balance तपासू शकता. चला पाहूया ५ सोपे मार्ग.
1. EPFO Website वर Check करा
तुमचा पूर्ण EPF Passbook आणि जमा झालेली रक्कम पाहण्यासाठी तुम्ही हे करू शकता.
- epfindia.gov.in या वेबसाइटला भेट द्या
- ‘Services’ > ‘For Employees’ या पर्यायावर क्लिक करा
- ‘Member Passbook’ निवडा
- तुमचा UAN, Password आणि Captcha टाका
- तुमचा EPF passbook पाहा आणि डाउनलोड करा
टीप : तुमचा UAN Active असावा आणि Aadhaar, PAN व बँक अकाउंटशी जोडलेला असावा.
2. UMANG App वापरा
UMANG App ही सरकारी सुविधा आहे, जिच्यातून तुम्ही EPF balance पाहू शकता.
- Play Store किंवा App Store वरून UMANG App डाउनलोड करा
- मोबाईल नंबर टाकून OTP Verification करा
- ‘EPFO’ > ‘Employee Centric Services’ या पर्यायावर जा
- ‘View Passbook’ वर क्लिक करा आणि तुमचा UAN टाका
तुम्ही इथे Claim Status पण पाहू शकता आणि Withdraw Request सुद्धा करू शकता.
3. SMS पाठवा
जर तुमचा UAN Active असेल आणि KYC Updated असेल तर :
- Type करा :
EPFOHO UAN
- हे SMS 7738299899 या नंबरवर पाठवा
तुमच्या मोबाईलवर लगेचच EPF balance चा मेसेज येईल.
भाषेसाठी language code वापरा :
उदा. HIN – हिंदी, MAR – मराठी
उदाहरण : EPFOHO UAN MAR
4. Missed Call द्या
जर तुमचा मोबाइल नंबर UAN सोबत जोडलेला असेल आणि KYC Updated असेल तर :
- 9966044425 या नंबरवर Missed Call द्या
- Call आपोआप कट होईल
- काही सेकंदात तुमच्या मोबाईलवर EPF balance चा मेसेज येईल
हे बिलकुल फ्री आहे आणि साध्या फोनवर पण चालते.
5. EPFO Member e-Sewa Portal वापरा
ही एक अधिकृत आणि सोपी पद्धत आहे.
- unifiedportal-mem.epfindia.gov.in या वेबसाइटला भेट द्या
- UAN आणि Password ने Login करा
- वरच्या ‘View’ > ‘Passbook’ या पर्यायावर क्लिक करा
- तुमचा Contribution details पाहा किंवा डाउनलोड करा
EPF Balance Check करणे का गरजेचे?
तुमचा EPF Balance वेळोवेळी तपासल्याने :
- तुमच्या Retirement Savings वर लक्ष राहते
- तुमचा Employer पैसे वेळेवर टाकतोय का ते कळतं
- गरज पडल्यास Withdraw किंवा Transfer करता येते
आता तुम्ही कधीही, कुठूनही तुमचा EPF balance पाहू शकता — ना फॉर्म भरायचा, ना वाट बघायची!