Mutual Fund Investment | शेअर मार्केट आजकाल खूप क्रॅश झाल आहे.
“माझी SIP लॉसमध्ये आहे, आता काय करावं?” अशी चिंता अनेक गुंतवणूकदारांना सतावत आहे.
शेअर बाजारातली ही चढ-उतार सामान्य आहे, पण यावेळी तुम्ही काय निर्णय घ्याल, त्यावरच तुमच्या गुंतवणुकीचं भवितव्य अवलंबून आहे.
चला, समजून घेऊया की तुम्ही अशा परिस्थितीत काय केल पाहिजे?
शेअर मार्केट खाली-वर का होतो?
शेअर मार्केट हा अर्थव्यवस्था, कंपन्यांची कमाई, ग्लोबल इव्हेंट्स आणि गुंतवणूकदारांच्या मनस्थितीवर अवलंबून असतो.
कधी मागणी जास्त, तर कधी पुरवठा कमी असं होतं. यामुळे बाजारात चढ-उतार येतात. हे नैसर्गिक आहे.
सध्या जगभरातील आर्थिक अनिश्चितता, इन्फ्लेशन, युद्धासारखे घटनाक्रम यामुळे बाजार अस्थिर आहे.
Mutual Fund SIP मध्ये लॉस दिसत असेल तर घाबरू नका!
Mutual Fund SIP ही लाँग-टर्म गुंतवणुकीची स्ट्रॅटेजी आहे. शेअर बाजार खाली असेल तेव्हा तुम्ही SIP द्वारे घेतलेले युनिट्स स्वस्तात मिळतात.
उदाहरणार्थ, एका युनिटची किंमत ₹100 असताना 1,000 रुपयांत 10 युनिट्स मिळतात. पण जर किंमत ₹50 झाली, तर तेवढ्याच पैशात 20 युनिट्स मिळतील. बाजार वर आल्यावर या जास्त युनिट्समुळे प्रॉफिटची संधी वाढते. यालाच “रुपी कॉस्ट एव्हरेजिंग” म्हणतात.
म्हणून, बाजार खाली असताना SIP चालू ठेवणं हेच फायद्याचं असतं!
तुम्ही रिस्क क्षमतेनुसार गुंतवणूक केली आहे का?
गुंतवणुकीपूर्वी स्वतःला हे विचारा:
- माझा रिस्क टोलरन्स किती? (कमी, मध्यम, जास्त)
- मी हे पैसे किती काळासाठी गुंतवणार आहे?
- माझा म्युच्युअल फंड माझ्या रिस्क प्रोफाइलशी जुळतो का?
- उदा., जर तुम्ही लाँग-टर्म (5+ वर्ष) आणि हाय-रिस्क घेऊ शकत असाल, तर इक्विटी फंड्स योग्य आहेत. पण शॉर्ट-टर्म आणि लो-रिस्क असेल, तर डेब्ट फंड किंवा FD चा विचार करा.
गुंतवणूक काढून दुसरीकडे ठेवायची का?
बाजारातली घसरण पाहून घाबरणं सोपं आहे, पण गुंतवणूक काढणं शहाणपणाचं नाही. कारण?
- लॉक-इन पीरियड असल्यास तुम्हाला एक्झिट लोड सारखे चार्ज द्यावे लागतील.
- बाजार रिकव्हर होईपर्यंत तुमची गुंतवणूक मिस्स होईल.
- SIP चा मूळ फायदा (रुपी कॉस्ट अॅव्हरेजिंग) गमावाल.
त्याऐवजी:
- जर तुमचा फंड क्वालिटीमध्ये खराब असेल (उदा., कॉन्सिस्टंटली अंडरपरफॉर्म), तर दुसर्या फंडमध्ये स्विच करा.
- पण जर फंड चांगला असेल आणि तुमचा गोल लाँग-टर्म असेल, तर Mutual Fund SIP चालू ठेवा.
संयम राखा!
शेअर बाजाराच्या हालचालींवर ईमोशनल होवून प्रतिक्रिया देणं हा गुंतवणूकदाराचा सर्वात मोठा शत्रू आहे.
SIP ही डिसिप्लिन्ड आणि वैज्ञानिक पद्धत आहे. जर तुमचा फायनान्शियल प्लान सॉलिड असेल, तर मार्केटच्या शॉर्ट-टर्म उतार-चढांकडे दुर्लक्ष करा. लाँग-टर्ममध्ये, शेअर मार्केट नेहमीच वरच्या दिशेने गेला आहे. लवकरच बाजारातली ही अंधारी रात्र संपून उजेड येईल, पण तोपर्यंत धीर सोडू नका! 💪
तुमच्या गुंतवणुकीबद्दल अधिक मार्गदर्शन हवं असेल, तर फायनान्शियल ॲडव्हायझरशी कन्सल्ट करा. (किंवा तुम्ही मला देखील कॉन्टॅक्ट करू शकता)
पोस्ट वाचा: Mutual Fund Investment | 32 वर्षांत ₹2,000 च्या SIP वर ₹2.62 कोटी – कोणता आहे हा फंड?